Skip to main content

आभाळमाया

आभाळमाया

Published on शुक्रवार, 06/08/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
अंगणात फिरताना रात्री सहज आकाशाकडे लक्ष गेले खूप दिवसात आकाशच नाही बघितले असंख्य तार्‍यांनी भरलेले दूर दूर विखरलेले तारे स्वयंप्रकाशी, लखलखणारे मूलतत्वाशी नाते असणारे एकमेकांपासूनद्धा आता किती दूर बघता बघता एक तारा निखळला गालावरून ओघळणार्‍या अश्रूसारखा घसरून गेला अनंतात आकाशाशी नाते सोडून दचकून भानावर आलो.. आभाळमाया जपायला हवी अश्म होईतोवर तरी

याद्या 2168
प्रतिक्रिया 5

आभाळमाया जपायला हवी अश्म होईतोवर तरी खूप सुंदर ! "जोवरी सुचते पावसाचे गाणे हिरमुसवाणे व्हावयाचे नाही.. "

>>अंगणात फिरताना रात्री सहज आकाशाकडे लक्ष गेले खूप दिवसात आकाशच नाही बघितले असंख्य तार्‍यांनी भरलेले खरंच की!! (भारावलेला) अर्धवट >>अश्म होईतोवर तरी हे नाही कळालं, समजावुन सांगा (काव्यभिकारी) अर्धवट खुप छान लिहिलय.. (काकाजी) अर्धवट

या कवितेवर काम अपुरं राहिलं का? कल्पनेत ताकद आहे असं वाटतं, पण ती ताकद दिसून येत नाहीये!

वर श्रावण मोडक यांनी जणू माझीच प्रतिक्रिया दिली आहे! कल्पना जबरदस्त पण मांडणी थिटी पडतेय. थोडं रीवर्क करा, जमून जाईल.