Skip to main content

पुस्तक - द पाथ ऑफ मिस्टीक लव्हर - बोल साँग्स ऑफ पॅशन अँड एक्स्टसी

पुस्तक - द पाथ ऑफ मिस्टीक लव्हर - बोल साँग्स ऑफ पॅशन अँड एक्स्टसी

Published on 28/06/2010 - 03:44 प्रकाशित मुखपृष्ठ
पुस्तक - द पाथ ऑफ मिस्टीक लव्हर - बोल साँग्स ऑफ पॅशन अँड एक्स्टसी लेखक - भस्कर भट्टाचार्य, पेनी स्लिंगर्,निक डग्लस मला आवडणार्‍या अध्यात्मिक, तांत्रिक संप्रदाय आदिशी संबंधीत विषयावरचं हे पुस्तक आणि मुख्य म्हणजे भरपूर कविता असलेलं म्हणजे माझ्याकरता पर्वणीच. लेखकाने अतिशय ओघवत्या भाषेमधे बोल संप्रदायाची सुरुवातीला ओळख करून दिली आहे. बोल हे मुख्यतः एकतारी हे वाद्य आणि जोडीला बाया किंवा डुगी तसच गाबागुबी आणि गोपीयंत्र ही जोडवाद्य घेऊन दारोदारी फिरणारे बंगालमधील साधू. "याची देही , याची डोळा मोक्ष प्रप्ती होऊ शकते" असा संदेश देत आणि राधा-कृष्णाच्या प्रेमाची , गोपींच्या भक्तीची अतिशय एक्स्टॅटीक (आर्त) गाणी गात हिंडणारी ही जमात. हे साधू अशिक्षित, हिंदू-मुस्लीम पंथांच्या खालच्या वर्गातून मुख्यत्वेकरून येतात, त्यामुळे सर्व गावकर्‍यांना यांच्याबद्दल प्रेम, आपुलकीची भावना असते. बोल यांच्या गाण्यांमध्ये लहान-थोर, गरीब-श्रीमंत, आजारी-धडधाकट सार्‍यांकरता आनंददायक असा अध्यात्मिक ठेवा सापडतो. जो भारतासारख्या गरीब देशात बंगाली जनतेला चार विरंगुळ्याचे क्षण देऊन जातो. बहुसंख्य लोकांना बोल साधूंची गाणी आवडत असली तरी काही लोकांच्या टीकेचे हे साधू लक्ष्य होऊन बसले आहेत. याचं मुख्य कारण बोल साधूंचा परंपरागत रूढी, धार्मीक विधी, आचार पद्धतींना असलेला विरोध, मूर्तीपूजेस विरोध. ना वर्णाश्रमास पाठींबा ना इस्लाम धर्माचे अनुकरण. यांचा स्वतःचाच पंथ आहे जो की तांत्रीक मार्ग, हिंदू भक्तीमार्ग, सूफी संप्रदाय आदिंची सरमिसळ आहे. लेखक बोल संप्रदायाची अशी खूप रोचक माहीती देतो आणि मग या पुस्तकात येतात त्या कविता. एकामागे एक अतिशय सुरेख मिस्टीकल (अनोखी) चित्रे आणि तितक्याच अनोख्या कविता. या कविता मूळ कवितांचे इंग्रजीमधील भाषांतर आहेत. कविता फरच मननीय आहेत आणि बरोबर त्यांचा अर्थदेखील उलगडून दाखवला आहे परीच्छेदामधे. नक्कीच आपल्याला अध्यात्मिक, विलक्षण विश्वात घेऊन जातात. पुढे काही मला कळलेली कडवी देते आहे.- (१) What wick is in this lamp That burns in the city Both night & day? It burns in the center of the lamp See it O beloved one No wind or rain will make it flicker. (ही ३ पेड्यांची वेणी घातलेली वात म्हणजे सूक्ष्म प्रतलावरच्या ३ नाड्या ज्या पाठीच्या कण्यातून जातात. दिवा म्हणजे भ्रूमध्याच्या, आज्ञाचक्राच्या जागचा प्रकाश, नगरी म्हणजे शरीर.) (२) O mind are you man or woman I cannot understand This marvelous secret (3) Don't speak of emotions to the insensitive Don't tell anyone For noone will understand By soaking coal in milk You cannot make it white A certain king desired That bitter should become sweet He fed a neem tree with sackful of sugar The tree became three times as bitter Never did it aquire any sweetness. (4) The man becoming three women Rides the waves & three fluides He assumes threefold nature Worldly, celestial & divine A poison, she is worldly At the essence of beauty, she is celestial As the taste of nectar, she is divine Only one who is sensual can prepare the nectar One who has the GURU's grace can go to the river To play with the three women
From Lotus
चित्र जालावरून साभार> (5) Nectar in the moon honey in the lotus Tell me how they can be united? The moon in the sky The lotus in the lake Having made the hive The bee stores honey in it The union of moon & lotus is by the act of divine love alone where there is real passion there is divine love see it observing well milk becomes butter by churning. मला पुस्तक १० च्या पट्टीवर ७ इतकं आवडलं.
लेखनप्रकार

याद्या 1372
प्रतिक्रिया 1

ही अनोखी फीत बोल साध्वीची आहे असं त्या एकतारीवरून वाटतं - सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||