पुतळा ( लघु कथा )
लेखनप्रकार
पुतळा
------------------------------------------------------
' साहेब ...'
' बोल ...'
' शासनाच्या प्रत्तेक निर्णयाला विरोध करायचा हीच आपली पक्षीय नीती आहे ना ? '
' बरं ? मगं ? '
' मग मुख्यमंत्र्यांच्या नव्या घोषणेचं आपण स्वागत आणि समर्थन कसं केलत ? '
' कोणती घोषणा ? '
' तीच ... शहरातल्या मध्यवर्ती भागात त्या राजनेत्याचा पुतळा उभा करण्याची ?
आपण म्हणालात, की कुठल्या ही विधायक कार्यात आम्ही सत्याधार्यांच्या बाजूने राहू ! सत्ताधारी पक्षाला साथ देऊ ! '
' अरे मूर्खा , पुतळा उभा करण्यासाठी वर्गणी गोळा करावी लागेल .'
' बरोबर ! '
' या कामात आपण त्यांना मदत करु ! '
' का ? '
' म्हणजे वर्गणीचा काही भाग आपल्या खजिन्यात जाऊ शकेल !'
' हं ! हे ही बरोबर ! '
' पुतळा उभा केल्यानंतर कुणी ना कुणी, कधी ना कधी , पुतळयाची विटंबना करणारच ! '
' अं ...'
'...... आणि तसं नाही झालंच, तर आपण ती व्यवस्था करु ... काय?
' पण का ? '
' त्या निमित्याने शहरात दंगा होईल. जाळपोळ, लुटालुट होईल. मग काय, आपली चांदीच चांदी ... काय ?'
' खरंय साहेब ...'
वाचने
2877
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
झकास टोले
सॉरी..
In reply to सॉरी.. by प्रभाकर पेठकर
हेच म्हणते..
चांगली कल्पना
आपल्या
पुतळा कोणाचा?
अरे वा!