Skip to main content

समाज

लोकशाहीला नाही वर्ज्य

लेखक चांदणे संदीप यांनी शनिवार, 22/12/2018 12:07 या दिवशी प्रकाशित केले.

कुणी म्हणाले दलित भटक्या कुणी म्हणाले हाडाचा कुणबी तो ठणकावून सांगितले बिनकाम रित्या डोक्यांना विषय चघळाया नवा खडा तुरट जातीचा बेशर्म जिभांना हवा स्वये श्रीरामप्रभू मातले जनचर्चा त्या बाधली जनसामान्य इथे तर सारे नेत्यांच्या आधीच हवाली देवळाबाहेरच्या रांगेतला एकेक मोजला जाईल हक्काचा मतदार, त्याची जात पडताळणी होईल लोकशाहीला नाही वर्ज्य कुणीही, माणूस वा देव तुझ्यावरच आले आता मारूतीराया, तुझी जात समोर ठेव \p> - संदीप चांदणे (२२/१२/२०१८)

EVM

लेखक चिगो यांनी गुरुवार, 20/12/2018 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
(डिस्क्लेमर : हा लेख EVM बद्दलची माहिती देणे व त्याबद्दलचे गैरसमज दुर करणे, ह्या हेतूने लिहीण्यात येत आहे. सदर माहिती ही लेखकाच्या निवडणुकांबद्दलच्या अनुभवांवर तसेच भारत निर्वाचन आयोगाद्वारे बनवलेल्या नियम, प्रोटोकॉल्स आणि निर्देशांवर आधारीत आहे. कुणाही वाचकाला जर ह्या विषयावर सखोल माहिती हवी असेल तर ती माहिती भारत निर्वाचन आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वाचकांना नम्र विनंती आहे, कि त्यांनी त्यांना असलेल्या शंकांना कृपया राजकीय वळण न देता विचाराव्यात.

अडनिडी मुलं-३

लेखक जेडी यांनी सोमवार, 17/12/2018 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
दहावी होऊन मुलांना चांगले मार्क्सही मिळाले पुढे ११ वी साठी मुलांनी मिळेल तिथे ऍडमिशन घेतले . सीबीएस्सची कॉलेजेस जास्त नाहीत आणि स्टेट वाल्याना आदी प्रेफरेन्स म्हणून आणखीच गोंधळ . शिवाय त्यांची स्टेट बोर्डच्या सिलॅबस मुळे तिकडे मन असे रमतच नाही. लेकीला आर्ट्स विथ मॅथ्स घ्यायचे होते , पुण्यासारख्या शहरात ५ कॉलेज फक्त . एसपी , फर्ग्युसन ला मिळाले तरच आर्टस् ला घ्यायचे नाहीतर सायन्स असे ठरले . पण ते मिळाले नाही. एकाच कॉलेजला सायन्स आणि आर्ट्ससाठी नंबर लागला . मग सायन्स ला घेतले ऍडमिशन .

अडनिडी मुलं-२

लेखक जेडी यांनी रविवार, 16/12/2018 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या भागात काही मुलांच्या हट्टीपणाबद्दल लिहिले, काहींच्या मानसिक प्रोब्लेम बद्द्ल लिहिले... आता पोंगडअवस्थेतेतिल परिस्थिती मधुन उद्भ्वनार्या प्रश्नांविषयी... टिचर वर्गात आली... शिकवायला सुरवात... रोज पंजाबी घालणारी टिचर आज छान, पारदर्शक साडी नेसली होती. मुलं थोडी बावरुन ... आपआपल्या वह्यात डोकं खुपसुन... थोड्या वेळाने टिचर वर्गात फेर्या मारु लागली.. आता मुलांना टिचरला अगदी जवळुन पाहणे शक्य झाले... टिचर ने वहीत डोकावले.. आणि पुढे पाठ वळताच... "कैसी दिख रही रे, मस्त ऐटम, तेरे को कैसी लगती" , एकजण चार पाच लोकांना आवाज जाईल इतपत जोराने ... टिचर ने मागे वळताच.. एक मस्त स्माईल...

अडनिडी मुलं -१

लेखक जेडी यांनी रविवार, 16/12/2018 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
लेक मागच्या दोन वर्षापूर्वी दहावीला होती . मैत्रिणी इतकंच सख्ख्य असल्यामुळे बऱ्याच हृदयातल्या गोष्टी ती शेअर करते . अगदी मैत्रिणीसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा सल्ला मागते .तिला माहित आहे काहीही सांगितले तरी चालते, ओरडा मिळत नाही मग बरीच देवाण घेवाण होते . ती आणि तिचे मित्र मैत्रिणीविषयी अपार माया आहेच पण काय होणार ह्या अडनिड्या मुलांचे याची चिंता सतत सतावत असते . म्हणून हा थोडासा प्रयत्न . मॉम यु नो , ऑल गर्ल्स क्रेझी अबाउट ..... , ऑल ह्याव क्रश ऑन हिम ,. क्लास बंक करून मुली त्याला बघायला जातात . मी अवाक . पण न जाणवून देता ... एवढं काय आहे ग त्याच्यात? सर्व जणी एवढ्या वेड्या झाल्यात त्या ?

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): ८. हसेगांव (लातूर) ते अहमदपूर

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 14/12/2018 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
जे सत्य सुंदर सर्वथा....: ८. हसेगांव (लातूर) ते अहमदपूर काल रात्री मोठा पाऊस झाला. मी थांबलो होतो तिथे उकाडा व डासांमुळे झोप नाही लागली. जवळजवळ रात्रभर जागाच होतो. पहाटे चारला संस्थेतले एक जण बघायला आले. मग काही वेळ त्यांच्यासोबत बोलत बसलो. पहाटेच्या अंधारात फिरून आलो. संस्थेच्या कामाविषयी आणखी गप्पा झाल्या. नंतर त्यांनी अगत्याने माझ्यासाठी पोहे बनवले. पहाटेही पावसाचंच वातावरण आहे. त्यामुळे चांगला उजेड व्हायला वेळ लागला. त्यामुळे १९ नोव्हेंबरला रोजच्यापेक्षा थोडं उशीरा निघालो. निघतानाही रवीजी आणि मुलांनी खूप उत्साहाने मला निरोप दिला.

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): ७. अंबेजोगाई ते हसेगांव (लातूर)

लेखक मार्गी यांनी बुधवार, 12/12/2018 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
जे सत्य सुंदर सर्वथा....: ७. अंबेजोगाई ते हसेगांव (लातूर) १८ नोव्हेंबरची पहाट, आज प्रवासाचा सातवा दिवस. आज रविवार आहे आणि टप्पा तसा छोटा आहे. आज ७५ किलोमीटर सायकल चालवायची आहे व सतत अनेक दिवस सायकल चालवत असल्याने हे फक्त ७५ वाटत आहेत. एक पेडल मारल्यावर जशी सायकल आपोआप पुढे जाते, एका पेडलचा मूमेंटम जसा दुस-या पेडलला मिळतो, तसाच आता अनेक दिवसांचा मूमेंटम माझ्याकडे आहे. भिती फक्त एकच आहे की, आजच्या रूटवरही रस्ता काही प्रमाणात कमी दर्जाचा आहे. ठीक सव्वा सहाला अंबेजोगाईतून निघालो. यशवंतराव चव्हाण चौकात काल स्वागत झालं होतं, तिथून लातूरच्या रस्त्याला लागलो.