मी आणि नारायण भंगी
माझे अर्धे बालपण एका छोट्या गावात गेले. आमच्या गावात टोपली संडास होते. टोपली संडास म्हणजे पत्र्याच्या मोठ्या तेलाच्या डब्ब्याची एक बाजू कापून दिवस-दोन दिवस विष्ठा जमा करण्यासाठी बनवलेले भांडे. आमच्या वाड्यात एकमेव संडास होता आणि चार भाडेकरू होते. ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर रोज गावभर फिरत असे व या डब्ब्यांतील घाण एकत्र करून घेऊन जात असे. या ट्रॅक्टरच्या ड्रायवरचे नाव नारायण होते. तो, त्याची बायको आणि एक म्हातारी हे गावभर फिरून मैला गोळा करण्याचे काम करत असत.
नारायण - सतत बिड्या फुकणारा, अर्धवयस्क मिशी असलेला, मधला पडलेला दात सोडून सगळीकडे तांबारलेला - येता जाता आम्हा मुलांकडे कौतुकाने पाहत असे.
मिसळपाव