शिट्टी अन सोडा
उन्हाळा धगधगू लागला की पोटातली भगभग थंड करण्याकामी चौक गाठावा लागायचा. तिथे मन्सूरभाईचा दाढीमय चेहरा आपल्या हातगाडीभोवती जमलेल्या गर्दीतून कधीतरी झळकायचा. तो सतत आपल्या कामात गर्क असलेला दिसायचा. भर उन्हात काहिली कमी करावी म्हणून पावलं आपोआप मन्सूरभाईच्या गाडीकडे वळायची.
त्याची हातगाडी म्हणजे रंगीबेरंगी थंड पेयांचं आगरच होतं. बर्फाचा तुकडा किसून छोट्या ग्लासात काडीसह दाबायचा व अखंड बाहेर काढून त्यावर तिरंगी वेगवेगळ्या बाटल्या उपड्या करुन रंगकाम केले की झाला दिलचाहा बर्फाचा गोळा तयार! तो काडीने आडवा धरुन त्यातील थंड गोड पाणी सुर्रऽऽ करुन पिणे म्हणजे रणरणत्या दुनियेत शितलतेचा अमृतवर्षाव ठरायचा.
मिसळपाव
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील फाळकेवाडी हे अगदी छोटेसे गाव ! गावाची लोकसंख्याही जेमतेम ३५०-४०० . पण या छोट्याशा गावातील दारिद्य्ररेषेखालील महिलांनी एक वेगळाच आदर्श सर्वांपुढे ठेवला आहे.हल्ली आदर्श म्हटलं कि अनेकांच्या भुवया वर जातात. पण फाळकेवाडीतील या महिलांनी "आदर्श महिला बचत गटा'द्वारे कडधान्याची शेती केली आहे.