मंडळी,
मला काही वर्षांपूर्वी फेसबुकमुळे छंद जडला - जगभर पाळीव म्हणून मनुष्याच्या संपर्कात वाढलेल्या प्राण्य़ांची रिल्स मधून निरिक्षणे करण्याचा. यात मुख्यत्वे कुत्री आणि इतर प्राणी, पक्षी यांचा समावेश होता. यापूर्वी मी अनेक नामवंत मानववंश शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचा परिचय करून घेतला होता. फेसबुक वरील रिल्स मुळे डेस्मण्ड मॉरीसच्या अनेक निरीक्षणावर शिक्कामोर्तब झाले. उदा० क्रॉस स्पिसीज मेटींग, प्राण्यांमध्ये पण हस्त/स्वमैथुनाच्या नैसर्गिक प्रवृत्ती अ्सतात, हे बघायला मिळाले.