Skip to main content

समाज

आंतरजालावरील करामती...

लेखक टुकुल यांनी बुधवार, 08/10/2008 06:59 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मिपावर अनुभवाचे वारे सुरु असल्यामुळे आमचाही अनुभव. ------------------------------------------------------------------------------------ अभियंत्रीकीच शिक्षण संपुनही नोकरी लागत नसल्याने घरीच पडुन होतो, त्यामुळे इकडच तिकडच वाचन चालु होत आणी बरच नवीन शिकायला हि मिळत होत. अथक प्रयतनाने शेवटी लागली नोकरी आणी आंतरजालाचा संबध वाढला. हे चालु असताना, मित्रांना येणार्‍या मेल्स बद्द्ल कुतुहुल वाटु लागले, खास करुन मुली संगणकावर बसुन गोड गोड हसत काहीतरी खरडत, तेव्हा कुतुहल जरा जास्तच.

धनाढ्य एकवीशी

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 07/10/2008 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
धनाढ्य एकवीशी (प्रेरणा- हनुमान चालीसा) जय धन मान सकळ सुखसागर माया वसत त्रीखंडी निरंतर पैसा पैसा पैसा पैसा दिसतो ऐसा, आहे कैसा? लपविला जर टॅक्सची खासा काळा शार बने मग पैसा भरता सरकाराऽचे देणे शुभ्र धन नांदे अभिमाने हिरवा रंग नोटांचा तुमच्या नयनी दिसे झणी लोकांच्या काळ्या नोटा, दिली सुपारी लाल रंग मग धन ते धारी रंगबिरंगी अती पैसा वरचा परीटाकडून शुभ्र करायचा पैसा अपुला रोड भासतो दुसऱ्याचा तो लठ्ठ जाहतो खोटी नाणी, चपळ फ़िराई तांब्याची मोडीत विकाई पेटीत ठेवून कोऱ्या नोटा तुकडेवाल्या जोडून वाटा पैसा नश्वर, आरोप खोटा! शाश्वत आहे प्लास्टीक नोटा उधारीचा तो पैसा प्लास्टीक जपून ठेवती पैसा बॅन
Taxonomy upgrade extras

Indian Idol

लेखक मीनल यांनी रविवार, 05/10/2008 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
कालच परवाच टि.व्ही वर Indian Idol हा कार्यक्रम पाहिला.त्यावर लिहावस वाटलं. म्हणजे मी कार्यक्रमावर लिहिणार नाही.तर त्यातील माणसांबद्दल लिहिणार आहे. सध्या या कार्यक्रमात ऑडिशन चालू असलेली दाखवली आहे.म्हणजे सुरवातीची निवड फेरी. भारतातल्या विविध रंग ढंग असलेल्या देशात विविध ठिकाणी ही Indian Idol ची बस जाऊन निवड फेरी घेताना दखवली आहे. यातील काही निरीक्षण --- खूप मोठाल्या रांगा दिसल्या. तिथे किती वेळ जात असेल याचा सहज अंदाज बांधता येतो.मागे एकदा रात्री २ वाजता गवतावर गोलाकार बसून डब्बा उघडून खाताना काही तरूणांना पाहिले.शर्थ वाटली चिकाटीची. `बस!

माझे सत्याचे प्रयोग

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 02/10/2008 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
टिपः सदर लेखातील हिरव्या रंगातील तिरपी अवतरणे मुस्त सारांश आहे. भाषांतर नाहि मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस पोरबंदरला आजच्या दिवशी जन्माला आला. पुढे हा मुलगा शिकला, आफ्रिकेला गेला. तिथल्या वंशभेदाबरोबर लढला, आफ्रिकेत प्रसिद्धी मिळवून जेव्हा हा माणूस भारतात परतला तेव्हाही भारत पारतंत्र्यातच होता. टिळकांच्या नसण्याने संपूर्ण भारताला एकत्र बांधणार्‍या नेत्याची कमी होती.

कोणार्कच्या मंदिरातील शिल्पे

लेखक धनंजय यांनी बुधवार, 01/10/2008 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : पुढील लेख कल्पनिक नाही. अनुभवाचे वर्णन आहे. --------------------------------------------------------------------------------- एखाद्या रणरणत्या दुपारी काही निमित्त असतं, आपण एकटे चालत चाललो असतो. म्हणतो, "रस्ता रिकामा कसा? इतकीही काही उन्हं नाहीत..." तसं आपलं आपल्याला ठीकठाकच वाटतं. पोचायचं तिथे पोचल्यावर कोणीतरी गडूभर पाणी आपल्यासमोर ठेवतं. पाणी घशाखाली उतरताना अंगावर काटा येतो. मग कळतं की त्या घोटाकरिता जीव केवळ तडफडत होता. अशीच, पण याहून कितीतरी मोठी जाणीव मला वयाच्या पंचविसाव्या वर्षी झाली.

आठवणीतलं नवरात्र

लेखक भाग्यश्री कुलकर्णी यांनी सोमवार, 29/09/2008 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
नवरात्रौत्सवात सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. प्रत्येक गावचा नवरात्रोत्सव हा निरनिराळा असतो. मिरजेत असताना सोवळ्यातला स्वयंपाक हा विषय सोडला तर इतर कर्मकांड फारशी नव्हती. आजी गं. भा. होती. तर आजीचे मोठे दीर दशग्रंथी ब्राह्मण. त्यांना तर आजीच्या हातचे पाणी देखील चालायचे नाही. पण म्हणून माझ्या मैत्रिणी इतर जातीच्या आहेत (म्हणजे ब्राम्हणेतर) म्हणून त्यांना घरी मज्जाव नव्हता. मी ही त्यांच्याकडे मुक्त संचार करत असे. गावात एक अंबाबाईचं मोठं मंदिर होतं. (आजही आहे) वर्षभरातून कधी तरी त्या मंदिरात जाणारे आम्ही मात्र नवरात्रात दररोज जायचो. मंदिराच्या बाजूला जत्रा भरायची.

जागतिक आर्थिक संकट - नवा अध्याय

लेखक अभिजीत यांनी सोमवार, 29/09/2008 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/3581 इथे या पुर्वीचा भाग वाचता येइल. जागतिक आर्थिक संकट - नवा अध्याय सप्टेंबर २००८ च्या मध्यास निर्माण झालेल्या अभूतपुर्व आर्थिक पडझडीतून सावरण्यासाठी जॉर्ज बुश यांनी १८ सप्टेंबरला ७०० अब्ज डॉलर्सची तातडीची मदत जाहीर केली. अमेरिकी काँग्रेसने यावर गेले ७-८ दिवस जोरदार चर्चा केली आणि एक आराखडा अमेरिकी जनतेपुढे आणि पर्यायाने जगापुढे ठेवला आहे. २५० अब्ज डॉलर्सचा पहिला हप्ता सरकार पत-संकटामुळे धोक्यात आलेली कर्जे (होम लोन्स, कर लोन्स, एज्युकेशन लोन्स वगैरे) विविध बँकांकडून विकत घेण्यासाठी वापरेल.

महाराष्ट्र वैभव.

लेखक कलंत्री यांनी रविवार, 28/09/2008 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचा विचार आणि तोही सांस्कृतिक अंगाने केला तर माझ्या मनात खालील विचार आले. महाराष्ट्राचे तीन बा : ज्ञानोबा, तुकोबा आणि विनोबा. ( मराठीभाषेचे आध्यात्मिक जीवन यांच्याशिवाय कसे बरे समजता येईल?) कदाचित चालतेबोलते विद्यापीठच म्हणा हवे तर. महाराष्ट्राचे तीन बाबा : गाडगेबाबा, बाबा(साहेब) आंबेडकर आणि बाबा आमटे. या तिघांनीही पददलितासाठी आपले जीवन वेचले. महाराष्ट्राचे तीन तात्या : तात्या सावरकर, कुसुमाग्रज आणि आपले आवडते सेनानी तात्या टोपे. महाराष्ट्राचे तीन लाडके क्रीडा खेलाडु : खाशाबा, सुनिल गावस्कर आणि सचिन. आपल्या क्रीडा आयुष्यात अनेक अडचणी सोसुन महाराष्ट्राचे नाव पंचखंडात नेले.

कचेरी ते कॉर्पोरेट ऑफीस : एक मनकल्लोळ !!!

लेखक छोटा डॉन यांनी शनिवार, 27/09/2008 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
बघता बघता "जर्मनीला" येऊन २ आठवडे झाले. सगळा वेळ सेटलमेंटमध्येच गेला. भारतातुन निघायच्या १ आठवडा आधी व इथे आल्यावर पहिला आठवडा फ़ार जोशात गेला. नविन जागा, नवा देश, नवी भाषा, नवी संस्कॄती व राहणीमान आणि विचारसारणी व सगळ्यात महत्वाचे म्हणजे "नवे ऑफीस " .... फारच फरक पडला या सर्व गोष्टीत, त्यामुळे मनात एक सुप्त आकर्षण, एक दडपण, एक उत्साह व तेवढाच नव्हर्सनेस अशा भावनांनी पार डोक्यात गोंधळ उडाला होता. असो.

क्रेडिट कार्ड वापरताना जरा सांभाळुन... (आमचा खुप वेगळा अनुभव)

लेखक टुकुल यांनी शुक्रवार, 26/09/2008 08:13 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर्स, नविन लेखन/लेखक असल्यामुळे काहि चुका झाल्यास सांभाळुन घ्या..