Skip to main content

समाज

सावध ऐका (मागल्या) हाका!

लेखक भोचक यांनी सोमवार, 22/03/2010 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
पदार्थाची चव लिहून सांगता येत नाही, तो अनुभवाचा भाग आहे, तद्वतः इंदूरी हाकांचे विश्व हा खास अनुभवाचाच भाग आहे. आता लेखाची सुरवातच खाद्यपदार्थाच्या शब्दाने व्हावी हा खास इंदुरी असल्याचा अपरिहार्य नि अटळ परिणाम आहे. पण तो अट्टल खवय्या असल्याची साक्षही आहे. इंदुरात आल्यावरही इथल्या हाकांमध्ये भिजले नाहीत नि त्या हाका तुमच्या जिभेत भिजल्या नाहीत, तर तुम्ही 'इंदौरकर' कधीच होऊ शकणार नाही. इथल्या भय्याचा उच्चार तुम्ही कोणत्या वेळी, कोणासमोर नि कसा करता यावरही तुम्ही इंदौरी आहात की नाही हे ठरते.

गांधी व मल्ल्या

लेखक पर्नल नेने मराठे यांनी रविवार, 21/03/2010 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
गांधी व मल्ल्या ह्याची बरोबरी होउ शकते का? 8| तात्या तुमच्या राज्यात हे काय चाललय? /:) क्रोधित (चुचु)

आस एक जगण्याची!

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 18/03/2010 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
काल सकाळी पारुबाई कामावर आल्या तेव्हा त्यांचा उजवा गाल टम्म सुजला होता, डोळ्याजवळचा भाग सुजून काळानिळा झालेला! माझ्या छातीत चर्रर्र झालं. "काय हो पारुबाई, कुठं पडलात वगैरे की काय?" माझ्या प्रश्नावर खिन्न हसून पारुबाई चेहरा वाकडा करत म्हणाल्या, "कसलं काय ताई! काल रातच्याला ह्ये लई पिऊन गोंधळ घालीत व्हते म्हनून त्यास्नी बोल्ले तर मार मार मारलन मला! समद्या लोकांसमोर तमाशा केला वर माज्याकडचं पन्नास रुपयं घ्येतलं बळजबरीनं! आता तुमीच सांगा मी पोरांच्या प्वाटात काय घालायचं?" नवर्‍यानं दारु पिऊन आपल्याला बेदम मारले, शिवीगाळ केली ह्यापेक्षा त्या माऊलीला पोरांच्या पोटाची चिंता लागली होती.

प्राचीन साहित्यातील वसंतोत्सव

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 15/03/2010 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
वसंत ऋतू म्हटल्यावर त्याची सांगड बहरलेले आम्रतरु, फुललेले पलाशवृक्ष, शीतल वारे, कोकिळगान, रंगोत्सव व गंधोत्सवाशी घातली जाते. शिशिराच्या कडाक्याच्या थंडीनंतर वसंत ऋतू अवतरतो तेच झाडांच्या निष्पर्ण फांद्यांवर हिरवी, कोवळी, लुसलुशीत पालवी पांघरून! कवी, प्रेमी, कलासक्त, रसिक जनांसाठी वसंतोत्सव म्हणजे साक्षात पर्वणीच! होळी, वसंतपंचमी व शिवरात्री हे तिन्ही उत्सव ह्याच काळात येतात. आपले पूर्वज हा वसंत ऋतूचा उत्सव कसा साजरा करायचे ह्याचीही अतिशय रोचक वर्णने प्राचीन साहित्यात वाचायला मिळतात. पौराणिक कथांच्या अनुसारे वसंत हा कामदेवाचा पुत्र!

न येती उत्तरे

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी रविवार, 14/03/2010 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
न येती उत्तरे
लेखन व दिग्दर्शन:- प्रमोद काळे संगीत:- अक्षय कुलकर्णी नेपथ्य: - सचिन भिलारे प्रकाश योजना:- अपुर्व साठे कलाकार:- हर्षद राजपाठक, मंदार कुलकर्णी निर्मिती: महाराष्ट्र कल्चरल सेंटर पुणे मागच्या टायमाला हे नाटक बघायचं हुकलं. आज अचाकनक ठरवले कि जायच आन संमोहित झाल्यासारखा नाटकाला गेलो. सुदर्शन रंगमंच च्या प्रथेप्रमाणे चप्पल काढुन स्टँडवर लावली. मी हातात धरुन वरती ठेवतो म्हणजे तेवढच सेफ. नाहीतर निम्माजीव चपलेत अडकायचा. आतमधे गेल्यावर फॅन पाहुन खुर्ची पकडली.

महदाश्चर्यम्!

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 11/03/2010 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
महदाश्चर्यम्! मी या व इतर फोरम्सवर नेहमीच लिहीत आलोय् कीं लोकशाहीमध्ये आपण श्रेष्ठींना त्यांच्या धोरणांबद्दल व निर्णयांबद्दल आपला संतोष, राग-संताप त्यांच्यापर्यंत पोचवला पाहिजे व मी हे काम करत असतो, अगदी मनमोहन सिंग-जी, प्रतिभाताई, बराकसाहेब यांच्यापर्यंत!

(तेंडुलकर आणि गांगुली फालतु क्रिकेटर -मायकेल कॅस्प्रोविचचे मत)

लेखक चेतन यांनी सोमवार, 08/03/2010 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
रावसाहेबांचा हा लेख वाचला आणि बाष्कळ चर्चा करणार्‍या फोर्थ अंपायरची आठवण झाली. (रण ही पाहिला होताच म्हणा) ;) असो... इंडिया २४/७ वर राजपाल यादवांनी घेतलेल्या मुलाखतीत मायकेल कॅस्प्रोविचचे सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या भारतातील दोन बुजुर्ग क्रिकेटरांविषयीचे सडेतोड विचार ऍकले/पाहिले त्यांच्या मते: १. सचिन तेंडुलकरने गेली २० वर्षे फक्त रेकॉर्ड बनवण्यापलीकडे काहीही केले नाही.

तात्यांचे आणि मिसळपावचे अभिनंदन ( लोकसत्ता ०७/०३/२०१०)

लेखक JAGOMOHANPYARE यांनी रविवार, 07/03/2010 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या लोकसत्तामध्ये मिसळपाव आणि तात्या यांची एक बातमी आहे. अभिनंदन. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=52…

सूर्याची सावली...

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 07/03/2010 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक समर्पित प्रचारक, धुरंधर राजकारणी आणि ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी चित्रकूट येथे निधन झाले. अखेरच्या श्वासापर्यंत समाजासाठी आयुष्य वेचणार्‍या या महान आणि दुर्मिळ जीवनव्रतीचा कौटुंबिक जिव्हाळ्यातून उतरलेला एक सुंदर लेख 'लोकमत' मध्ये प्रसिद्ध झालाय. तो हा लेख : सूर्याची सावली गाढ झोपेत असतानाच अचानक फोन वाजला, आणि झोप चाळवली. इतक्या पहाटे किंवा रात्रीबेरात्री वाजणारे फोन घेणं अलीकडे मी टाळतो. पण त्या दिवशी फोन वाजताच मला जाग आली, आणि मी फोन कानाला लावला. पलीकडे मुंबईहून माझा भाऊ होता... 'रमेश, नानाजी गेले'...