Skip to main content

तंत्र

मिपावर प्रसिद्ध कसे व्हावे ?

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 21/06/2010 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
डीसक्लेमर :- खालील लेखन हे मौजमजा, विरंगुळा म्हणुन केले आहे. ह्या लेखात व सार्वजनीक जिवनात काही साम्य आढळल्यास तो एक योगायोग समजावा. खालील युक्त्या ह्या गंमत म्हणुन दिल्या आहेत, त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करु नये, तोंडावर पडल्यास लेखक अथवा मिपा जबाबदार नाही. "पर्‍या , यार मिपावर कोण विचारत नाही बे आपल्याला. इतके लेखन केले, प्रतिक्रीया दिल्या पण चार सदस्य पण धड ओळखत नाहीत." आमचे मित्रवर्य उद्वेगाने म्हणत होते.

राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान दिनानिमित्त... वरुण यंत्र - तंत्राचा जाहीर निषेध

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 11/05/2010 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान दिनानिमित्त... वरुण यंत्र - यज्ञ तंत्राचा जाहीर निषेध मिठाच्या आहूतींनी वरुण देवरायाला आळवण्याच्या हास्यास्पद प्रकाराला प्रतिबंध करावा.
आज (दि ११ मे २०१०) राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान दिनानिमित्त दै. सकाळ पेपरमधे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी वरुण यंत्राचा वापर हा लेख पान १ व११ वाचून...
मित्र हो, ही आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाची क्रूर चेष्टा तर नाहीना असे विचारावेसे वाटू लागले. बिरबल-अकबराच्या गोष्टीतील 'खिचडी पकाने के लिए' अती दूर ठेवलेली चूल काही कामाची नाही.

"संधी दृष्टीकोन बदलण्याची....!!"

लेखक डावखुरा यांनी शनिवार, 08/05/2010 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
"लोकांची सत्ता येईल तेव्हाच लोकशाही मजबुत होईल. लोकांच्या हितासाठी कायदे येतील तेव्हाच लोकसत्ता येईल." कायदा कितीही उपयुक्त बनला तरीही तो अंमलात आणण्याची राजकीय ईच्छा शक्तीही तितकीच महत्त्वपुर्ण आहे. पण या नोकरशाही-भ्रष्टाचारयुक्त समजात योजनांचा लाभ गरजुंपर्यत पोहोचवणे ही स्वप्नवत भासणारी गोष्ट केवळ अशक्यप्राय आहे.

कोणता फोटो नैसर्गिक वाटतो? (निकाल )

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 07/05/2010 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
खाली एकाच दृष्याच्या दोन वेगवेगळ्या प्रतिमा दिल्या आहेत. प्रत्येक जोडीतील एक प्रतिमा संस्कारीत आहेत. या जोड्या मध्ये कोणती प्रतिमा जास्त नैसर्गिक वाटते हे सांगावे. या चाचणीचं प्रयोजन कॅनन ही कंपनी आणि तिचे फॅन्स कॅननच्या प्रतिमेतील रंगांच्या नैसर्गिकतेबद्दल वाहव्वा करताना दिसतात. Untrained eyeला हा नैसर्गिकपणा ओळखता येतो का हे जाणून घेणे हा या चाचणीचा उद्देश आहे. वर दिलेल्या फोटोंमधले मूळ फोटो जास्त संख्येने निवडले गेले तर कॅननचा दावा खरा आहे असं मानायला हरकत नाही.

हबल- २० वर्षांची यशोगाथा!

लेखक Nile यांनी मंगळवार, 04/05/2010 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
बरोबर चारशे वर्षांपुर्वी, म्हणजे १६१० मध्ये 'गॅलीलीओ गॅलीलीने' प्रथम त्या निळ्या आकाशात काय आहे हे बघण्याकरता दुर्बिण आकाशाकडे रोखली. तेव्हा आकाश म्हणजे स्वर्ग अशी मानवाची कल्पना होती. इंग्रजीतील 'हेवन' हा शब्दाचा उगम,अर्थच आकाशाशी(sky) संबंधीत आहे. कदाचित या 'स्वर्गाच्या ओढीनेच' मानवाला आकाशात डोकावायची इच्छा झाली असेल का? काही का असेना, या 'दुर्बिण परंपरेमुळे' जितके अवकाश मानवाला आजवर दिसले आहे त्यावरुन अवकाशाला 'स्वर्गीय' हे विषेशण मात्र अगदी चपखल बसावे!

एक गिअर मेला

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 18/04/2010 07:30 या दिवशी प्रकाशित केले.
एक गिअर मेला एक गिअर मेला. तुम्ही म्हणाल काहीतरीच काय? गिअर कधी मरतो का? गिअर तर तुटतो, कंडम होतो. मी म्हणतो तो गिअर मेलाच. असाच एक गिअर होता. परिस्थितीच्या वंगणाने गांजलेला, ओझ्याने पिचत चाललेला. दररोज कितीक फिर फिर फिरणार? कितीक काम करणार? तरीही हा गिअर फिरतच होता. एखाद्या घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे. बैलाच्या मानेवर जसे जू असते तशी त्याच्या मानेवर होती एक क्वार्टर पीन. आपेक्षांची, मागण्यांची, गरजा पुर्ण करवून घेणार्‍यांची. तसा तो काही फार मोठा अन मुख्य गिअर नव्हता त्या गिअर बॉक्स मध्ये. अन त्या गिअरबॉक्सच्या आजूबाजूला असंख्य इतर गिअर बॉक्स होतेच.
काव्यरस

लिनक्स उबंटू (ubantu) मिळावा मोफत..

लेखक इंटरनेटस्नेही यांनी गुरुवार, 15/04/2010 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
https://shipit.ubuntu.com/ ह्या साईट वर आपले नाव, पत्ता आदी details द्यावेत, सुमारे १० आठवड्यांत आपण निवडलेल्या पर्यायानुसार सीडी घरपोच होते. (आपल्या सर्वांच्या माहिती साठी सविनय सादर)

Ubuntu मदत new problem update!!

लेखक शानबा५१२ यांनी बुधवार, 14/04/2010 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
Ubuntu काल download व install केल पण mouse चालत नाही,हा frequent problem असल्याच कळल blogs,forums वाचुन.तेथे solution दीलेले पण सर्व command line बद्दल होती व ती नक्की कुठे लिहायची ते नाही कळल.मी computer वगैरेचा course केला नसल्याने HTML codes,command lines वगैरेच फार ज्ञान नाही. Ubuntu चांगल असल्याच एकलय पण ह्या mouseच्या अडचणीमुळे नाही वापरावस वाटत.हा problem अजुन linux कडुन fix करायच बाकी आहे अस वाटत.पण कोणी माहीतीगार माहीती असेल तर सांगेल का? मोजकाच वेळ असल्याने जास्त वेळ नाही देउ शकत पण प्रतिक्रीया वाचुन लिहावस वाटल आवशीचो घोव् व रवी ह्यांचे विशेष आभार.....व ईतराचेंही प्रतिक्रिया

लावणी: मोबाईल चार्ज करा तुमचा

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 14/04/2010 06:09 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाईल चार्ज करा तुमचा मोबाईल चार्ज करा तुमचा ओ पाव्हणं मोबाईल चार्ज करा तुमचा काय काम करायचं तुमाला तर मग नुसता मिस कॉल का हो देता मोबाईल चार्ज करा तुमचा ओ पाव्हणं मोबाईल चार्ज करा तुमचा ||धृ||
कोरस: हातात काय धरता त्ये डबडं निसतं बटन बिटन तुमी दाबा ओ आम्दार उगा मिशीवर मारू नगा मोबाईल चार्ज करा तुमचा ओ दाजी मोबाईल चार्ज करा तुमचा
कालच्याच दिशी आली वाड्यावर इस्कोट झाला तुमी असल्यावर पैकं द्या म्हनलं तर निसतं एटीएम कार्ड काय दावता मोबाईल चार्ज करा तुमचा ओ पाव्हणं मोबाईल चार्ज करा तुमचा ||१||
काव्यरस