Skip to main content

समाज

पराजय नव्हे, विजय!

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 14/10/2018 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
सह्याद्रीच्या एका उंच कड्याच्या पायथ्याशी वसलेलं कोकणातलं एक टुमदार गाव... हा कडा असा उभा, सरळसोट उभा, की त्याच्या पायाशी उभे राहिल्यावर आपल्याला या निसर्गचक्रातील आपल्या क्षुद्रपणाची आपोआप जाणीव व्हावी, मनावर साचलेली अहंपणाची सारी जळमटे साफ झाल्याचा साक्षात्कार व्हावा... तर, त्या गावात त्या दिवशी हा अनुभव घेऊन मी तिथल्या शाळेत पोहोचलो. निमित्त खासच होतं. लांजा राजापूर संगमेश्वर तालुका विकास मंडळ नावाची एक संस्था गेल्या सुमारे पाव शतकापासून मुंबईत काम करते.

भक्त आणि त्याचा देव!

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 14/10/2018 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
शाळकरी वयात असतानाच कधीतरी तो एका देवळात गेला. शांत, सुंदर संध्याकाळ... झांजांची किंकिण, मृदंगाचा मंजुळ नाद आणि भक्तीने भारावलेले सूर... त्या क्षणाची त्याच्या मनावर जादू झाली, आणि तो कृष्णमय झाला. त्याची कृष्णावर भक्ती जडली, आणि त्याने आपले सारे जगणे कृष्णार्पण करावयाचे ठरविले. आता आपण आपले उरलो नाही, आपल्या हातून जे काही घडेल त्याचा करविता तो कृष्णच असल्याने, आपला सांभाळही तोच करेल अशी त्याची भावना झाली आणि तो आपल्या देवाच्या भक्तीत बुडून गेला. त्याचा समर्पणभाव पाहून लोक अचंबित होऊ लागले. धन्य तो भक्त आणि धन्य तो त्याचा देव...

'योग जिज्ञासा: एटलस सायकलीवर योग यात्रा विशेषांक'

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 11/10/2018 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. नुकतंच जालना येथे 'योग संमेलन' झालं. चैतन्य योग केंद्र जालना व निरामय योग प्रसार व संशोधन केंद्रातर्फे आयोजित ह्या योग संमेलनामध्ये 'योग जिज्ञासा: एटलस सायकलीवर योग यात्रा विशेषांक' प्रकाशित करण्यात आला. गेल्या मे महिन्यामध्ये परभणी- जालना- औरंगाबाद व बुलढाणा जिल्ह्यात ५९५ किमी सायकल प्रवासातून विविध योग साधकांसोबत झालेल्या भेटी, त्यांचे अनुभव, ठिकठिकाणची योग केंद्रे/ योग साधक ह्यांचे पत्ते व संपर्क क्रमांक ह्यांचे तपशील असलेला हा विशेषांक आहे. योगामुळे आयुष्यात काय फरक पडला, हे २७ साधक- साधिकांच्या अनुभवातून आपल्याला कळतं.

तू का राम??

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 10/10/2018 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
डॅशिंग आयएएस अधिकारी म्हणून परिचित असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या कारवायांच्या कहाण्या म्हणजे आजकाल अविश्वसनीयच वाटाव्यात असेच प्रकार असतात. नाशिक मनपाचे आयुक्त असलेल्या मुंढे यांनी आजही अशीच धडक कारवाई केली. नवरात्रीनिमित्त कालिका मंदिरात तुकाराम मुंढे आरतीकरिता पाहुणे म्हणून आले होते. त्यावेळी मंदिरात आणि प्रसाद स्टॉल्सवर त्यांना प्लास्टिक दिसले. राज्यात प्लास्टिकबंदी असूनही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पाहून, आयुक्त तुकाराम मुंढे चांगलेच भडकले.

राधिकेचा फोन

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 02/10/2018 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
गुरुनाथ शयाना सोबत गुटरगूं करत आहे, तेवढ्यात मोबाईलची घंटी वाजते,काहीसा वैतागून गुरुनाथ फोन उचलतो गुरुनाथ: हं, बोल राधिका राधिका: अहो, मला तुझी आणि शयानाची माफी मागायची आहे. गुरुनाथ: का! म्हणून? राधिका: तुझे शयना सोबतचे संबंध बघून मला नेहमीच वाटायचे माझा नवरा बाहेरख्याली, व्याभिचारी आहे. आज कोर्टाचा कोर्टाचा निकाल वाचला. माझे डोळे उघडले. त्या शयानाला धडा शिकविण्यासाठी, काय काय केले मी. ते आठवून माझी मलाच लाज वाटते. मला आधीच का कळले नाही, माझा गुरु कधीच चूक वागू शकत नाही. हे असेच आहे, जसे घरात रोज तेच-तेच खाऊन कंटाळा आला कि आपण हॉटेल मध्ये जातोच ना. आता मी कधीच तुमच्या आड येणार नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानिमित्ताने: आप्मपनीयगो आप्मदेशसं

लेखक सुधीर कांदळकर यांनी शनिवार, 29/09/2018 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
२१ जून २०१२. हा दिवस एक खास दिवस होता. उत्तर गोलार्धातला वर्षातला सर्वात मोठा दिवस होताच. त्याहीपलीकडे या दिवसाला एक खास महत्त्व होते. बरोबर १०० वर्षांपूर्वी जगाच्या इतिहासाला कलाटणी देण्यांत सिंहाचा वाटा असणारा एक महामानव जन्माला आला होता. या थोर मानवाच्या १००व्या जन्मदिनानिमित्त त्या महामानवाच्या मॅन्चेस्टरमधील पुतळ्यासमोरून २०१२ सालच्या लंडन ऑलिंपिकसाठी ऑलिंपिक ज्योत समारंभपूर्वक मिरवणुकीने नेण्यात आली. काही माणसे काळाच्या पुढची असतात. अशापैकीच हे एक व्यक्तिमत्त्व. कोण होता हा महामानव? यंत्रे विचार करू शकतील का? या प्रश्नाचा त्यांनी ध्यास घेतला होता. मानव विचार करू शकतो.

आधारचा निकाल लावला :) जबडा ठेवा पण दात नकोत !!

लेखक माहितगार यांनी बुधवार, 26/09/2018 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय घटनेच्या अनुच्छेद २१ ची व्याप्ती वाढवून खासगीपणाच्या आधीकाराला सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच खासगीपणाचा आधिकार घटनात्मक असल्याचे सांगितले होते. अगदी अलिकडे म्हणाल तर सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधिशांनी, समाजकारण-राजकारण- कायदेमंडळे आपले कायदे व्ययव्स्थित बनवण्यात कमी पडल्यामुळे न्यायालयांवर निर्णय सोडत असल्याबद्दल खेद व्यक्त केला होता. हि टिका अगदिच चुकीची आहे असे नाही पण जिथे कायदामंडळे व्यवस्थित काम करतात तेथेही न्याय व्यवस्थतेची दखलंदाजी अनाकलनीय आहे. आज आधार कार्ड बाबतचा निर्णय येतो आहे.

विसर्जन

लेखक मयुरी चवाथे-शिंदे यांनी सोमवार, 24/09/2018 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
विसर्जन अनंत चतुर्दशीची संध्याकाळ. बाप्पाला निरोप द्यायला बरेच जण त्या समुद्रकिनारी जमले होते. बाप्पाने जाऊच नये अस वाटत असताना आता गेला नाही तर पुढच्या वर्षीच्या पुनरागमनाची ओढ कशी लागेल? त्यामुळे जड अंतःकरणाने त्याच्या विसर्जनाप्रीत्यर्थ डोळ्यात अश्रू घेऊन सगळे त्याला पाहत होते. “ती" मात्र रडत होती अगदी हमसून हमसून. २४-२५ वर्षांची असावी बहुतेक. गळ्यात साधस मंगळसूत्र आणि बाकीही अलंकार खोटेच पण अगदी लहान मुलासारखी रडत होती. तिची समजूत काढायची ? अरे पण लहान बाळ थोडीच आहे ? तरीही सासू सासरे समजावत होते.

दिवाळी अंक २०१८ - आवाहन

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 24/09/2018 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो! सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या मिपाचा दिवाळी अंक आपण सादर करणार आहोत. आणि सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या भरघोस प्रतिसादाचं आवाहन आम्ही करत आहोत. गेली दोन वर्षं आपण दिवाळी अंकामध्ये एक विशेष विभाग जोडतो. आत्तापर्यंत 'रहस्यकथा' (२०१६) आणि 'व्यक्तिचित्रं' (२०१७) हे विभाग झाले आहेत. सलग दोन वर्षं हे झाल्यामुळे यंदा बदल म्हणून दिवाळी अंक मूळ स्वरूपात, म्हणजे मुक्त, असावा असं योजलं आहे. तर दिवाळी अंकाला काही विषय, थीम नाही. 'सकस आणि / किंवा रोचक लिखाण' हे दोनच मापदंड आहेत.

बोली बोली बायका बोली

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 21/09/2018 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही बायका म्हणजे बोलीभाषा, बोलघेवड्या ! चुलीपासून फोनपर्यंत बडबडबड, गप्पागोष्टी.... लिपीबिपीचे बंधन नाही व्याकरणबिकरण... हे काय असते? आम्ही बोलतो अनंत बोलीतून .... कुजबुज जितकी थरथरणारी तितके भांडण कडकडणारे कठोरतेचा शीण आम्हाला मवाळतेचा शाप तसाही पण बोली आमची जपून ठेवतो.... अर्थाचा पण अनर्थ करू.... खिल्ली तुमची सहज उडवू निरर्थाला अर्थ देऊ...