Skip to main content

वाङ्मय

आज गुरुपोर्णिमा....

लेखक डावखुरा यांनी रविवार, 25/07/2010 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वरा : गुरु: साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नम: ॥ हे प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्गसम संसार हो, अति उच्चतम जिवन बने, परमार्थमय व्यवहार हो, ना हम रहे, अपने लिये, हम को सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशिष दे, जो सोचनेका फर्ज है ll हम हो पुजारी तत्व के,गुरुदेव के आदेशके सच प्रेम के नित नेम के , सद्धर्म के , सत्कर्म केहो चिढ झुठी शहकी, अन्यायकी अभिमानकी,सेवा कर्म को दासी की, परवाह नही हो जानक

मला आवडलेले पुस्तक : तोत्तोचान( खिडकीतली मुलगी)

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 24/07/2010 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
तोत्तोचानः तेत्सुको कुरोयानगी ( अनु: चेतना गोसावी सरदेसाई) प्रकाशकः इंडिया बुक हाऊस totto chan एक लहान मुलगी वय वर्षे कदाचित पाच. शाळेत अत्यंत अस्थीर . वर्गात येणार्‍या चिमण्याशीच बोलणे, वारंवार डेस्क उघडणे, वर्गाच्या खीडकीतून रस्त्यावरून जाणार्‍या बॅन्डवाल्यांशी बोलणे वगैरे वगैरे.... हे तिचे सततचे उद्योग. तिच्या या उद्योगाना कंटाळून शाळेतून मुलीचे नाव काढून टाकले.

पाऊस - कवीच्या मनात दडलेला

लेखक सुनिल पाटकर यांनी शुक्रवार, 23/07/2010 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
कधी रिमझिम ,कधी मुसळधार,कधी वादळवा-यासह तर कधी उन्हाची सोबत घेऊन कोसळतो पाऊस.पावसाचे रंग तरी किती वेगवेगळे...मनसोक्त भिजणारी ,पावसाचे तुषार एकमेकांच्या अंगावर उडवत चालणारी लहान मुलं पाहिली कि गँलरीत उभ्या असणा-या आजोबांचा हातही नकळत पाऊस झेलण्यासाठी बाहेर येतो.नटूनथटून बाहेर पडणा-या गृहिणींच्या तोंडी ‘याला आत्तच पडायचं होतं का ?‘ असा तक्रारीचा सूरही बाहेर येतो‘जरा आल्याचा चहा करा ‘ अशी फर्माईश हाँलमधून स्वयंपाकघरापर्यंत धडकते.एका छत्रीत थोडाथोडा पाऊस अंगावर झेलणा-या प्रेमीयुगलांचा आनंद आणि हिरवीगार बहरलेली शेते पाहून वरुणराजाचे आभार मानणारा शेतकरी या सर्वांचा आनंद काही औरच !

अभिनव वाचनालय योजना ! ( पुण्यात फक्त )

लेखक विटेकर यांनी रविवार, 18/07/2010 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
रसिक वाचकांनी आस्वाद घ्यावा अशी योजना! ------------ समुत्कर्ष बुक्स चैत्रपालवी लायब्ररी योजना ज्याप्रमाणे चैत्रात वृक्षांना नवी कोवळी पालवी फुटते व सारी सृष्टी आनंदाने मोहरुन जाते., त्याप्रमाणे आपल्याला ही साहित्यवृक्षावरची नवपालवी ….नव नवी पुस्तके आकर्षित करतात. आपल्याला पुस्तकांच्या विश्वातच रममाण व्हावेसे वाटते. आपल्यापर्यन्त अशी नव -नवीन पुस्तके पोचवीत व ते ही कमीत कमी खर्चात, यासाठी " समुत्कर्ष" आपल्यासाठी एक विशेष योजना घेऊन येत आहे. य़ोजना: १.आपण रु.१०० सभासद शुल्क भराल. २. त्यासोबत रु. १००० डिपॊ्झीट भराल ( एक वर्षासाठी) ३.

ससा, सुसर आणि ससाणा

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 06/07/2010 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
आणखी एक मिपाप निती कथा. पुर्वी इसापाने जंगलमधले प्राणी पाहून इसाप निती कथा लिहील्या. मिपा नावाच्या ह्या तळ्यात किंवा मळ्यात (काय म्हणायच ते म्हणा) अनेक चित्रविचित्र प्राणी आहेत. स्वभावाप्रमाणे नावे वापरून जरी ते वावरायचा आव आणीत असले, तरी पुष्कळदा निळा रंग धूवून निघाल्यानंतर खरा कोल्हा उघडा पडला, तसेही होत असते. हे प्राणी अवलोकन करीत अनेक साधु-महात्मे, नाना अवलिया ह्या जंगलात स्वैर फिरत असतात. जंगलातील एका तळ्यात बुडी मारली तेव्हा, अशाच एका महान पुरुषा (ओह. सॉरी.

विष्णुगुप्त २

लेखक पुष्कर यांनी गुरुवार, 01/07/2010 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
(पार्श्वभूमीकरिता वाचा - विष्णुगुप्त-१) (मागच्या भागात - चालता चालता विष्णू नगराच्या बर्‍यापैकी बाहेरच्या बाजूला आला. त्याला आता बाकी कशाचं भानच राहिलं नव्हतं. आता त्याला समोर दिसत होतं ते फक्त एक मोठ्ठं प्रवेशद्वार आणि त्याच्यापुढे दाट झाडीतून गेलेली एक छोटीशी पायवाट. भराभर पावलं टाकत तो त्या प्रवेशद्वारापाशी येऊन थबकला. त्याला पाहून द्वारपालांनी त्याला हटकलं, "काय रे, काय नाव तुझं?". पण विष्णूचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. समोरच्या दाट झाडीतून पलिकडे दूरवर तिमजली इमारतीच्या दिसणार्‍या एका कळसाकडे तो टक लावून बघत होता.

कुंभारवाडा

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 30/06/2010 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
काळ्या डागांनी गालबोटलेल्या सूर्याने फुंकलेले वारे भन्नाट भिरभिरतात पृथ्वीच्या चुंबकीय भोवर्‍यात मग उभं राहातं ध्रुवप्रदेशात अरोरा बोरिआलिसचं अद्भुत प्रकाशशिल्प, न्हाऊ घालत घनतिमिर थंडगार प्रदीर्घ रात्रीला दिसतात कधी सप्तरंगाचे तुषार उडणार्‍या थेंबांतून निघताना घुसमटलेल्या प्रतिभेच्या अनावर उन्मेषाप्रमाणे आणि बहरून येतात फ्रॅक्टल्सच्या अनंत वृक्षांवर रंगभरली फुलं प्रत्येक परागात त्या वृक्षाच्या अनंत प्रतिमा बाळगून कुंभारवाड्यात मात्र अजूनही भाजली जातात त्याच जुनाट मातीची भांडी चार साच्यांची विविधता व अर्धज्ञानी बोटांच्या ठशांची समृद्धता मिरवत तोच कंटाळवाणा चंद्र जातो ठरल्याप्रमाणे लिंबोणीच
काव्यरस

पुस्तक - द पाथ ऑफ मिस्टीक लव्हर - बोल साँग्स ऑफ पॅशन अँड एक्स्टसी

लेखक शुचि यांनी सोमवार, 28/06/2010 03:44 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक - द पाथ ऑफ मिस्टीक लव्हर - बोल साँग्स ऑफ पॅशन अँड एक्स्टसी लेखक - भस्कर भट्टाचार्य, पेनी स्लिंगर्,निक डग्लस मला आवडणार्‍या अध्यात्मिक, तांत्रिक संप्रदाय आदिशी संबंधीत विषयावरचं हे पुस्तक आणि मुख्य म्हणजे भरपूर कविता असलेलं म्हणजे माझ्याकरता पर्वणीच. लेखकाने अतिशय ओघवत्या भाषेमधे बोल संप्रदायाची सुरुवातीला ओळख करून दिली आहे. बोल हे मुख्यतः एकतारी हे वाद्य आणि जोडीला बाया किंवा डुगी तसच गाबागुबी आणि गोपीयंत्र ही जोडवाद्य घेऊन दारोदारी फिरणारे बंगालमधील साधू.