Skip to main content

कर्मण्येवाधिकारस्ते . . .

लेखक दत्ता काळे यांनी शुक्रवार, 05/03/2010 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
छोटेखानी जुना बंगला अन् त्यातला म्हातारा मालक . . आपल्या परदेशस्थित मुलाच्या चार दिवसाच्या वास्तव्याच्या तयारीत . . अंगणभर विखुरलेल्या पानांचा पसारा झाडताना बघतो फाटकाला बिलगलेल्या मधुमालतीच्या वठलेल्या वेलीच्या खोडाकडे . . आणि विषादाने हसत परत झाडू लागतो फाटकापासून बंगल्यापर्यंत नेणारी, खचलेल्या सुट्ट्या फरश्यांची कर्मयोगी पायवाट . . . पानांचे मळभ हटल्यावर मोकळी . शुष्क पानगळ सुरुच राहते. गोळा केलेली ढिगाराभर पाने, पेटवून देऊन थांबतो म्हातारा धगीपाशी लवलवणार्‍या ज्वाळा बघून विषादाने हसतो आणि स्वतःलाच म्हणतो गतिमान काळाच्या चक्रात अगतिकपणे बांधून घेतलेला तुझा मुलगा, कधीतरी . . .नंतर . . . शेवटपर्यंततरी थांबेल कां, फुटेपर्यंत ?
लेखनविषय:

वाचने 1257
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

मुक्तक आवडले... मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

फाटकापासून बंगल्यापर्यंत नेणारी, खचलेल्या सुट्ट्या फरश्यांची कर्मयोगी पायवाट . . . पानांचे मळभ हटल्यावर मोकळी .
हे छान झालंय.
गतिमान काळाच्या चक्रात
थोडं कृत्रिम वाटतं.
फुटेपर्यंत?
खूप प्रभावी आहे. राजेश

दत्ताबुवा, कविता खूप प्रभावी वाटली.. सुरेखच! तात्या.