Skip to main content

वाङ्मय

एक मत

लेखक शिल्पा ब यांनी बुधवार, 18/08/2010 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मिपावर बऱ्याच चर्चा चालू आहेत...सैपाक, मुलीनी दारू पिणे, सरकारने किती करोड खर्च करावे, मोठाल्या दुकानातून समान आणणे, मुसलमान धर्मातील अतिरेकी मते आणि काय काय... एक अस्सल मराठी माणूस म्हणून आम्हीही या सगळ्यात हिरीरीने भाग घेत आहोत, घेत राहू....बरेच धागे अप्रकाशित झाले, काही वाचनमात्र झाले. आम्हाला उगाचच एक प्रश्न पडला कि अशा चर्चांना काही धरबंध असावा कि नाही? म्हणजे काय प्रमाण असावे? महिन्यातून किती वेळा अशा चर्चा व्हाव्यात? आणि याविषयी आम्ही एखादा कौल काढावा काय? आपल्यासारख्या थोरामोठ्यांकडून या समस्यांवर काही प्रकाश पडेल अशी आशा आहे.

ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांचे निधन

लेखक अर्धवट यांनी सोमवार, 16/08/2010 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ कवी श्री. नारायण सुर्वे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.. एक वेगळं जग दाखवुन संवेदना जागवणारा निर्मळ कवी आणि सच्चा कार्यकर्ता हरपला.. मनःपुर्वक श्रद्धांजली.. आत्ता त्यांच्या कविता वाचाव्याश्या वाटतायत कुणी इथे त्या देउ शकेल का.

भाषाभान : पुस्तक परिचय

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 15/08/2010 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
'भाषाभान' या डॉ. नीलिमा गुंडी यांच्या पुस्तकात भाषा आणि संस्कृती यांविषयीच्या मार्मीक निरीक्षणांवर आधारीत काही ललित लेख आहेत. 'भाषाभान' मध्ये ललित आणि वैचारिक स्वरूपाचे लेख समाविष्ट केले आहेत. भाषेविषयीचे भान धारदार करण्याचे काम या लेखांद्वारे होते. यातील डॉ. अशोक रा. केळकर आणि डॉ. नागनाथ कोतापल्ले या दोन जेष्ठ नामवंत अभ्यासकांच्या यातील मुलाखती विचारांना चालना देणार्‍या आहेत. लेखीकेने प्रस्तावनेत जरी 'भाषाविषयक', 'भाषेचे' अशा अर्थाचे शब्द वापरले असतील तरी ते शब्द एका अर्थाने 'मराठी' या भाषेसंदर्भात आलेले आहे.

भगीरथ अभियंता होता ?? एक विचार

लेखक आप्पा यांनी शनिवार, 14/08/2010 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच भगीरथ ही रविंद्र भट लिखीत कादंबरी वाचली. कादंबरी बरी वाईट हे लिहीण्यासाठी हा धागा नाही पण त्यात जो विचार लेखकाने मांडला होता तो मिपा वाचकांना समजावा हा उद्देश. लेखकाने मांडलेल्या मतानुसार, आर्य हे टोळ्याने भारतात आले. त्यापैकी एका टोळीचा नायक विश्वामीत्र होता. भारतातील मुळ रहिवासी हे शेती, व्यापार करावयाचे. त्यानी गावे वसविली होती. ते सुस्थीतीत रहात होते. आर्य हे आक्रमक होते. मुळ रहीवाश्याकडे आर्यांसारखी आधुनीक शस्त्रे नव्हती. आक्रमक आर्यानी अन्नासाठी मुळ रहिवाश्यावर आक्रमण केले. त्याना दास (दस्यु) बनविले. त्यांच्याकडुन शेती शिकली. त्यांच्या बरोबर विवाह संबध जुळवले.

ग्रंथस्नेह : मराठी पुस्तकांचे घरपोच पुस्तकसेवा देणारे वाचनालय

लेखक सुप्रिया म्हात्रे यांनी बुधवार, 11/08/2010 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रंथस्नेह वाचनालय ग्रंथस्नेह हे सीएसटी ते डोंबिवली(पूर्व विभाग), सीएसटी ते बेलापूर(हार्बर विभाग), चर्चगेट ते बोरीवली(पश्चिम विभाग) ह्यांदरम्यान कोणत्याही पत्त्यावर कार्यालयात किंवा घरी अशी घरपोच पुस्तकसेवा देणारे वाचनालय आहे. वाचनालयाचा पत्ता- एफ-५-१, स. गो. बर्वेनगर, मुक्ताबाई रुग्णालयाजवळ, घाटकोपर (पश्चिम) , मुंबई ४०००८४ असा आहे. वाचनालयात दूरध्वनी ९८६९०२४०६१ किंवा इ-मेलद्वारे granthasneh@gmail.com पुस्तक नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. येथे सर्वप्रकारच्या वयोगटासाठी पुस्तके उपलब्ध आहेत.

तरुणीशिक्षणनाटिका

लेखक शरद यांनी शनिवार, 07/08/2010 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
(प्राचीन कवींच्या काव्यातील काही आल्हाददायक भाग द्यावा असे काही मिपाकरांनी सांगितल्यावरून एक नमुना ) प्राचीन कवींनी बहुतांशी धार्मिक लेखनच केले असले तरी तेवढेच केले असे म्हणावयाचे कारण नाही. पांडवप्रताप म्हटला तर धार्मिक ग्रंथ आहे, म्हटला तर मनोरंजक कथासंग्रह आहे. त्यातील जवळजवळ सार्‍या गोष्टी फ़ॅन्टसी या सदरातच मोडतील. आज एका मनोरंजक काव्याचा परिचय करून घेऊ. "बिल्हणचरित्र" या संस्कृत ग्रंथाचे "विठ्ठल" या वामन पंडिताच्या काळातील कवीने केलेले भाषांतर आज बघू. कथा अशी.

पुस्तक परिक्षण: "द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी" आणि त्या पुस्तकाच्या पुढच्या मालिका..

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 04/08/2010 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच "द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी" चे मराठी भाषांतर विकत घेतले आणि आताच वाचून संपवले. (संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली) हे एक अप्रतिम पुस्तक आहे. त्याचे लेखक आहेत रॉबिन शर्मा. दक्षिण अमेरिकेतील "शर्मा लिडरशीप इंटरनॅशनल " चे चालक, मालक, संस्थापक. त्यांची व्याख्याने जगभर होतात-व्यक्तीमत्त्व विकास आणि लिडरशीपचे बद्दलचे धडे याबद्दल. आणखी माहिती रॉबिनशर्मा डॉट कॉम वर वर मिळेलच. या लेखाचा मूळ उद्देश्य म्हणजे या पुस्तकाबद्दल मला आलेले अनुभव- बाजारात व्यक्तीमत्त्व विकास आणि लिडरशीपचे बद्दलचे तसे अनेक पुस्तके येतच असतात.

पुस्तकविश्व

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 03/08/2010 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे ते ना सी फडक्यांचं पुस्तक.. काय बरं नाव त्याचं!! छ्या आता नेमकं लक्षात येत नाहि आहे" "हो रे परवा मला पण युगांतच्या लेखिका पटकन आठवेना. इतकं छान पुस्तक पण काहि केल्या नाव आठवेना" "अरे नेमाड्यांची हि दोन पुस्तकं मी वाचली मस्तच लिहितात. बाकी त्यांनी कोणती पुस्तकं लिहिली आहेत त्याची यादी मिळते का रे कुठे" "हे पुस्तक मस्त दिसतंय पण महाग आहे. घ्यावं की नाहि कोणी परिचय/परिक्षण लिहिलं असतं तर किती बरं झालं असतं" "काय सांगतोस तुला नाहि आवडलं ते पुस्तक. मला तर फार आवडलं.. तु सांग काय नाहि आवडलं?" अश्या प्रकारचे प्रश्न/चर्चा तुम्ही करता की नाहि? आणि बर्‍याचदा प्रश्न हे प्रश्नच रहातात.

अंगणातले आभाळ

लेखक ऋषिकेश यांनी रविवार, 25/07/2010 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ.यशवन्त पाठक हे अनेकदा वृत्तपत्रांतून, मासिकांतून भेटले होते. पुढे त्यांचे "नाचू किर्तनाचे रंगी" हातात पडलं. ते पुस्तकही खुप आवडलं होतं. अश्यावेळी वाचनालयात "अंगणातले आभाळ" हे त्यांचे आत्मचरित्र दिसले आणि लगेच उचलले. पाठकांचे वडील श्री. त्र्यंबकबुवा हे किर्तनकार ब्राह्मण. पाठकांना एक बहिण व एक भाऊ.. दोघेही धाकटे. वडीलांच्या किर्तनावर चालणारं घर. त्यात वडील सर्व भावंडांत मोठे असल्याने त्यांच्या भावंडांची जबाबदारी पार पाडताना स्वतःच्या घराकडे काहिप्रमाणत झालेले दुर्लक्ष..