Skip to main content

समाज

घेतल्याशिवाय र्‍हाणार नाय!...

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 28/04/2010 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
पंधरा-वीस वर्षांपूर्वी, मुंबईच्या चर्चगेट स्टेशनातून बाहेर पडून मंत्रालयाच्या दिशेने चालायला सुरुवात केली, की समोरचा रस्ता अनेकदा पोलिसांच्या बॅरिकेडसनी बंद झालेला दिसायचा. सम्राट हॉटेल हे नाव त्या वेळी उभ्या महाराष्ट्राला वर्तमानपत्रांतून दिवसाआड एकदा तरी वाचायला मिळायचं. कारण या पोलिसी बॅरिकेडसचं आणि सम्राट हॉटेलचं त्या वेळी खूपच जवळचं नातं होतं... मग शेजारच्या फूटपाथवरून वाट काढत मंत्रालयाच्या दिशेनं चालायला सुरुवात केली, की उभा महाराष्ट्र त्या रस्त्यावर उतरलाय, असं चित्र दिसायचं...

काल्पनिक सत्यकथा: "बाबाजार!!"

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 25/04/2010 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार संध्याकाळ. कामावरुन घरी परत येत होतो. बसमध्ये भयंकर गर्दी. मला सुरुवातीपासून बसायला जागा मिळाली नव्हती. थोडा प्रवास झाल्यानंतर बसमध्ये एके ठीकाणी बसायला जागा मिळाली. सकाळी विकत घेतलेले वर्तमानपत्र तसेच घडी केलेले बॅगमध्ये होते. सकाळी उभ्या उभ्या प्रवास केल्याने ते वाचायला मिळालेच नव्हते. बसल्यावर वाचायला घेतले. पण गर्दीमुळे नीट वाचता येईना. फक्त मुखपृष्ठावरच्या बातम्यांचे मथळे वाचून झाले आणि पेपर तसाच ठेवून दिला.

अनुभव: अनोळखी आपुलकी

लेखक वसंत वडाळकर_मालेगांव यांनी शनिवार, 24/04/2010 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
(मी मूळचा रहाणारा नांदुर्‍याचा! मी काही काळाकरता कोकणात गुरांचा डॉक्टर म्हणून नोकरीला होतो. आता रिटायर झालेलो आहे.त्यावेळी मला आलेला एक आपुलकीचा साधा अनुभव येथे सांगतो.) ते होते १९६५ साल. जुलै महिना. चौदा तारीख. कोकणात गेल्या सात दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत होता... पाऊस थांबण्याची काही चिन्हे दिसत नव्हती. रात्रीचे दहा वाजले होते. मी झोपण्याच्या तयारीत होतो. तोच दारावर थाप पडली. "डॉक्टर साहेब आहेत काय?" मी दरवाजा उघडला. समोर ५-६ जण उभे होते. एकाच्या हातात गसबत्ती होती. सर्वांच्या अंगावर घोंगड्या होत्या. मांडीला अर्धे धोतर. "आत या!" सर्वजण घोंगड्या झटकून आत आले.

साठीतलं "झपाटलेपण"!

लेखक श्रावण मोडक यांनी शुक्रवार, 23/04/2010 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
दहा-पंधरा वर्षांहून अधिक काळ आपण सातत्यानं भेटत असलेल्या व्यक्तीची पहिली भेट केव्हा झाली हे आठवायचं ठरवलं तर आठवेल? माझ्यापुरतं उत्तर "मुश्कील" असंच आहे. त्यात अशा आठवणी जाणीवपूर्वक पटलावर आणावयाच्या असतील तर आणखीनच मुश्कील. पण तरीही हा एक खेळ होतो. मनाशीच, मनाचा. या निमित्तानं चार मंडळी जेव्हा एकमेकाशी बोलू लागतात अन् त्यातून त्या व्यक्तीची एक नवीनच ओळख समोर येते तेव्हा हा अनुभव विलक्षण ठरत जातो. सुरवात साधीच होती. 'आंदोलन'च्या कार्यकारी संपादक सुनीती सु. र. यांचा फोन आला. "उद्या आपण एकत्र भेटतोय. सुहासचा वाढदिवस आहे, साठावा, त्यानिमित्त..." गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ मी सुहासला ओळखतो.

मुक्तपीठ आणि कमेंट्स

लेखक सुचेल तसं यांनी गुरुवार, 22/04/2010 04:59 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या दृष्टीने सध्या तरी सर्वात विनोदी लेखन म्हणजे सकाळच्या मुक्तपीठमधले लेख आणि (त्याहीपेक्षा) त्यावर पडलेल्या भन्नाट कमेंट्स. पब्लिक बिचारी उत्साहाने लेख लिहिते आणि तलवारी पाजळत असलेले कमेंट बहाद्दर त्यांच्या लेखाची पार खांडोळी करतात. :-) काही उदाहरणे: एक बाई मुलीच्या बाळंतपणासाठी चीनला जाऊन आल्या आणि मुलीला त्या बाळाला हाँगकाँगचा आयडी मिळावा अशी इच्छा होती त्यामुळे ती हाँगकाँगच्या एका दवाखान्यात भरती झाली. त्यामुळे त्या बाळाला चीनचा व्हिसा मिळायला ज्या अडचणी आल्या त्याचं वर्णन बाईनी लेखात केलं होत.

अ‍ॅटमबॉम्ब, खिमा पॅटिस नि चाय

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 21/04/2010 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यपूर्व आशिया हा संपूर्ण जगासाठी अनेक कारणांमुळे महत्त्वाचा, कुतूहलाचा नि विवादांचा ठरलेला भूप्रदेश. प्राचीन काळी जेव्हा पौर्वात्य नि पाश्चिमात्य जगाचे ऋणानुबंध मध्यपूर्वेतून खुष्कीच्या मार्गे होणार्‍या व्यापारातून जुळले, तेव्हापासून ते आज अगदी इराणवर आर्थिक निर्बंध लादणे, इराकवर युद्ध (नि लोकशाही!) लादणे, दुबईमधील समुद्रकिनार्‍यांवर उन्हात चिंब होऊन पडणे, तिथल्या बुर्ज दुबईच्या गच्चीवरून सगळ्या पृथ्वीकडे डोळे भरून पाहणे अशा येनकेनप्रकारेण जुळलेलेच राहिले आहेत.

रेड सन च्या निमित्ताने

लेखक आळश्यांचा राजा यांनी मंगळवार, 20/04/2010 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
ओरीसाचे सध्याचे डी जी पी पूर्वी राज्याचे गुप्तचर प्रमुख होते. राज्याच्या नक्षलग्रस्त भागाची पाहणी करून त्यांनी एक सूचना प्रसारीत केली – रात्रीच्या वेळी गस्त घालताना किमान दोन पोलीस एकत्र असायला हवेत. एके रात्री साहेब सहज बाहेर फिरायला पडले. साध्या वेषात. भुवनेश्वरमध्येच. रात्रीचा दीड दोनचा सुमार असावा. एका पोलीसाने हटकले. बंदूक रोखली. साहेब थांबले. त्याला जवळ येऊ दिला. एका क्षणात त्याची बंदूक यांच्या हातात आली. त्याच्यावर रोखून विचारले, दुसरा कुठे आहे? तर तो दुसऱ्या गल्लीत होता. साहेब हताश झाले. सूचना बाजूला राहू देत; कॉमन सेन्स नको का?

कॉफी शॉप सेशन

लेखक अरुंधती यांनी रविवार, 18/04/2010 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
''रेखे, पोचलीस का गं कॉफी शॉपमधे?'' सुमाचा आवाज ऐकून रेखाने आपला मोबाईल स्पीकर मोडवर ऑन केला. ''तुला काय वाटतंय? तूच ऐक आता... '' रेखाचे वाक्य संपते न संपते तोच मधू व साक्षी दोघींनीही ''सुमे, कुठं अडकली आहेस? अगं कित्ती उशीर लावशील? पोटात कावळे कोकलताहेत, लवकर ये... फाजीलपणा करू नको फार!!! '' अशा आवाजात एकच गजर केला. हसत हसतच कॉल संपवून त्यांनी रेखाकडे पाहिले. रेखा हसत होती खरी, पण त्यात नेहमीचा मोकळेपणा नव्हता. जणू सुमा यायचीच वाट की रेखाच्या मनात कोंडलेली वाफ बाहेर पडायच्या तयारीत होती. सुमा, रेखा, मधू व साक्षी कॉलेजपासूनच्या मैत्रिणी!

नॉनसेन्स!

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 16/04/2010 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आवडत्या पुस्तकांमधील एक पुस्तक म्हणजे ''वन मिनिट नॉनसेन्स''! म्हणजेच एका मिनिटातील निरर्थकता.... अ‍ॅन्थनी डीमेल्लो ह्या लेखकाचे हे तत्त्वज्ञानाचा मोठा आवाका अतिशय छोट्याशा, दैनंदिन स्वरूपाच्या आणि काही वेळा त्यातील मिष्किल छटेमुळे हसवणार्‍या घटनांमधून पेलणारे सुरेख, चटपटीत पुस्तक! No one is exempt from talking nonsense.

शोलेची आग

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 16/04/2010 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर सध्या चित्रपटांविषयी - आवडत्या, नावडत्या, कमी प्रसिध्द, टुकार, भंगार आणि अजून काय काय, बराच काथ्याकूट चालू आहे. त्या चित्रपटांच्या यादीत एक ''शोले''चे नाव वाचले आणि विस्मृतीत गेलेली एक जुनी आठवण ताजी झाली. छोटीशीच पण निरागस! शोले चित्रपट येऊन गेल्यावर बर्‍याच वर्षांनी मी व माझ्या धाकट्या बहिणीने तो पिंपरीच्या एका चित्रपटगृहात ''मॅटिनी''ला पाहिला. तेव्हा आमचे घर त्या चित्रपटगृहाच्या अगदी समोर होते.