Skip to main content

वाङ्मय

झुणकाभाकरीची गोडी अन् वेडा कुंभार..

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 04/10/2010 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
विठ्ठला तू वेडा कुंभार..(येथे ऐका) वीर सावरकर चित्रपटाच्या निर्मितीचे दिवस होते. दादरला सेनाभवनाच्या अलिकडची गल्ली. तिथे रामचंद्र निवास ही इमारत आहे. तिच्या तिसर्‍या मजल्यावरती बाबूजींनी या चित्रपटाचे कार्यालय थाटले होते. मी अधनंमधनं तिथे दबकत जायचा.. आणि कधी कुठले कागदपत्र फाईल करून ठेव, एखादं बाड इकडून तिकडे पोचव, बँकेची कामं कर, बाबूजींकरता ठाण्याच्या भगवंतराव पटवर्धनांकडे काही काम असेल तर ते कर, अशी बाबूजी सांगतील ती फुटकळ कामं चुपचाप करायचा..कधीमधी उगाचंच त्या कार्याकयात बसून राहायचा..

रात्र काळी, घागर काळी

लेखक शरद यांनी सोमवार, 04/10/2010 07:19 या दिवशी प्रकाशित केले.
आजपावेतो घेतलेली तीन पदे तशी अप्रचलित म्हणावयास हरकत नाही.शेवटची दोन पदे प्रचलित व अतिशय लोकप्रिय अशी आहेत. सुंदर चाली व आकर्षक आवाज यांची भुरळ पडून शब्दांकडे व त्यांतील सौंदर्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. श्री. ज्ञानेश्वर महाराजांनी हा धोका लक्षांत घेऊन श्रोत्यांना विनवणी केली आहे की. शब्द सौंदर्याकडॆ लक्ष देऊन विषयाकडे दुर्लक्ष करूं नका.

तेथे वेधलिसे बाळी

लेखक शरद यांनी शुक्रवार, 01/10/2010 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
आज आपण ज्ञानेश्वर महाराजांची एक कविता बघणार आहोत.विसाव्या शतकांत मनोविज्ञान संशोधिकांनी केलेल्या प्रयोगाचा वापर सातशे वर्षांपूर्वीच्या कवितेत आढळतो.प्रथम कविता बघू. निळिये मंडळी निळवर्ण सावळी तेथे वेधलिसे बाळी ध्यानरुपा ! वेधू वेधला निळा पाहे घननिळा विरहिणी केवळा रंगरसने ! निळवर्ण अंभ, निळवर्ण स्वयंभ वेधे वेधू न लभे वैकुंठीचा ! ज्ञानदेव निळी हृदयी सावळी प्रेमरसे कल्लोळी बुडी देत ! बाळी- गोपी, अंभ- आकाश, स्वयंभ- विष्णु/कृष्ण, कल्लोळ - लाटा संशोधकांनी केलेला प्रयोग असा : एका कुत्र्याला खाणे द्यावयाच्या आधीं शिट्टी वाजवावयाची आणि लगेच खाणे द्यायचे.

तु आणि मी (मिसळपाव स्टाईल!)

लेखक इंटरनेटस्नेही यांनी शुक्रवार, 24/09/2010 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपावच्या इतिहासात प्रथमच खफ वरील साहित्य इथे प्रकाशित करतो आहे. आपण धाग्याचा खफ अनेकदा झालेला पाहिला असेल पण ही अशी ही पहिलीच वेळ असावी की आम्ही खफचाच धागा करुन एक प्रकारे बॅकवर्ड इंटीग्रेशन केले आहे. तरी कोणत्याही पुर्वग्रहदुषित नजरेने आमच्या सदर धाग्याचा आस्वाद घ्यावा आणि प्रतिक्रियांचा पाऊस त्यावर पाडावा ही न्रम विनंती. हे साहित्य आमचे एकट्याचे नसुन आमच्या ह्या योजनेत अभावितपणे सहभागी झालेल्या श्री नावातकायआहे, श्री भेन्डिबाजार, श्री कुक, श्री स्वानंद व सौ.

मीमीची गोष्ट

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 23/09/2010 07:54 या दिवशी प्रकाशित केले.
मीमी एका भरल्या कुटुंबातली मुलगी. ह्या कुटूंबाचा एक असा काही पत्ता सांगता येणार नाही. शोधले की कुणीही सांगेल. प्रत्येक पेठेत अशी घरे आणि घरा घरात अशी माणसे दिसतील. विविधतेत एकता म्हणा हवे तर! घरी आजोबा-आजी, बाबा-आई, लग्न झालेला मोठा भाऊ-वहिनी, त्यांचे छोटे बाळ, आणि ताई, असे मीमीचे भरगच्च कुटुंब. आजोबा, आजी, भाउ वगैरे नाती त्या त्या लोकांविषयी बोलतांना काही नावे द्यायची म्हणून दिलेली नावे. नाहीतर मीमीचे कोणाशी खास असे नाते नाही. नेहमी आपल्या आपल्यामधेच गुरफ़टून असते ती. मात्र ह्या सगळ्यांची मीमी ही एक अतिशय लाडावलेली मैत्रीण. अगदी वाया गेलेलीच म्हणा ना! पण नको. तसे नाही म्हणुया.

फ्लॅंडर्सची फुलं (भावानुवाद)

लेखक राजेश घासकडवी यांनी सोमवार, 20/09/2010 04:34 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच धनंजयने केलेला फ्लँडर्साच्या रणामध्ये हा उत्तम अनुवाद वाचला. धनंजयने आकारबंध जसाच्या तसा ठेवून, कवीप्रमाणेच मोजके शब्द वापरून ते भाषांतर केलेलं आहे. मात्र ती बंधनं पाळताना मूळ कवितेची धार थोडी बोथट झाली असं मला वाटलं. ती धार तशीच ठेवण्यासाठी मी भावानुवाद केलेला आहे. अर्थातच त्यासाठी कवितेचे काही शब्द, रचना व संकल्पना बदलाव्या लागल्या आहेत. (उदाहरणार्थ मूळ कवितेत खड्ग, भाले यांचा उल्लेख नाही...) ओळी वाढलेल्या आहेत. मूळ कवितेतलं मीटर बदलून आलेलं आहे.

सिमेपलीकडची हाक

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 18/09/2010 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
बाल्टीमोरला नवीन घरात शिफ़्ट केले, तेव्हा मी जरा नाराजच होते. तिथे ह्युस्टन मधे चारी बाजुंनी ऐसपैस आवार, बगीचा, स्वत:चा स्मिमींग पूल ही ऐश. इथे अपार्टमेन्ट कॉप्लेक्स मधल्या एकावर एक रचलेल्या डब्ब्यांमधला एक डब्बा आपल्या वाट्याला आलेला. पण काय करणार! संकेतची नोकरी जिथे घेऊन जाईल, तिथे जाणे भागच होते. तरी दोन गोष्टी मनासारख्या होत्या. ह्युस्टनपेक्षा इथे जवळपासच्या भागात ओळखीपाळखी करून घेणे सोपे झाले. कारण आमच्या अपार्टमेन्ट कॉम्ल्पेक्समधेच बरेच इंडीयन होते. तिकडे होतो तेव्हा मला माझ्या अनुभवाला साजेसा जॉब काही मिळाला नाही. संकेत ऑफ़ीसमधे गेल्यावर येवढे मोठे घर जणू खायला उठायचे.

वाचलेली पुस्तकं आणि त्यावरची माझी मतं....कोसला!...

लेखक सविता यांनी रविवार, 12/09/2010 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमरः कोणे एके काळी मी डायरी लिहायचे, सुमारे १० वर्षांपुर्वी..म्हणजे मी कॉलेजला असतानाच्या काळात, आणि मग ती अधून मधून चाळायचे पण! हा उतारा त्यातून घेतालाय्...अगदी तारखेसकट. ही माझी तेव्हाचीमते आहेत, आत्ता वाचले तर कदाचित वेगळे पण मत बनू शकेल. माहीत नाही. मी पहिल्यांदा जेव्हा ही एन्ट्री ब्लॉगवर टाकली, तेव्हा मला ब-याच लोकांनी "नेमाडे हे फार मोठे लेखक आहेत..तुला त्यांचे लेखन झेपत नाहीये म्हणजे तुझा प्रॉब्लेम आहे", "तुझी बौद्धिक पातळी कशी टिपिकल मध्यमवर्गीय आहे, मग तुला व्.पु., अवचट असे टिपिकल लोकांचे लेखनच आवडत असेल" इ. इ.

काट्याच्या अणीवर वसली तीन गावे

लेखक शरद यांनी रविवार, 12/09/2010 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
संतांच्या कविता ..२ प्रथम थोडे अवांतर. भोज राजाच्या दरबारात कालिदासासारखी रत्ने होती तसेच बरेच विद्वानही होते. काही एकपाठी, काही द्विपाठी,काही त्रिपाठी . म्हणजे पहिल्याने एकदा वाचले-ऐकले की पाठ व्हावयाचे, दुसर्‍याला दोन वेळात तर तिसर्‍याला तीनदा ऐकून. भोज राजाने एकदा गंमत करावयाचे ठरवले.त्याने दवंडी पिटवली की "कोणी कवी नवीन कविता करेल तर त्याला एक लाख रुपये बक्षिस मिळेल".कवींना वाटले झालोच आपण लक्षाधीश. दरबारात ही रांग. मजा अशी की कोणत्याही कवीने नवीन कविता म्हटली की एकपाठी ती लगेच म्हणून दाखवावयाचा. दोनदा ऐकून झाली की द्विपाठी उठावयाचा.तो म्हणावयाचा. झाले.