चांगल्या बातम्या - १
नमस्कार!
येथील चर्चेप्रमाणे हा धागा सुरु करत आहे.
आपण सगळ्यांनी देखील जमेल तसा हातभार लावावा.
Sowgood Foundation च्या संचालिका प्रगती चास्वाल यांनी आजतोवर दिल्लीमधील सरकारी आणि खाजगी अशा विविध शाळांमधून, ७२००० मुलांपर्यंत शेती आणि त्याविषयक जाणीव पोहोचवलेली आहे. आपल्या मुलाच्या भाज्यांविषयी असलेल्या नावडी वरून त्यांना मुलांना मातीसमवेत जोडण्याची गरज जाणवली आणि त्यातून त्यांनी हा उपक्रम सुरु झालाय.
मिसळपाव
गर्भाचे लिंग निश्चित होण्यास वाय-गुणसूत्र कारणीभूत असते असे मानले गेले आहे. पण वाय गुणसूत्रावरील Sry या जनुकाचे गर्भधारणेच्या काळात काम बिघडले तर लिंगदोष निर्माण होतात. पर्यावरण यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पाडत असते.
निसर्गाच्या या चुकीचे उंदरांमधले कारण शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे. गर्भधारणेच्या काळात लोहाची कमतरता या दोषाला कारणीभूत ठरते, असे उंदरावरील संशोधनात आढळले आहे.
मी काही वर्षांपूर्वी विशिष्ट उद्देशाने (समाजाला जागे करण्याच्या) तयार केलेला शब्द प्रयोग काही जणांना अपमान कारक वाटतो. बरं ’किडकी प्रजा’ हे शब्द कुणा विशिष्ट गट किंवा समूहाला टारगेट करून अपमानित करण्यासाठी तयार केलेले नाहीत. एखाद्या महालात राहणार्या व्यक्तीपासून ते रस्त्यावर राहणार्या व्यक्तीपर्यंत कुणीही "किडू" शकतो. मग मला धमक्या पण दिल्या जातात.