मनाच्या गाभार्यात , कधीकधी भरुन येतात भूतकाळाचे मेघ...
आणि मग एकेक लडींप्रमाणे उलगडत जातात, त्या आठवणी...
मी म्हणायचे, "मला आवडते काळ्या दगडावरची रेघ. "
तू म्हणायचास, " मला मात्र भुरळ पाडतं अळवावरचं पाणी. "
मी विचारायचे, "राधा खरी की रुक्मिणी ? "
तू विचार करुन म्हणायचास, "मीरा च खरी विरहिणी. "
मी : म्हणजे राधेच्या प्रेमात, नव्हतीच का कधी भक्ती?
तू : हो..... पण विष पचवायलाही लागते मोठी शक्ती...!
मी : तरी पण सांग ना..... कोण खरं....?
तू : खरंतर लग्नपेक्षा प्रेमच बरं !
मी : फक्त प्रेमासाठी म्हणुन, का राधेने समाजनिंदेला तोंड द्यावं ?
तू : आता प्रेम करायचं, म्हटल्यावर तेवढं सहन करायलाच हवं!
मी : पण म्हणुन, समाजाचा फक्त राधेवर तेवढा रोष.....
तू : समाजच तसा आपला, यात माझा काय दोष?.....
मी : ठाऊक आहे ना तुला, राधेने वासनेच्या पलीकडलं प्रेम केलं होतं....
तू : हो ... पण या कलीयुगात, पलीकडच्या तीरावर... पाण्यातुनच जावं लागतं!
मी : असं म्हणतात, खर्या प्रेमात स्वार्थ बघायचा नसतो!
तू : हो... पण खर्या प्रेमाचा अर्थ आपणच ठरवायचा असतो.....!!!
मी थोडी नाराज होऊन म्हणाले, " हे मात्र छान!.. प्रत्येक शब्दाचा अर्थ बदलवता येतो
तुला!"
तू माझ्या डोळ्यांत बघत म्हणालास, " हो!.. कारण आयुष्याच्या प्रत्येक खेळात रस आहे मला!!"
मी : म्हणजे, आयुष्यातली प्रत्येक गोष्ट, खेळ म्हणुनच खेळायची असते?
तू : हं..... एखादी खेळी मुद्दाम हरुन जिंकायची असते!
मी : म्हणजे...तुझ्यावर प्रेम करणार्यांच्या भावनांचाही तू खेळच करतो का?
तू : विचार कर.. आपल्या भावनांचा कधी परस्परांशी मेळ असतो का!?!
मी : भावनांचा विचार करण्यासाठी त्यांचा भावनात्मक दृष्टीनेच विचार करायला हवा!
तू : म्हणजे.... त्यासाठी मला परत मांडावा लागेल खेळ नवा!!!
मी : तू ही माणुसच आहेस ना.... तरी नाहीच कशी तुला निर्व्याज प्रेमाची जाण.....
तू : माझ्या खेळात मला माहित आहे फक्त हृदयांची देवाण घेवाण.....
मी कळवळुन म्हणाले, " इतका कसा रे निष्ठूर तू, माझ्या आजवरच्या विश्वासाला तडा गेला.."
तू शांतपणे म्हणालास, "फासेच उलटे टाकलेस तू, म्हणुन तर तुझा डाव चुकला..."
मग फक्त आघात सोसत राहिले, मी होऊन नि:शब्द.....
अश्रूंच्या माळेतून आठवत राहिले, प्रेम आणि सौदा यातलं द्वंद्वयुद्ध!
निरोप घेताना तुझा मी इतकंच म्हणाले, "तुझा खेळ हरले मी... विसरुन जा माझं प्रेम..."
मग तू ही थोडा 'इमोशनल' होऊन म्हणालास, " You also forget it, at last LOVE is the GAME!
एवढं होऊनही विसरुनचं गेले मी तुला एक सांगायचं....
मला नवीन खेळाची माहिती दिल्या बद्दल "थँक यु" म्हणायचं!
तू काहीही म्हण आता... पण खरोखरच तुझे मानले पाहिजेत आभार.....
कारण माझ्या प्रेमाला तू फक्त "खेळ"च म्हटलास...... म्हणाला नाहीस "जुगार" !
वाचने
11560
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह !!!
थ्यांक यू
असल्या
राजे पेटु
In reply to असल्या by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
असल्या
बापरे
In reply to असल्या by मृगनयनी
नाडीवाल्य
In reply to असल्या by मृगनयनी
नयने
सहमत
In reply to नयने by इनोबा म्हणे
सहमत
In reply to सहमत by आनंदयात्री
नयने....
छान
खुप छान
छान
दिदी
Khooop Ch Sunder...
In reply to दिदी by रामदास
लेखन आवडले..
कारण
खूपच छान....
Thanks
In reply to खूपच छान.... by पारोळेकर
खुपच छान
वसंत बापटांची " फुंकर"
अप्रतिम !
Love you all....
Love you all....
एकदम १० वर्षाच्या गॅपनंतर?
In reply to Love you all.... by मृगनयनी
वर पाहताना टारझन, राज
In reply to एकदम १० वर्षाच्या गॅपनंतर? by शशिकांत ओक
उरलेला मजकूर
In reply to एकदम १० वर्षाच्या गॅपनंतर? by शशिकांत ओक
उरलेला मजकूर
In reply to एकदम १० वर्षाच्या गॅपनंतर? by शशिकांत ओक
एकदम १० वर्षाच्या गॅपनंतर?
In reply to Love you all.... by मृगनयनी
एकदम १० वर्षाच्या गॅपनंतर?
In reply to Love you all.... by मृगनयनी
एकदम १० वर्षाच्या गॅपनंतर?
In reply to Love you all.... by मृगनयनी
मॄग्गा आणि तिच्च सगळ्यांवरच
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आँखें मिलानेवाले, दिल को चुरानेवाले मुझको भुलाना नही... :- Nazia Hassan