त्या दिवशी " लेखा" चा वाढदिवस होता , दिवस नेहमीप्रमाणेच उजाडला, पहाटे ५.३० वाजता लेखा उठली , मुलांचे डबे, नवऱ्याचा डबा , सासु-सासाऱ्यांच्या चहा ची तयारी , दूध तापविणे, नाश्त्याला कोण काय खाणार असे सगळे नेहमीचेच विचार डोक्यात सुरू होते .
स्वतः चे आटोपून लेखाने चहा चा कप हातात घेतला आणि तेवढ्यात तिचा फोन वाजला , आई चा फोन होता , " लेखा बाळा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, तुला उदंड आयुष्य लाभो, तुला पुढच्या आयुष्यातही असेच आनंद आणि सौख्य लाभो , सुखी राहा बाळा. " आई म्हणाली . लेखाच्या डोळ्यात टचकन पाणी आले .