Skip to main content

समाज

व्यवसायभिमुख शिक्षण

लेखक सुवर्णमयी यांनी बुधवार, 31/03/2010 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
व्यवसायाभिमुख शि़क्षण चित्रातला गुलाबाचा बुके पाहून त्याला आठवले तिच्या डाव्या वक्षावरचे गोंदण.. ते राहिलेच काल.. तो स्वतःशी पुटपुटला प्रदर्शनात तिला मात्र आवडले होते हत्ती घोडे आणि मांजर घरी आल्यावर ती कामवाल्या बाईला सांगत होती तिला आवडत ते त्याला कस पटत नाही.. "नवरा हाय म्हणून हाय सगळी कटकट असला तरी कटकट आनि नसला तरी बी.." फरशी पुसत बाईने उत्तर दिले. शाळेत सहाव्या सातव्या वर्गातली मुले सचित्र शिकत होती नर मादी आणि प्रजनन व्यवसायाभिमूख शि़क्षणाचे अवलंबन केल्याबद्दल शिक्षणमंत्री टाळ्या घेत होते -सोनाली जोशी

अदृश्य डोळ्यांनी अनुभवलेलं साहित्य संमेलन

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 30/03/2010 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या साहित्य संमेलन बरंच गाजतंय...नव्हे, गाजवलं जातंय! नवे नवे वाद, नव्या बातम्या, नवे विषय.... अशाच ह्या बातम्या वाचताना मला 'त्या' साहित्यसंमेलनाची आठवण झाली. एक असं साहित्य संमेलन जे मी तिथे हजर न राहताही अनुभवलं.... नाही, नाही.... मला संजयासारखी दिव्यदृष्टी नव्हती प्रदान केली कोणी! ना मला धृतराष्ट्रासारखा चिंतातुर बाप ''काय काय दिसतंय ते सांग झणी'' म्हणून सतावत होता. मी इकडे पुण्यात..आणि संमेलन तर दूर गावी!

भिकारी

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी सोमवार, 29/03/2010 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळी फेरफटका मारताना गल्लीतील भुभ्यांबरोबर थोडस खेळल्यावर पुढे गेलो. भुभ्यांच्या गार गार नाकाचा सुखद स्पर्श मनात रेंगाळत होता. चालता चालता कोपर्‍यावर एक भिकारीसदृष माणुस स्वत:शीच बोलत होता. "हरामखोर साले ....... " अज्ञात व्यक्ति वा समुहाबद्दल मनात विखार होता. भाषा हिंदी वाटत होती. नजर शुन्यात होती. दाढी वाढलेली. अगदी ग्रीक तत्ववेत्यांसारखी. पॆंट शर्ट मेणचट्ट.मध्यम बांधा, उंची अंदाजे पावणे सहा फुट. तिरिमिरीत चालत होता. माझे लक्ष त्याच्याकडेच होते.लोक त्याला टाळत होते. पण त्याला कशाचीच फिकीर नव्हती. त्याला न्हाउमाखु घातले असते व चांगले कपडे घातले असते तर रुबाबदार दिसला असता.

कॅलेब

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 26/03/2010 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
कॅलेब ओबुरा ओब्वांतिनिका.... मध्यंतरी टीव्ही च्या कोणत्या तरी चॅनलवर एक गाजलेला मराठी चित्रपट लागला होता. ''मुक्ता''. सोनाली कुलकर्णी, विक्रम गोखले, डॉ. श्रीराम लागू, अविनाश नारकर ह्या अभिनय क्षेत्रातील नामवंत मंडळींचा समावेश, जब्बार पटेल ह्यांचे दिग्दर्शन... अशी भट्टी जमल्यावर खरे तर चित्रपट सुपर ड्यूपर हिट व्हायला हवा होता. पण बहुधा तसे झाले नसावे. चित्रपटात हाताळलेल्या संवेदनशील विषयामुळे असेल कदाचित. पण ह्या चित्रपटात एक व्यक्ती मात्र भरपूर भाव खाऊन गेली. कॅलेब ओबुरा ओब्वांतिनिका.... माझा वर्गमित्र. मला कॉलेजमधील ते सुरुवातीचे दिवस अजूनही आठवतात.

चित्रगुप्ताची कैफ़ियत : दस्तुरखुद्दांचि अजब, अनोखी, दिलकश दास्तान

लेखक चित्रगुप्त यांनी गुरुवार, 25/03/2010 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
सदर लेख संपादित करून जितके शक्य होईल तितके शुद्धलेखन सुधारले आहे. -शुद्धलेखनाचा आग्रह असणारा मिपा संपादक. चित्रगुप्ताची कैफ़ियत दस्तुरखुद्दांचि अजब, अनोखी, दिलकश दास्तान : भाग १. नमस्कार मंडळी, मी चित्रगुप्त......

अरुनाचल...

लेखक अभिषेक९ यांनी बुधवार, 24/03/2010 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
अरुणाचलचा दौरा संपला। प्रवास, प्रवास अणि फ़क्त प्रवास! तब्बल ८ राज्य, १७ नद्या (गोदावरी, वर्धा, महानदी, संख, गंगा, ब्रह्मपुत्रा,लोहित), दक्खनच्या पठारावरून सातपुड्याच्या दक्षिणेकडून दंडकारण्य, मग छोटा नागपूर करून गंगेचे विस्तीर्ण मैदान, अहोमच्या पुण्यभूमीतून अरुणाचल गाठले! एकंदर प्रवास ९००० कि.मी. चा... १५ दिवस... १२ वीर..

अमृत महोत्सवासाठी काढण्यात आलेले भित्तिचित्र...

लेखक डावखुरा यांनी सोमवार, 22/03/2010 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
सर जमशेटजी जीजीभाई उपयोजित कला महाविद्यालय्, किल्ला[फोर्ट], दा.नौ.मार्ग, मुम्बई.४००००१.