Skip to main content

समाज

थरार : नको इतका जवळून !!

लेखक चिगो यांनी मंगळवार, 06/05/2014 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
धिक्कार ते अधिकार नावाची माझी लेखमाला मिपावर यायला आता चार वर्ष झालीत. ह्या चार वर्षांत मिपाच्या आणि माझ्या आयुष्याच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. "अधिकारानंतरचं वाचायला उत्सुक आहे" म्हणणारे श्रामो आणि यकु माझे हे अनुभव वाचायला नाहीत, ही बोचही आहेच. पण आयुष्याच्या पुलाखालून वाहणार्‍या ह्या पाण्यात रक्ताचा गढूळ रंग आता मिसळायला पाहतोय म्हटल्यावर विचार केला की चला, काही अनुभव लिहून ठेवुयात..

आव्हान जम्मू आणि काश्मीरातील छुप्या युद्धाचे

लेखक नरेंद्र गोळे यांनी मंगळवार, 06/05/2014 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या देशाला ज्या अवघड प्रश्नांचा मुकाबला गेल्या काही वर्षांत सातत्याने करावा लागत आहे त्यांत काश्मीरातील, पाक-प्रायोजित छुप्या युद्धाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. ह्या विषयावरील, ब्रिगेडिअर हेमंत महाजन ह्यांचेसारख्या जाणकार व्यक्तीने लिहिलेले हे पुस्तक १०-०५-२०१४, शनिवार रोजी, पुण्यात प्रकाशित होत आहे. ह्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद त्यांनी माझेकडूनच करून घेतलेला आहे. तेव्हा ह्या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहावे.

काही लोक ना उगाच जरा जास्तच करतात प्रायव्हसी प्रायव्हसी!!

लेखक निनाद यांनी सोमवार, 05/05/2014 07:54 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वी मला वाटायचे की कसली प्रायव्हसी? काही लोक ना उगाच जरा जास्तच करतात प्रायव्हसी प्रायव्हसी! माझ्या सर्च त्या काय असणार आणि त्यातून कुणाला काय फायदा असणार? पण एकदा सहज आपला गुगल इतिहास पाहिला आणि हादरलोच! माझ्या काय वाटेल त्या सर्चेस तेथे तरिखवार जपून ठेवलेल्या होत्या. अगदी एयरक्रॅश इन्वेस्टिगेशन ते नर्मदा परिक्रमा. तरी विचार केला की मग काय बिघडले? बिघडले हे की मी काय आणि कसा विचार करतो यावरून या कंपन्या माझे प्रोफाईल तयार करतात. मग मला जे 'आवडेल' तेच मला जालावर पुरवतात.

महाराष्ट्रातल्या निवडणूकीचे अंदाज

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 03/05/2014 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत... त्यातल्या किती जागा कोणाकडे जातील... सगळ्यांना उत्सुकता आहे याबाबतचा अंदाज वागळेंच्या कार्यक्रमातला वर्तवण्यात आला आहे आपण तो अवश्य पहावा https://www.youtube.com/watch?v=itWhYgG4It0 काँग्रेस-राष्ट्रवादी १६-१८ महायुती - ३०-३२ यात मनसेचा एखादा उमेदवारही असू शकतो- कल्याण सुरेश म्हात्रे सिंधुदुर्गमधल्या लढतीची सगळ्या महाराष्ट्राला उत्कंठा आहे... मुंडेंना ही निवडणूक अवघड जाइल... विदर्भ लाटेमधे वाहून जाईल मावळमधे कुणीही आलं तरी मताधिक्य मात्र अगदी कमी असेल...

चलती का नाम गाडी- ४: प्रदूषण नियंत्रण ( युरो नॉर्मस )

लेखक खेडूत यांनी शुक्रवार, 02/05/2014 03:54 या दिवशी प्रकाशित केले.
चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल चलती का नाम गाडी-२ गुंतागुंत चलती का नाम गाडी- ३: नवी फीचर्स आपण सगळ्यांनी कधीतरी दुचाकी किंवा कार नक्कीच चालवलेली असते. दुचाकीवर फिरण्यात जी मज्जा आहे ती चारचाकीतून नाही! मस्त कट मारत अगदी जिथे जायचंय तिथे अगदी पायरीपर्यंत थेट जाता येतं. अलीकडे बाइकच्या दोनच गोष्टी नकोशा वाटतात एक त्यातली असुरक्षितता आणि प्रचंड प्रदूषण!

केंद्र परिघाचं नातं

लेखक आतिवास यांनी बुधवार, 30/04/2014 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
(लेख फार पूर्वी अन्यत्र प्रसिद्ध झाला आहे; सहज आठवला म्हणून मिपाकरांशी शेअर करत आहे) वैशाखातलं रणरणतं उन शहरातल्या कार्यालयात टेबल-खुर्चीवर बसताना जास्त जाणवतं. त्या दिवशी कळवण तालुक्यातल्या एका आदिवासी पाड्यावर उंबराच्या झाडाखाली मस्त गारवा होता. दहा बारा स्त्रिया त्यांच्या उत्सुक चेह-यावरचा संकोच लपवत माझ्याभोवती बसल्या होत्या. बुटक्या झोपडीच्या दारात एक पोर हाताशी आणि एक कडेवर घेऊन एक मुलगी उभी होती. दूरच्या खाटेवर एक आजोबा ‘कशातच अर्थ नसल्याच्या’ अविर्भावात बसले होते. तो होता स्त्रियांचा बचत गट. मी त्यांच्याशी गप्पा मारत होते. नेहमीसारखीच ओळख करून घेण्यापासून सुरुवात.

थोड positive थोड negative

लेखक मालविका यांनी सोमवार, 28/04/2014 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
एस टि तिल काही अनुभव कायम स्वरूपी लक्षात राहिले. सध्याच्या महिलन्वरिल वाढत्या अत्याचारचे प्रमाण बघता हे अनुभव मला नेहमी आठवतात. मी पुण्याला नोकरी करायला होते.

दिल्लीतील पहिला वहिला कट्टा

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 27/04/2014 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रगुप्त उवाच: दिल्लीचा उन्हाळा, आणि वेळ दुपारी चारची ठरलेली. आम्ही तिघे, म्हणजे विवेक पटाईत, अरूण जोशी आणि मी बरोबर एकाच वेळी 'त्रिवेणी कला संगम' या ठरलेल्या ठिकाणी पहुचलो. तिथल्या उघड्या आभाळाखालच्या उपहारगृहामध्ये बसावे असा विचार करून तिकडे मोर्चा वळवला, पण संध्याकाळी रम्य वाटणारी ती जागा अजून चांगलीच गरम होती. मग आता कुठे जावे, असा विचार करत एक-दोन जागा बघून शेवटी एक-दीड किलोमीटर अंतरावर असणार्या नवनिर्मित 'महाराष्ट्र सदन' मध्ये पहुचलो.

डेटिंग गेम - डिनरडेट - हलकाफुलका धागा

लेखक शुचि यांनी रविवार, 27/04/2014 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
अतिशय हलकाफुलका, जंत्रीवजा बराचसा निर्बुद्ध आणि हुच्चभ्रूच्या अगदी विरुद्ध निव्वळ मनोरंजनात्मक व पाश्चात्य (विशेषता: अमेरॆकेअन) संस्कृतीत जो डेटिंग गेम चालतो त्यात सर्वसाधारण कोणत्या नियमांवर खेळ खेळला जातो त्याचे उथळ चित्रण करणारा हा धागा असून सर्वांनी हलका घ्यावा अशी विनंती. धागाकर्ती सर्व मुद्द्यांशी सहमत असेलच असे नाही. जड्व्यागळ धाग्यांपासून हटके , डोक्यास नो कल्हई असे या धाग्याचे स्वरूप आहे. तसेच या धाग्याला स्त्री-पुरुष लढाईचा आखाडा बनवू नये, अथवा ...... ऑन सेकण्ड थॉट बनवा ना माझ्या तॆर्थरुपांचे काय जाते.

काळू बाळू

लेखक विकास यांनी शनिवार, 26/04/2014 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
Kaloo Baloo कधीकाळी लहान असताना दूरदर्शनवर काळूबाळूचा तमाशा - वगनाट्य पाहील्याचे आठवते. कदाचीत मुलाखती देखील ऐकल्या असतील. पण विसरून गेलो होतो. आत्ता म.टा. मधे तमाशा कलावंत 'बाळू' कालवश बातमी वाचली. काळू चे २०११ ला निधन झाले आणि ८२ वर्षीय बाळूचे काल निधन झाले...