Skip to main content

जागतिक आर्थिक पेचप्रसंग आणि अरिष्ट

लेखक अभिजीत यांनी शुक्रवार, 19/09/2008 04:06 या दिवशी प्रकाशित केले.

जागतिक आर्थिक पेचप्रसंग आणि अरिष्ट

गेले वर्षभर चालु असलेल्या जगभरातील आर्थिक घसरणमुळे अमेरिकेत आणि जगभरात दीर्घकालीन परिणाम घडतील यात आता काही शंका नाही. वाचकांसाठी हा एक धावता आढावा -

२००३ पासुन विविध आर्थिक क्षेत्रात जगभरात तेजीला सुरुवात झाली. विकसित देश अधिक श्रीमंत होत होते आणि विकसनशील देशात मध्यमवर्ग वाढत होता. यामुळे आता सर्वत्र सुजलाम्-सुफलाम परिस्थिती येणार अशी खात्री अर्थतज्ञ, मोठमोठ्या बँकांमधे मोठमोठ्या पगारावर काम करणारे अधिकारी आणि सरकारी उच्चाधिकारी यांनी द्यायला सुरुवात केली होती. अर्थातच यात या सर्व मंडळींचे हितसंबंध गुंतलेले होते.

वयम् मोठम् खोटम्!

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 17/09/2008 16:33 या दिवशी प्रकाशित केले.

माणूस हा एक विचीत्र प्राणी आहे. जे आपल्यापाशी नाही त्यासाठी झुरत असतो. ईतरांचे सोडा, पण आपल्यापाशी जे आहे त्याचे कौतूक त्याला स्वत:लाच नसते. कुणीतरी नमूद करून ठेवलेच आहे. आपल्या सर्व मित्रांची मुले आज्ञाधारक आणि हुशार असतात. समोरच्या बसस्टॉपवर उभ्या असलेल्या माणसांसाठी पटापट एकाच नंबरच्या दोन दोन बसेस येतात. आपल्या बाजूला मात्र हवी असलेली बस एक तास वाट पहायला लावून येते, आणि आपल्या पुढल्या माणसाला आंत घेतल्यावर कंडक्टर आपल्यावर खेकसतो "दरवाजा छोडो". एकूण आपल्याला जे हवे असते ते आपल्याला मिळतच नाही. चुकूनमाकून मिळालेच, तर ते योग्य वेळी मिळाले नाही असे आपल्याला वाटते.

गणेशोत्सव जपानमधला

लेखक गणा मास्तर यांनी मंगळवार, 16/09/2008 08:06 या दिवशी प्रकाशित केले.

जपानमधील गणेशोत्सवाची काही छायचित्रे पाठ्वीत आहे.
तोक्योमधील ग्योतोकुला भारतीयांनी एकत्र येउन गणेशोत्सव साजरा केला, ही विसर्जन मिरवणुकीची छायाचित्रे

श्रींची मुर्ती

...पुढच्या वर्षी लौक्कर या..! :)

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 16/09/2008 00:11 या दिवशी प्रकाशित केले.

राम राम मंडळी,

गेले १०-१२ दिवस सुरू असलेला गणेशोत्सव काल अखेर संपला. घरोघरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे गणपती काल आपापल्या घरी गेले.

रूपक

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 15/09/2008 09:59 या दिवशी प्रकाशित केले.

एक जंगलात एक माकड रहात होते.माकडाला एकदा वाटले की यदाकदाचित कधी जंगलाचा इतिहास लिहीला गेला तर आपले नाव सुवर्णाक्षरात लिहीले जावे. आपल्या नातू पणतू खापरपणतू यानी आपली नाव अभिमानाने घ्यावे. आपल्या नावाने खानादानाला ओळखले जावे. त्या लोकानी मिशांवर ताव देत म्हणायला हवे की आमचे आजोबा पणजोबा खापरपणजोब इतके शूर होते इतके पराक्रमी होते.त्यानी भिंतीवर फ़ोटो मिरवायला हवे. पुतळे रोज हारानी मढवले जायला हवेत

अत्री जीव नाडी

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 14/09/2008 23:32 या दिवशी प्रकाशित केले.

दिवाळी अंक २००८ साठी
अत्री जीव नाडी
विंग कमांडर (नि)शशिकांत ओक. मोः ०९८८१९०१0४९.

पुणेरी वाहतूक पोलिसाचे वर्तन

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी रविवार, 14/09/2008 18:48 या दिवशी प्रकाशित केले.

पुणेरी वाहतूक पोलिसाचे वर्तन
https://www.loksatta.com/daily/20061111/mv04.htm

प्रतिक्रियेसाठी संपर्क :-
भ्रमणध्वनी - ९८६०२०११०१
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

विघ्नहर्त्यावरचे संकट टळणार?

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 14/09/2008 10:47 या दिवशी प्रकाशित केले.

गणपती बाप्पा, ही बातमी खरी असेल तर तुम्हाला आमच्या उत्सवातली हजेरी संपवुन घरी जाताना काही अडचण येणार नाही असे वाटते.