मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सरकारी इतमामात मरण.

रामदास · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
त्या काळरात्रीची ही काही प्रकाश(?)चित्रे. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांचे सकारी इतमामात दहन होणार नाही पण मरण मात्र सहज मिळेल सरकारी इतमामात. हे सर्व फोटो मिपा सदस्य आणि एक पत्रकार श्री उदय तानपाठक यांच्या मदतीने. (मा. तात्या अभ्यंकर यांच्या पूर्वपरवानगीने प्रसिद्ध करत आहे.) No man was hacked in the city; those were only names that were murdered. Nobody beheaded anyone; only the severed hats had heads in them And the the blood you see on the streets belongs to the butchered voices. कुणास ठाउक? कधी ? कुठे? केव्हां ? मला भिती वाटते. मरण्याचं ठिक आहे येईल एकदाच अनोळखी अंधार्‍या कोपर्‍यातून भिती वाटते पावलोपावली जगण्याची. हे ताजे रक्त वाळूत वाळेस्तो सावल्या पळून जातील अंधाराच्या आश्रयाला. थोड्या वेळानी उगवेल एखादा चंद्र अंधारावर मात केल्याची देत ग्वाही. एक आणखी दिवस पराभवाचा. या फोटोसोबत कवितेच्या चार ओळी लिहीण्यात काही अर्थ नव्हता पण उद्या फोटो विसरायला होतील पण गुलझारच्या या रुपांतरीत कविता कुणीतरी वाचेल ,लक्षात ठेवील.

वाचने 9043 वाचनखूण प्रतिक्रिया 20

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 02/12/2008 - 09:43
मरण्याचं ठिक आहे येईल एकदाच अनोळखी अंधार्‍या कोपर्‍यातून भिती वाटते पावलोपावली जगण्याची खर आहे! (व्हीटी स्टेशनावर खूप प्रेम असणारा मुंबईकर) तात्या.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषिकेश 02/12/2008 - 11:11
मरण्याचं ठिक आहे येईल एकदाच अनोळखी अंधार्‍या कोपर्‍यातून भिती वाटते पावलोपावली जगण्याची
इतक्या ताकदीच्या शब्दांसोबत खरंच फोटोची गरज होती का? सुन्न होतोच.. त्या सुन्नतेत आता अशी कणा-मणाने भर पडतेय -(गोंधळलेला) ऋषिकेश

मदनबाण 02/12/2008 - 10:44
निघालो घरातुन कधीच न परतण्यासाठी ठेवुन गेलो तुला एकटाच मागे कधीच न भेटण्यासाठी... :( मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

अनामिका 02/12/2008 - 11:29
रामदासकाका जाणिवा बधिर करणारी दृष्य आहेत. खरच आताशा जगायचीच भिती वाटु लागलीय................. "नि:शब्द अनामिका"

सर्किट 02/12/2008 - 12:01
होय, हे फोटो दाखवण्याची गरज होती. हे फोटो राजकारण्यांच्या पोस्टर्स वर का नाहीत ? देशमुखांचा / आबांचा / मनमोहनचा / शिवराजचा वाढदिवस कधी आहे ? त्यादिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या पोस्टरवर ह्यातील एखादा फोटो लावावा असे वाटते. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

देशमुखांचा / आबांचा / मनमोहनचा / शिवराजचा वाढदिवस कधी आहे ? त्यादिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या पोस्टरवर ह्यातील एखादा फोटो लावावा असे वाटते. सर्किटरावांशी सहमत. पण काय माहित, देशमुख हे फोटो रामूच्या पिक्चरच्या पोस्टरसाठीही वापरतील.

In reply to by विनायक प्रभू

सर्किट 02/12/2008 - 12:26
मास्तर, माझं ऐका, पुन्हा पुन्हा त्या सीडीज नका बघत जाऊ. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सर्किटराव, जातीने मास्तर ना. काय करणार. एकदा बघितले. आता मरेपर्यंत मेंदुचा सी.डी. प्लेयर चालूच राहणार.

अनिल हटेला 02/12/2008 - 12:22
.............................. ---------------------- बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

वरील फोटो बघून खरोखर बधिर झालो.... सर्वांच्या मनात प्रवासाचे, आपल्या प्रियजनांना भेट्ण्याचे आणि सु़ख:दुखाचे दोन क्षण एकमेंकाबरोबर व्यतित करण्याचे प्रयोजन केलेले असेल... नियति असे भंयकर रुप घेऊन येईल कुणाच्या मनात पण नसेल... शब्द नाहित इतकचं म्हणेल......... (आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट

लिखाळ 02/12/2008 - 15:43
>मरण्याचं ठिक आहे येईल एकदाच अनोळखी अंधार्‍या कोपर्‍यातून भिती वाटते पावलोपावली जगण्याची. ह्म्म्म ! खरं आहे ! यातल्या एखाद्या जरी फोटोमुळे.. या आधी घडलेल्या अनेक प्रसंगातील एखाद्या जरी क्षणाच्या आठवणीने आपली झोप उडाली तरच उद्या बद्द्ल थोडे अश्वासन देता येईल. -- लिखाळ.