मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समाज

मोदींचे भाषण आणि त्यावर घेतलेले बालीश आक्षेप

युयुत्सु ·
मोदींचे भाषण आणि त्यावर घेतलेले बालीश आक्षेप https://youtu.be/oq35bx7ktEM?si=SHdxD8Kmglr2iXD5 माझी उत्तरे प्रश्न १ - समझौत्याची घोषणा भारत आणि पाक यांच्या ऐवजी त्रयस्थ पक्षाने करणे केव्हाही हितावह. जो पक्ष समझौत्याची भाषा करतो तो कमकुवत मानला जाऊ शकतो. भारताने अशी घोषणा केली असती तर पाकला आयते कोलीत मिळाले असते. प्रश्न २ भारताच्या परराष्ट्र नीतीची कोणतीही अडचण झाली असे मला वाटत नाही. कोणत्याही युद्धात सन्मान्य माघार विजया इतकीच महत्त्वाची असते.

समईतलं तेल संपूनही उरणारं तेज

मार्गी ·
स्नेहप्रभा! प्रभा म्हणजे तेज. नुसतं तेज असेल तर त्या तेजोवलयाचा कधी कधी त्राससुद्धा होऊ शकतो. तेजामुळे दाहकता निर्माण होऊ शकते. पण तेजासोबत स्नेह असेल आणि ओलावा असेल तर ते तेज घातक ठरत नाही. स्नेह म्हणजेच तेल. जेव्हा तेजासोबत अशी आर्द्रता असेल तर ते तेज शीतल होतं. कदाचित तेजासोबत असलेल्या शीतलतेमुळे आयुष्यातल्या इतक्या दु:खाच्या आघातांनंतरही अशी व्यक्ती खंबीर राहू शकते आणि समईसारखी मंद तेवत राहू शकते! नऊ दशकांचा प्रवास केलेली माझी आजी- सौ. स्नेहप्रभा नारायणराव वेलणकर. जिचे तीन भाऊ दुसर्‍या महायुद्धात युरोप व आफ्रिकेत लढले होते! जिने इंग्रजांपासून अँड्रॉईडपर्यंतचा काळ बघितला!

माध्यमांची आरडाओरड

युयुत्सु ·
नुकताच काही आठवड्यापूर्वीचा (पहलगाम घटनेच्या अगोदरचा) एक प्रसंग... एका कंपनीत फायर ड्रील चालू होते. त्यात त्यांना आकस्मिक परिस्थितीमध्ये काय करायचे (उदा० हातातले काम टाकून संकटकालीन मार्गिकेकडे जाण्याच्या) याच्या सूचना दिल्या होत्या. नंतर काही दिवसांनी लोकांची तयारी बघण्यासाठी एक दिवस अचानक सायरन वाजवण्यात आला. त्यावर लोकांनी काय करावे? त्यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना फोन करून "आता काय करायचे" असा प्रश्न विचारला, तेव्हा संबंधितानी कपाळाला हात मारला. आपात्कालीन परिस्थितीमध्ये सर्वसाधारण भारतीय नागरिक कसा बेपर्वा किंवा मठ्ठपणे वागतो, हे सर्वांनी करोना काळात बघितले.

कळविण्यास आनंद वाटतो की...

युयुत्सु ·
मंडळी, मला काही वर्षांपूर्वी फेसबुकमुळे छंद जडला - जगभर पाळीव म्हणून मनुष्याच्या संपर्कात वाढलेल्या प्राण्य़ांची रिल्स मधून निरिक्षणे करण्याचा. यात मुख्यत्वे कुत्री आणि इतर प्राणी, पक्षी यांचा समावेश होता. यापूर्वी मी अनेक नामवंत मानववंश शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचा परिचय करून घेतला होता. फेसबुक वरील रिल्स मुळे डेस्मण्ड मॉरीसच्या अनेक निरीक्षणावर शिक्कामोर्तब झाले. उदा० क्रॉस स्पिसीज मेटींग, प्राण्यांमध्ये पण हस्त/स्वमैथुनाच्या नैसर्गिक प्रवृत्ती अ्सतात, हे बघायला मिळाले.

राहून गेलं !

आजी ·
मध्यंतरी एका मैत्रिणीकडे गेले होते. म्हणजे आम्ही तिघी शाळेतल्या मैत्रीणी एका मैत्रिणीच्या घरात एकत्र जमलो होतो. दुपारी चार ते सहा वाजेपर्यंत गप्पा मारायच्या असा बेत होता. मी त्या मैत्रीणीकडे कुसुमकडे वेळेवर पोहोचले. माझी दुसरी मैत्रीण विजू तीही वेळेवर आली. व्हॉट्सॲप ग्रुप बनून दोन तीन वर्षे झाली असली तरी विजू मला समोरासमोर मात्र शाळेच्या शेवटच्या दिवसानंतर आजच भेटत होती. सुरुवातीलाच आम्ही गळाभेट घेतली. विजूबरोबर तिचा नवरा होता. कुसुमचा नवराही घरात होताच. आम्ही सगळे स्थानापन्न झालो. माझ्या लक्षात आलं की कुसुमच्या फ्लॅटच्या खिडकीबाहेरून बांधकामाच्या ड्रिलिंग मशीनचा कर्कश्श आवाज येतोय.

चैतराम पवारांना पद्म श्री: एक खूप मोठा क्षण!

मार्गी ·
नमस्कार. चांगल्या गोष्टी जास्त लोकांपर्यंत सहसा जात नाहीत. त्यांची पुरेशी दखल घेतली जात नाही. एका अतिशय चांगल्या गोष्टीची माहिती अनेकांना व्हावी म्हणून हा लेख. चैतरामजी पवार! माझी त्यांची ओळख सांगायची तर माझ्या मामाचे- डॉ. आनंद फाटक ह्याचे ते अगदी जवळचे मित्र व सामाजिक क्षेत्रातले सहकारी. बारीपाड्याचा अभ्यास केला होता तेव्हा त्यांचा जवळून सहवास मलाही मिळाला होता. असे चैतराम दादा धुळे जिल्ह्यातील "बारीपाडा" गावामध्ये विकास घडवणारे सूत्रधार! आजच्या भाषेमध्ये सांगायचं तर खूप मोठे रूरल इनोव्हेटर. आणखी प्रचलित भाषेत सांगायचं तर ते प्रचंड श्रीमंत आहेत आणि त्यांची संपत्ती कित्येक करोड आहे.

शिवरायांचे औरंगजेबास पत्र (काल्पनीक)

OBAMA80 ·
हे पत्र पूर्णपणे काल्पनीक असून त्यात कोणालाही दुखविण्याचा, धार्मिक तेढ वाढविण्याचा अथवा कोणावरही टीका करण्याचा उद्देश नाही याची सूज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती. ******************************* हे आलमगीर, बऱ्याच वर्षानंतर तुम्हांला पत्र लिहीण्याचा योग आला. तुम्ही हिंदूवर लावलेल्या जिझीया करासंदर्भातील तुम्हांला लिहीलेल्या पत्रानंतर बहुतेक आत्ताच योग आला. आता हे पत्र २१ शतकात लिहीत आहे तेव्हा या पत्राची भाषा देखील मराठी आहे. तुमच्या आयुष्याची शेवटची कित्येक वर्षे तुम्ही महाराष्ट्रात घालविल्यामुळे कदाचित तुम्हांला ही भाषा अवगत झाली असेल अशी अपेक्षा करतो.

पेडगाव -धर्मवीर गड-पारगाव

Bhakti ·
अ दोन-तीन महिन्यांत १२००-२००० वर्षे जुनं पुरातन काळ्या पाषाणात कोरलेल्या,सहज नैसर्गिक भावमुद्रेत अनंत काळापासून उभ्या मूर्ती पाहिल्या नाही की काळाच चक्र", पुढेच जात आहे ,जरा मागे डोकावून पहायला हवं असं वाटतं.

वकील

युयुत्सु ·
नुकतच गाजलेल्या दिनानाथ प्रकरणावर विचार करत असताना समाज कसा दुट्प्पी आणी व विवेकभ्रष्ट बनला आहे याचा विचार करत असताना माझी एक जुनी पोस्ट आठवली. मग लक्षात आले की समाजात असे काही व्यवसाय आहेत की ते प्रेताच्या टाळू वरचे लोणी खाऊनच जगतात. त्यातला एक म्ह० वकीली आणि दुसरा म्ह माध्यमे. समाज दुभंगण्यात या दोन व्यवसायांचा हातभार मोठा आहे... आज डॉक्टर घैसासाना जी शिक्षा होत आहे, तशी शिक्षा वकीलांना होते का? तर नाही. दूरदर्शनवर जेव्हा फक्त संध्याकाळी ७ च्या आणि नंतर रात्री ९ च्या बातम्या शांतपणे आणि आरडाओरडा न करता दिल्या जात होत्या तेव्हा तूलनेने समाज पण आजच्या तुलनेत शांत होता.