खाण्याच्या सीरिअल्सचे दोन रिकामे, जुने बॉक्सेस हे माझा अतिशय मौल्यवान ठेवा आहे हे सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
१९९९ साली जेव्हा मी भारतातून मिशिगन टेक्नॉलॉजिकल युनिवर्सिटीत अमेरिकेकडे यायला निघालो तेव्हा माझ्या खिशात पहिल्या सत्राच्या फीला पुरतील इतके $९३०० चे प्रवासी चेक्स होते. माझ्या शिक्षणाकरता आमच्या घरावर कर्ज काढायची तयारी माझ्या वडिलांनी चालवलीच होती परंतु माझ्या मनात मात्र माझ्या शिक्षणासाठी घरच्यांवर हा कर्जाचा डोंगर नको हे ठाम होते!
पुढची चार वर्षे मी सफाई कामगाराचा मदतनीस ते प्रयोगशाळेतला असिस्टंट अशी सर्व प्रकारची कामे केली. हातातोंडाची गाठ पडावी ह्याकरता आठवड्याला ७ डॉलर अशा अतिशय तुटपुंज्या रकमेत मी दिवस काढले. त्यावेळचे आठवड्याभराचे सगळे हिशोब माझ्या आठवणीत अगदी पक्के कोरले गेलेत - दूध $१.१९, ब्रेड $०.८९, टूथपेस्ट आठवड्याच्या सरासरीने $०.३४, साल्वेशन आर्मीमधले डोनेशन केलेले कपडे, तेही असेच सरासरी $०.२७ - चुकूनमाकून कधी $७ पेक्षा कमी खर्च झालाच तर जमलेली चिल्लर मी जिवापाड जपत असे, अगदी पेनी अन पेनी! युनिवर्सिटीतल्या वाचनालयातलीच पुस्तके वापरण्याखेरीज माझ्याकडे मार्ग नव्हता इतकेच नव्हे तर रेस्तरॉंमधल्या भांडी धुण्याच्या कामाचे मोल मला फार होते कारण त्यानंतर मिळणारे "मोफत जेवण"! हळूहळू मी सरावलो तसा नवीन संधींचा शोध घेण्याची मानसिकता तयार झाली. २००१ साली मी मॅग्ना-डॉनेली कॉर्पोरेशन ह्या कंपनीकडे बिनपगारी समर इंटर्न म्हणून रुजू झालो.माझ्या जिवापाड काम करण्याने तीनच महिन्यात मला पूर्णवेळ पगारावर बढती मिळाली ती पुढचे ९ महिने!
डिसेंबर २००३ मधे जेव्हा मला पदवी मिळाली तेव्हा माझ्या बचत खात्यामधे शिल्लक होती $२२९ पण माझ्या डोक्यावर एका पेनीचेही कर्ज नव्हते! आठवड्याच्या शेवटी वाचवलेल्या पेनीज जमा केल्या तर $३.२४ जमले होते, अगदीच किरकोळ रक्कम होती ती पण माझ्या पदवीच्या पहिल्या वर्षापासून जे 'हनी बंचेस ऑफ ओट्स' चे दोन बॉक्सेस मला खुणावत होते ते घेण्याइतकी नक्कीच!
अजूनही ते बॉक्सेस मी जिवापाड जपलेत कारण माझ्या आयुष्यातला एक अतिशय कठिण काळ, ज्यावेळी मला माझे शिक्षण, माझा वीसा, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून काम करण्याचे मर्यादित तास, एका संपूर्णपणे अपरिचित देशात राहण्याचा ताण ह्यांनी माझे दूरगामी लक्ष्य ढळू नये ह्याकरता मला बळ दिलं, हे सगळे सगळे मला त्या दोन खोक्यांमधे दिसतं!
त्या चार वर्षात कमावलेल्या आत्मविश्वासामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधल्या दोन पूर्णवेळ समर इंटर्नशिप्स मी नाकारु शकलो आणि अॅनालॉग डिवायसेस ह्याच कंपनीत समर इंटर्नशिप मिळवली कारण मला माझ्या आवडत्या इलेक्ट्रॉनिक्सच्याच क्षेत्रात काम करायचं होतं! तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा अॅनालॉग डिवायसेसच्या क्लायंट केअर ग्रुपमधे येण्याची ऑफर जेव्हा मला मिळाली तेव्हा माझ्यासमोर पेच होता की मी नुकतीच मिळवलेली प्रॉजेक्ट लीडरशिपची जबाबदारी घेऊ की ती ऑफर स्वीकारु? पुन्हा एकदा माझ्या तात्कालिक चिंतांवर मात करीत मी ती ऑफर स्वीकारली कारण त्यामुळे मला कंपनीची बिझनेस ऑपरेशन्स कशी चालतात हे बघण्याची संधी मिळणार होती. माझे आवडते 'हनी बंचेस ऑफ ओट्स' खातखातच मी हा निर्णय घेतला होता हे सांगणे न लगे!
---------------------------------------------------------------
(आमच्या कंपनीमधला एक इंजिनिअर शिकागो युनिवर्सिटीत एम बी ए करायला निघालाय. त्याच्याशी बोलताना त्याने मला सांगितले की युनिवर्सिटीसाठी त्याने एक निबंध लिहिलाय त्यात त्याने स्वतःची कहाणी दिली आहे. ती वाचल्यावर मला आश्चर्य वाटले. त्याच्याशी आणखीन बोललो तेव्हा समजले की गेल्या ११ वर्षात तो भारतात फक्त एकदा जाऊ शकला कारण पैसेच नव्हते! वयाच्या १२ व्या वर्षी त्याची आई गेली तेव्हापासून मोठे होऊन अमेरिकेत शिक्षण घ्यायचे हा ध्यास त्याने घेतला. तो पूर्ण केला. गेल्या सहा वर्षातली बरीचशी कमाई तो पुढची दोन वर्षे एमबीए करण्यासाठी खर्च करेल आणि मग आणखीन मोठ्या पदावर काम करण्याची त्याची इच्छा पूर्ण होईल!
त्याला विचारुन मी त्या निबंधाचं भाषांतर मिपाकरांसाठी सादर केलं. हे करण्यामागे दोन उद्देश होते - एकतर सुस्थितीतल्या मुलामुलींना अशा कठिण परिस्थितीतून पुढे आलेल्या लोकांचे ताजे आदर्श डोळ्यांसमोर नसतात ते मिळावेत आणि दुसरे असे की अमेरिकेत येणारे सगळेच लोक हे पिसांच्या विमानावर बसून येतात आणि मजेत शिक्षण घेत गुबगुबीत खुर्चीत बसून नोकर्या करतात असा ज्या लोकांचा समज असेल तर तो काही अंशी दूर व्हावा!)
वाचने
9924
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
जिद्दीला सलाम आणि पुढील
सहमत
In reply to जिद्दीला सलाम आणि पुढील by स्वाती२
अगदी पूर्णपणे नसली तरी
In reply to जिद्दीला सलाम आणि पुढील by स्वाती२
बूथला नाही
In reply to अगदी पूर्णपणे नसली तरी by खालिद
समजले नाही
In reply to बूथला नाही by चतुरंग
ओके असू शकेल.
In reply to समजले नाही by आमोद शिंदे
आज, आत्ता
+ अगदी!
In reply to आज, आत्ता by श्रावण मोडक
>>घर्ष हे इथून तिथून सारखेच
In reply to + अगदी! by चतुरंग
सगळीकडेच असे आहे
In reply to आज, आत्ता by श्रावण मोडक
खडतर..
त्या मित्राच्या जिद्दीचे
माझी आठवण...
In reply to त्या मित्राच्या जिद्दीचे by ऋषिकेश
विकास
In reply to माझी आठवण... by विकास
उत्तम
मिशिगन मध्ये मॅसॅच्यूसेट्सपेक्षा खूपच
In reply to उत्तम by चित्रा
पोचला..
In reply to मिशिगन मध्ये मॅसॅच्यूसेट्सपेक्षा खूपच by चतुरंग
सहमत आहे
In reply to उत्तम by चित्रा
चतुरंग यांनी उत्तम काम केले आहे
छानच!
In reply to चतुरंग यांनी उत्तम काम केले आहे by विलासराव
अजुन एक
गेल्या सहा वर्षातली बरीचशी
आपल्यापैकी बर्याच लोकांनी कष्ट उपसले आहेत
In reply to गेल्या सहा वर्षातली बरीचशी by आमोद शिंदे
>>असे तुला का वाटले? मी इतर
In reply to आपल्यापैकी बर्याच लोकांनी कष्ट उपसले आहेत by चतुरंग
अच्छा मग आपण दोघे वेगवेगळ्या
In reply to >>असे तुला का वाटले? मी इतर by आमोद शिंदे
लेख आवडला. तुमच्या मित्राचे
७$ चा हिशेब
पुन्हा एकदा सांगतो
In reply to ७$ चा हिशेब by सोम्यागोम्या
गाभ्याची गोष्ट
In reply to पुन्हा एकदा सांगतो by चतुरंग
स्फूर्तिदायक. बाकी काही
लेख आवडला
मूळ लेख पीडिएफ स्वरुपात माझ्याकडे आहे तो पाठवतो.
In reply to लेख आवडला by प्रियाली
जिद्दीचे कौतूक, वाटचालीसाठी शुभेच्छा
+१
In reply to जिद्दीचे कौतूक, वाटचालीसाठी शुभेच्छा by धनंजय
धन्याशेठ,
In reply to जिद्दीचे कौतूक, वाटचालीसाठी शुभेच्छा by धनंजय
एकदम बरोबर धन्याशेठ!
In reply to धन्याशेठ, by मिसळभोक्ता
+३
In reply to जिद्दीचे कौतूक, वाटचालीसाठी शुभेच्छा by धनंजय
च्च! $७ वरुन किती काथ्याकुट!
प्रतिसाद
हि आमची फार फार आवड्ती
एक प्रेरणादायी अनुभव कथन दिला
असेच
In reply to एक प्रेरणादायी अनुभव कथन दिला by मदनबाण
हल्लीच
धनंजय, श्रामो आणि मिभोकाकांचे
In reply to हल्लीच by मिसळभोक्ता
हिरव्या नोटांच्या खाली अशा
In reply to हल्लीच by मिसळभोक्ता
>>अनुभव आवडला. हिरव्या
In reply to हल्लीच by मिसळभोक्ता
मास्तर ? मास्तर कुठे आहात ?
जिद्दीला सलाम. इथे साला
सहमत आहे.
In reply to जिद्दीला सलाम. इथे साला by परिकथेतील राजकुमार
१) पुढची चार वर्षे मी सफाई
सहमत आहे
In reply to १) पुढची चार वर्षे मी सफाई by Pain
प्रत्येकाची लढाई वेगळी असते.
>>>सांगायचा मुद्दा हा की
In reply to प्रत्येकाची लढाई वेगळी असते. by विंजिनेर
पण डोक्यात कुठेतरी किडा
In reply to >>>सांगायचा मुद्दा हा की by चतुरंग