Skip to main content

संस्कृती

ताप

लेखक मितभाषी यांनी रविवार, 01/08/2010 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला वाजते का थंडी. आणि कळपाची भीती. का भरलाय तुम्हाला ताप. तोंड दाबुन बुक्क्याचा मार. शब्दांना नसते दु:ख. फक्त ओझे वाहणारे आपण. सवत आनली म्हणे. ग्यानबाची बायको हरवली. आता जास्त विचारत नाही. कारण तुमच्याकडे उत्तर नाही. राम रावण युध्द होणार अनिरुध्द मिशा पिळणार मी झाडावर लपणार ।। निश्चित ।। ही कविता संपादकांना अडचणीत तर नाही ना आणनार?????????? . . . कविवर्य भावसार.

काही बाही...

लेखक अवलिया यांनी रविवार, 01/08/2010 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी एखादं पुस्तक समोर असलं तरी अथपासुन इतिपर्यत वाचुन होत नाही. कारणं अनेक असतात. अशा वेळेस आमचे परममित्र बिकाशेट यांच्या सारखं कुठलंही पान काढुन वाचायचं ही पद्धत मी अवलंबतो. काल असंच झालं. एक पुस्तक काढलं आणि मधूनच वाचायला सुरवात केली. अर्ध मुर्ध पान झालं की जा पुढे नाही तर मागे. असं करता करता काही वाक्य समोर आली. बिकाशेटनी आवडलेलं काही.. असं कधीतरी लिहिलं होतं. म्हटलं आपण पण लिहावं. आता हे तुम्हाला आवडेल की नाही माहित नाही.

महाराष्ट्रातलं मौल्यवान रत्न

लेखक Bhushan11 यांनी रविवार, 01/08/2010 02:01 या दिवशी प्रकाशित केले.
परमेश्वर पाट्या टाकतो. होय. परमेश्वर माणसं बनवताना चक्क पाट्या टाकतो. फरक जाणवतो जेव्हा तो काही माणसांना बनवताना ओव्हर टाईम घेतो. मन लावून काम करतो आणि त्याच्या हातातून असामान्य माणसं घडतात. प्राध्यापक शिवाजीराव भोसले गेल्याच वाचलं आणि मन विषण्ण झालं. लोकसत्तेत "महाराष्ट्र शारदेच्या दरबारातील रत्न निखळल" अशा मजकुराची बातमी आली होती. महाराष्ट्र शारदेचा दरबार दिवसेंदिवस रिकामी पडायला लागलाय. महाराष्ट्रात रत्नांची व्याख्याच बदलायला लागली आहे. या निखळ रत्नांची पारख करणारे रात्नपारखीही कमी व्हायला लागले आहेत. या अस्सल रत्नान ऐवजी इतर रत्नांना भाव आला आहे.

आयला!! हे अवघड आहे बुवा !!!

लेखक नितिन थत्ते यांनी शनिवार, 31/07/2010 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमरः हे लेखन केवळ विरंगुळा म्हणून घ्यायचे आहे. नुकताच एका सदस्याने स्वयंपाक येणे/करणे यावरून एक धागा काढला आहे. लग्न करण्यापूर्वी सांगितलेल्या किंवा अपेक्षित धरलेल्या गोष्टी प्रत्यक्षात न झाल्यामुळे होणार्‍या मनस्तापाविषयी तो धागा आहे. आजकाल लग्न ठरताना आणि ठरल्यावर प्रत्यक्ष लग्न होण्यापूर्वी एकमेकांना भेटण्याची बरीच संधी मिळते.

औषध उतारे आणि आशिर्वाद

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी मंगळवार, 27/07/2010 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रंथपरिचय- औषधं उतारे आणि आशिर्वाद

मंत्रतंत्र बाबा बुवांच्या गप्पा चाललेल्या असताना एका मित्राने एक पुस्तक वाचायला दिलं. काहीशा नाखुशीनेच मी ते पाहिल. औषधं, उतारे आणि आशिर्वाद.

आमच्यावेळी नव्हती असली थेरं!

लेखक रेवती यांनी सोमवार, 26/07/2010 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
"आई, काय गं झालं? ही का रडतीये?" हा प्रश्न माझ्या आईनं तिच्या आईला केला होता. सुट्टीत मामा मामींकडे गेलं की आजीच्या तक्रारी सुरु होत असत. तिचं आपलं ठरलेलं वाक्य,"आमच्या वेळी नव्हती बाई असली थेरं!" प्रसंग म्हटला तर साधासाच होता. दर रविवारी मला आणि मामेबहिणींना न्हाऊ माखू घालण्याचा तिचा हट्ट असे. भल्या सकाळी आमच्या सुपीक डोक्यांना कोमट तेल लावून ठेवायची, मग तिच्याकडे असलेल्या पितळ्याच्या तपेलीत घरी तयार केलेली शिकेकाई भिजवून उकळून त्याचं चोथा पाणी वेगळं करायची. शिकेकाईही साधीसुधी नसायची. त्यात संत्र्याच्या वाळवलेल्या साली, रिठे आणि काय काय बरेच जिन्नस असायचे.

आवाज की दुनीया के दोस्तों

लेखक सहज यांनी सोमवार, 26/07/2010 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
केबल टिव्हीच्या जमान्याच्या आधी दिवसभर मनोरंजनाचे साधन म्हणजे रेडीओ, म्हणजे विविध भारती. आणी अर्थात व्ही सी आर व व्ही एच एस टेप्स. पावसाळा आला की पावसावर बेतलेल्या निसर्ग कवितांना एक वेगळाच भाव येतो. घाबरु नका मी काही कविता किंवा तिचे रसग्रहण करणार नाही. :-) पण पावसाळा ही थीम घेउन मला आवडणारी काही गाणी तुम्हाला ऐकवीन म्हणतो. लगेच सुरवात करुया. रेडीओवर ऐकून ऐकून बरीच गाणी मनात घर करुन जातात. माझ्या पटकन लक्षात येणारी ही गाणी तुलनेत नवीन आहेत, काही जुन्यापैकी आठवणारे म्हणजे हे एक गाणे. मधुबालाच्या फॅन्सना समर्पीत.

संस्कार देणारी बोटे

लेखक विनायक पाचलग यांनी सोमवार, 26/07/2010 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
काल गुरु पौर्णिमा ..मात्र काल मिपा बंद असल्याने हा लेख प्रकाशित करु शकलो नाही .. तो आज प्रकाशित करत आहे . मिपाच नव रुप अत्यंत सुंदर आहे . या नव्या रुपात हा लेख लिहायला मिळत आहे ही भाग्याची गोष्ट आहे .म्हणुनच प्रचंड कष्ट करुन हे सर्व उभे करणार्‍या मिपा नवनिर्माण समितीला हा लेख अर्पण ..- विनायक गुरु पौर्णिमा आली .. ती सालाबादप्रमाणे येते .. आणि मग मीही नियमितपणे पेपरमधले लेख वाचतो … शिक्षकाना नमस्कार करतो ..विचार करतो .. ही एक नियमित प्रोसेस आहे आणि ती मला आवडते .