Skip to main content

महाराष्ट्र वैभव.

लेखक कलंत्री यांनी रविवार, 28/09/2008 11:07 या दिवशी प्रकाशित केले.

महाराष्ट्राचा विचार आणि तोही सांस्कृतिक अंगाने केला तर माझ्या मनात खालील विचार आले.

महाराष्ट्राचे तीन बा : ज्ञानोबा, तुकोबा आणि विनोबा. ( मराठीभाषेचे आध्यात्मिक जीवन यांच्याशिवाय कसे बरे समजता येईल?) कदाचित चालतेबोलते विद्यापीठच म्हणा हवे तर.

महाराष्ट्राचे तीन बाबा : गाडगेबाबा, बाबा(साहेब) आंबेडकर आणि बाबा आमटे. या तिघांनीही पददलितासाठी आपले जीवन वेचले.

महाराष्ट्राचे तीन तात्या : तात्या सावरकर, कुसुमाग्रज आणि आपले आवडते सेनानी तात्या टोपे.

कचेरी ते कॉर्पोरेट ऑफीस : एक मनकल्लोळ !!!

लेखक छोटा डॉन यांनी शनिवार, 27/09/2008 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
बघता बघता "जर्मनीला" येऊन २ आठवडे झाले. सगळा वेळ सेटलमेंटमध्येच गेला. भारतातुन निघायच्या १ आठवडा आधी व इथे आल्यावर पहिला आठवडा फ़ार जोशात गेला.
नविन जागा, नवा देश, नवी भाषा, नवी संस्कॄती व राहणीमान आणि विचारसारणी व सगळ्यात महत्वाचे म्हणजे "नवे ऑफीस " ....
फारच फरक पडला या सर्व गोष्टीत, त्यामुळे मनात एक सुप्त आकर्षण, एक दडपण, एक उत्साह व तेवढाच नव्हर्सनेस अशा भावनांनी पार डोक्यात गोंधळ उडाला होता.
असो. त्याबद्दल पुन्हा सवडीने, आज मुख्य मुद्दा आहे ते "ऑफीस कल्चरचा" !!!

क्रेडिट कार्ड वापरताना जरा सांभाळुन... (आमचा खुप वेगळा अनुभव)

लेखक टुकुल यांनी शुक्रवार, 26/09/2008 08:13 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार मिपाकर्स, नविन लेखन/लेखक असल्यामुळे काहि चुका झाल्यास सांभाळुन घ्या..
------------------------------------------------------------------------
वर्षभरापुर्वीची गोष्ट आहे, माझी दुचाकी चोरीला गेल्याकारणाने मी आणि माझा मित्र अनिल जरा तणावात पुण्यातल्या आमच्या रुमवर होतो तेव्हा अनिल चा फोन वाजला, क्रेडिट कार्ड कस्ट्मर केअर "तुमच्या कार्डवरुन या १-२ दिवसांत जो वापर झाला आहे त्याच्या खात्री करिता हा फोन केला आहे" अनिल ने जवळच पडलेल पाकिट उघडुन कार्ड पाहिले आणि खात्री करुन टाकली , फोन बंद.

एका लग्नाची गोष्ट!

लेखक स्वाती दिनेश यांनी गुरुवार, 25/09/2008 19:40 या दिवशी प्रकाशित केले.

लग्न! दाराशी केळीचे खुंट,आंब्याचे टहाळे आणि झेंडूच्या फुलांची तोरणं,पैठण्यांची सळसळ, अत्तराचा दरवळ, करवल्यांचे मिरवणे,भटजींची बोहल्यावरची लगबग, "आता मुलीला आणा... मुलीचा मामा कुठे आहे? " अक्षता, मंगलाष्टका आणि 'तदेव लग्नं..' झालं की 'वाजवा रे वाजवा..' चा इशारा! होमाचा धूर,सप्तपदी, ते ४,५ दा साड्या बदलणे,विहिणींच्या ओट्या, मानपान, रुसवेफुगवे, व्याही भेटी, पंगतीतला आग्रह, जिलेब्यांची ताटे आणि संध्याकाळचे आईसक्रीम!

मिशी

लेखक शितल यांनी बुधवार, 24/09/2008 17:01 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार मंडळी,

तुम्ही आता विचार करत असाल मिशी ह्यावर काही लिहीण्याजोगे आहे का ? पण चला जाता जाता वाचु या.

“ मुछे हो तो नथ्थुलाल जैसी वरना ना हो ! ” हा डायलॊग तर सर्वांना परिचयाचा असेलच.

"लव" इज द "गेम"!

लेखक मृगनयनी यांनी बुधवार, 24/09/2008 15:48 या दिवशी प्रकाशित केले.

मनाच्या गाभार्‍यात , कधीकधी भरुन येतात भूतकाळाचे मेघ...
आणि मग एकेक लडींप्रमाणे उलगडत जातात, त्या आठवणी...
मी म्हणायचे, "मला आवडते काळ्या दगडावरची रेघ. "
तू म्हणायचास, " मला मात्र भुरळ पाडतं अळवावरचं पाणी. "

मी विचारायचे, "राधा खरी की रुक्मिणी ? "
तू विचार करुन म्हणायचास, "मीरा च खरी विरहिणी. "

पुतळा ( लघु कथा )

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 23/09/2008 18:19 या दिवशी प्रकाशित केले.

पुतळा
------------------------------------------------------

' साहेब ...'

' बोल ...'

' शासनाच्या प्रत्तेक निर्णयाला विरोध करायचा हीच आपली पक्षीय नीती आहे ना ? '

' बरं ? मगं ? '

' मग मुख्यमंत्र्यांच्या नव्या घोषणेचं आपण स्वागत आणि समर्थन कसं केलत ? '

' कोणती घोषणा ? '

' तीच ... शहरातल्या मध्यवर्ती भागात त्या राजनेत्याचा पुतळा उभा करण्याची ?

आपण म्हणालात, की कुठल्या ही विधायक कार्यात आम्ही सत्याधार्‍यांच्या बाजूने राहू ! सत्ताधारी पक्षाला साथ देऊ ! '

' अरे मूर्खा , पुतळा उभा करण्यासाठी वर्गणी गोळा करावी लागेल .'

राज ठाकरे आणि प्रसारमाध्यमे

लेखक भोचक यांनी सोमवार, 22/09/2008 18:31 या दिवशी प्रकाशित केले.

मराठी भाषा, मराठी माणूस, राज ठाकरे आणि त्याला अनुषांगिक उपप्रकरणे जया, अमिताभ, युपी, बिहारी वगैरे वगैरे. या सगळ्या विषयांनी गेले काही महिने नुसते गाजवून सोडले आहेत. राज ठाकरे यांची बर्‍यापैकी पाठराखण मराठी प्रसारमाध्यमांनी (छापील आणि दृकश्राव्य दोन्ही) केली आहे. हिंदी व इंग्रजी मीडीयाने मात्र राज ठाकरे हा कुणीतरी गुंड असल्याचे चित्र उभे केले आहे. त्याचाच परिणाम म्हणून की काय पण हिंदी प्रांतातही राज नावाचा कुणीतरी एक राक्षस महाराष्ट्र नामे प्रांतात असून तेथे जाणार्‍या प्रत्येकाला तो मराठी बोलायला भाग पाडतो.

कलेचा बाजार....

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 21/09/2008 17:40 या दिवशी प्रकाशित केले.

राम राम मंडळी,

मी एकंदरीतच दूरदर्शन आणि त्यावरचे रिऍलिटी शोज फारच कमी पाहातो, किंबहुना पाहातच नाही. आज साला सन्डे होता. दुपारी जेवल्यावर सहज म्हणून दूरदर्शन संच सुरू केला. ष्टार प्लस वाहिनीवर कुठलीशी एक जोडी एका ध्वनिमुद्रणावर नाचत होती. प्रेक्षक मंडळी बसली होती. तीन परिक्षक तो नाच बघत होते. (नंतर मला कळले की त्या कार्यक्रमाचे नाव 'आजा माहिवे..' असे होते.)

"अच्छा! म्हणजे नृत्याच्या कुठल्याश्या स्पर्धा सुरू दिसताहेत. बघुया तरी..!"