Skip to main content

वाङ्मय

रानमेवा’ पुस्तक प्रकाशन

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 12/11/2010 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन श्री संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत,शेगांव येथे बुधवार दिनांक १० नोव्हेंबर २०१० रोजी ‘रानमेवा’ या माझ्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मा. शरद जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले. मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजीत शेतकरी महामेळाव्यात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रविभाऊ देवांग, कवी इंद्रजित भालेराव, माजी आमदार मा. वामनराव चटप, माजी आमदार मा. सरोजताई काशीकर आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुडदा शिंपी भिवा..!

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 08/11/2010 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
काय म्हणालात? रेषेवरची अक्षरं? ते काय असतं बॉ? आमची ही अक्षरं रेषेवरची काय, रेषेखालचीही नाहीत..! ही आहेत केवळ वेडीवाकडी अक्षरं.. आमच्या अनुभवविश्वातली..! सारं काही तेच ते अन् तेच ते..! विंदांची कुठलिशी कविता आहे म्हणे ही. इथेही तसंच आहे. तोच तो मुंबैचा फोरास रोड. तोच तो तिथला झमझम देशी दारूचा बार अन् तोच तो तिथला कॅशियर तात्या..! सायंकाळचे वाजले असतील सताठनऊ.. तात्या बारच्या गल्ल्यावर बाटल्यांचा हिशेब करीत बसला होता. बारमधली मंडळी निवांतपाणे पीत होती. शिव्या ओव्या गप्पा सुरू होत्या. नेहमीचाच रुटीन कर्यक्रम सुरू होता.. "ए तात्या भडव्या चकणा दे ना..

सहज सुचलं म्हणून.......

लेखक अनिल आपटे यांनी सोमवार, 08/11/2010 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द दुय्यम आहेत विचार महत्वाचा त्यामुळे आपण काय विचार करतो या कडे बारकाईने लक्ष द्या - स्वामी विवेकानंद आजकालच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला विचार करायला फुरसतच कुठे आहे? आणि विचार करत बसला तर आलेली संधी हुकण्याची शक्यता अधिक पण त्यामुळे अविचाराने केलेल्या गोष्टींचा त्याला कधी कधी मनस्ताप हि फार होतो किंबहुना एखादीच गोष्ट यशस्वी झालेली आढळते. त्यामुळे विचारपूर्वक केलेली कृती हि निश्चितच फलदायी ठरते.

दिवाळी अंकांतील फराळ

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 06/11/2010 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाच्या दिवाळीसाठी आम्ही कंबर कसून कामाला लागलो होतो. त्या लेखनकष्टाचं फळ पदरात पडलं आहे. एकूण डझनभर दिवाळी अंकांमधून आमच्या घरगुती फराळाची चव रसिक वाचकांना चाखायला मिळणार आहे. सदरहू अंक आपणाला नक्कीच रुचकर वाटतील आणि त्यात समाविष्ट झालेल्या आमच्या कुरकुरीत साहित्याचा आपण चौकसतेने आस्वाद घेऊन आम्हांला जरुर पोचपावती द्यावी ही विनंती. आमच्या हातचा हा मामुली फराळ कसा काय झालाय? तिखट मीठ व्यवस्थित घोळले गेलेय ना? आंबट लागतोय की गोड? तुरट झालाय की कडू वाटला?

महालक्ष्म्ये॑ च विद्महे | विष्णुपत्न्ये॑ च धीमहि | तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात ||

लेखक प्रशु यांनी गुरुवार, 04/11/2010 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
आज लक्ष्मीपुजन, धनसंपत्ती देणार्या लक्ष्मीमातेच्या पुजनाचा दिवस. सागरमंथनातुन जी १४ रत्ने निघाली त्यात लक्ष्मीचा समावेश होतो. हि लक्ष्मी आपल्या जेष्ठ भगीनी जिला 'जेष्टा किंवा अलक्ष्मी असे नाव देण्यात आले आहे, तीच्यासह वा तीच्या नंतर उत्त्पन्न झाली. अलक्ष्मीही काळयातोंडाची, तांबड्या डोळ्याची, रुक्ष व पिंगट केसांची आणि सुरुकतलेल्या देहाची. तर लक्ष्मीही सुंदर, लावण्यवती. लक्ष्मीने विष्णुला वरले. परंतु जेष्ठेच्या आधी कनिष्ठेचा विवाह कसा होईल? म्हणुन आधी तीचा विवाह उद्दालक ऋषीशी करण्यात आला. परंतु ह्या ऋषीनी तीचा त्याग केला. ह्या अलक्ष्मी चा निवास हा कचरा, कोळसा, कलह हा होय.

सिमरन...

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 03/11/2010 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
दोनचार दिवसांपूर्वीच हा लेख टाकण्याविषयी आणि तिचा फोटू टाकण्याविषयी सिमरनची पूर्ण परवनगी घेतली आहे.

‘रानमेवा’ काव्यसंग्रह प्रकाशन

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 31/10/2010 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
‘रानमेवा’ काव्यसंग्रह प्रकाशन नमस्कार मित्रांनो, माझा ‘रानमेवा’ हा पहिलावहिला काव्यसंग्रह बुधवार दिनांक, १० नोव्हेंबर २०१० ला शेगाव (जि.बुलढाणा) येथे मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजीत शेतकरी महामेळाव्यात लाखो शेतकर्‍यांच्या साक्षीने मा.शरद जोशी यांचे शुभहस्ते प्रकाशित होत आहे. आपणही उपस्थित राहून आपले आशिर्वाद द्यावेत, यास्तव हे आग्रहाचे निमंत्रण. ११२ पृष्ठे असलेल्या या कविता संग्रहास शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांची प्रस्तावना लाभली असून श्री वामनराव देशपांडे, श्री डॉ.

बाणाची कादंबरी

लेखक अवलिया यांनी रविवार, 31/10/2010 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
शुद्रक राजाचा दरबार भरलेला असतो. अनेक दरबाराची कामे चालु असतांनाच एक चांडाळाची मुलगी दरबारात पोपट घेऊन येते. हा पोपट साधासुधा नसतो तर चक्क मानवी वाणीने बोलणारा पोपट असतो. ती चांडालकन्या पोपट राजाला भेट म्हणुन देते. शुद्रकाला पोपटाविषयी खुप कुतुहल वाटुन तो त्याला त्याची हकिगत विचारतो. तेव्हा तो पोपट त्याची दु:खद कहाणी सांगतो. विंध्यारण्यातील एका मोठ्या वृक्षावर तो आणि त्याचे वडील रहात असतात. त्याच झाडावर त्याचे अनेक सगेसोयरे रहात असतात. पोपटाची आई लहानपणीच वारल्याने त्याच्या वडीलांनीच त्याचा संभाळ केलेला असतो.

बॉडी डबल

लेखक मृत्युन्जय यांनी शनिवार, 30/10/2010 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
बॉडी डबल हा शब्द पहिल्यांदा वाचनात आला तेव्हा माझ्यासारखे जे बोडीने डबल आहेत त्यांच्यासाठी हा शब्द वापरत असावेत असा माझा ग्रह झाला होता. मंदाकिनिचा कुठलातरी चित्रपट होता आणि मित्राने सांगितले बॉडी डबल आहे. मी असले चित्रपट का बघतो असे विचारु नका. असाही हा प्रश्न विचारायचा हक्क फक्त असले चित्रपट न बघितलेल्या लोकांना आहे. (हे अकबर बिरबलाची गोष्ट आहे ना की मोत्यांना हात लावायचा हक्क फक्त वारा न सरलेल्या माणसांना आहे त्या धर्तीवर वाचावे) अस्मादिक बराच काळ विचारात पडले होते की मंदाकिनी काही इतकी डबल नाही आहे.

भाषाविज्ञान परिचय

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शुक्रवार, 29/10/2010 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातल्या काही विद्यापीठांमधे बी.ए.च्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात 'आधुनिक भाषा विज्ञानाचा' अंतर्भाव केलेला दिसतो. भाषा म्हणजे काय, भाषेचे स्वरुप, कार्य वगैरे यावर प्राथमिक स्वरुपात जसा अभ्यास असतो त्या प्रमाणे भाषाविज्ञानाचाही अभ्यासही असतो. पारंपरिक भाषाभ्यासाबरोबर आज आधुनिक भाषाविज्ञानाचा अभ्यास आता महत्त्वाचा मानला जात आहे. भाषाविज्ञान म्हणजे केवळ व्याकरण नसते तर, मुखावाटे कोणते अवयव ध्वनी निर्माण करतात कोणते ध्वनी भाषेमधे वापरले जातात. ध्वनीच्या रचना कशा होतात त्यांना अर्थ कसे प्राप्त होतात.