Skip to main content

समाज

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१४

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 27/08/2014 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१३ मी बराचसा अंतर्मुख..आणि काही काळ गप्प! ============= हुश्श्स्श्स.......! आणि फोटोंच्या कचाट्यातून कसाबसा एकदाचा तो कान-पिळून होतो.आणि गाडी म्होरल्या ठेसनात येते..ती सप्तपदीच्या! हा मात्र दोन्ही बाजुच्या सर्व आज्जी-बायांचा अत्यंत कौतुकाचा शीन बरं का! इथे येणारे (आनंद)अश्रूही खरे! दोन्ही हात उंचाऊन लांबूनच दिले गेलेले आशिर्वादही खरे. आगदी मंत्रांशिवाय केला हा विधी तरी चालेल...असं माझ्या सारख्याला वाटणारा हा विधी आहे.

वर्धमान ते महावीर

लेखक दशानन यांनी मंगळवार, 26/08/2014 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
सुवर्णमयी पालखीतून मुलायम असा गौरवर्णीय हात बाहेर आला, व पालखी जागेवरच थांबली. पालखीतून तो खाली उतरला, नगर खूप मागे राहिले होते, समोर हिरवेगार जंगल दोन्ही हात पसरून जसे याच्या स्वागतासाठी उभे होते.. पश्चिमेला मावळत असलेल्या सूर्याला त्याने मनलावून नमस्कार केला व मागे वळून त्याच्या मागोमाग आलेल्या जनसमुदायाला देखील विनम्रपणे नमस्कार केला. आपल्या जन्मभूमीला वंदन केले आणि अंगावरील दागिने एक एक करून काढून बाजूच्या दगडावर ठेवले, शरीरावरील रेशमी, राजेसी वस्त्रे तेथेच त्याने काढून ठेवली. चेहऱ्यावरून दोन्ही हात फिरवताना सहजच हात कानापाशी थबकले...

माझ्या मुलाला आकुर्डी, पुणे, इथे पेइंग गेस्ट किंवा भाड्याने घर हवे आहे...

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 24/08/2014 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की, माझ्या मुलाला इंजिनियरिंग साठी आकुर्डी इथल्या इंजिनियरिंग कॉलेजला प्रवेश मिळाला. सध्या तो जागेच्या शोधात आहे. आपल्या मिपाकरांपैकी कुणाकडे आकुर्डीला भाड्याने जागा उपलब्ध असेल तर फार उत्तम. बादवे, जमल्यास आकुर्डीतल्या घरगूती खानावळीची माहिती दिलीत तर फार उत्तम. आणि इंजिनीरिंगच्या क्लासेसची माहिती मिळाली तर फार उत्तम. कळावे लोभ आहेच, तो वाढावा... मुवि (सध्या मुक्काम पोस्ट यानबू उर्फ यानबिवली.)

दहीहंडी

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 24/08/2014 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
दरवर्षीप्रमाणेच कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह जोर धरत होता. दहीहंडीसाठी शहराशहरात, गावागावात गोविंदापथकं तयारी करत होती. पण जेमतेम दोन हजार लोकवस्तीच्या सुजाणपूर मधलं चित्रं काही वेगळंच होतं. सरपंचांच्या आदेशानंतर दहीहंडीला एक आठवडा उरलेला असल्यापासूनच गावात हंड्या उभारल्या गेल्या होत्या. गावाच्या प्रत्येक पाड्याची एक हंडी अशा प्रकारे एकूण दहा दहीहंड्या गावात उभारल्या गेल्या. या हंड्या गोपाळकाल्याच्या पाच दिवस आधीपासूनच उभारल्या गेल्या. या हंड्यांची उंची इतकी होती की जिथे लहानात लहान मुलाचाही हात सहज पोचेल. म्हणजे जेमतेम दोन फूट.

चलती का नाम गाडी- ५: वाहन चौर्य प्रतिबंधन

लेखक खेडूत यांनी शनिवार, 23/08/2014 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल चलती का नाम गाडी-२: गुंतागुंत चलती का नाम गाडी-३: नवी फीचर्स चलती का नाम गाडी-४: प्रदूषण नियंत्रण (युरो नॉर्मस) मागील भागांमध्ये आपण वाहन उद्योगातले विविध घटक आणि त्यांचा परस्पर संबंध याविषयी माहिती घेतली. महाग गाड्या का महाग होत असतात हे आपण पाहिलं. त्यातले आणखी बारकावे समजण्यासाठी थोडी अधिक माहिती घेऊयात.

पोच

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी शनिवार, 23/08/2014 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आजोबांचा लोकसंग्रह बर्‍यापैकी होता. ते गेले तेव्हा अनेक जण आजीला भेटायला येऊन गेले. काहींनी आजोबांच्या चांगल्या आठवणी सांगितल्या, काहींनी त्यांचे गुणवर्णन केले, तर काहींनी नुसत्या मौनानेच आम्ही तुमच्या दु:खात सामील आहोत हे सांगितले. जे प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत त्यांनी पत्र पाठवून सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. आजोबा गेल्याचे दु:ख काही प्रमाणात का होईना अशा लोकांमुळे कमी व्हायला मदत झाली. हे आठवण्याचं कारण म्हणजे नुकताच आलेला एक अनुभव. परवाच माझे एक जवळचे नातेवाईक गेले. त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्यावर आई-बाबा गावी रवाना झाले. दुसर्‍या दिवशी दुपारी मी निघणार होतो. ऑफिसला रजा टाकली.

किस्से एका डॉक्टरचे

लेखक सस्नेह यांनी शुक्रवार, 22/08/2014 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
मायमराठीतले (आणि सावत्रमाय विंग्रजीतले) काही शब्द आपल्यामागे एक एक इमेज घेऊन वावरत असतात. मंत्री (मराठीत मिनिष्टर ) म्हटल्यावर डोक्यावरची गांधी टोपी सावरत कडक इस्त्रीच्या खादी जाकिटाची बटणे कुरवाळत फर्डे भाषण करणारा बगळासदृश्य मनुष्य डोळ्यासमोर येतो. वकील हा सहसा घाऱ्या कावेबाज डोळ्यांचा धूर्त इसम असतो. आणि डॉक्टर हा शब्द उच्चारताच एक सौम्य धीरगंभीर, सौहार्द आणि कणवपूर्ण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निर्व्यसनी व्यक्तिमत्व नजरेसमोर उभे राहते. खारकर डॉक्टर हे याला शंभर टक्के अपवाद होते. होते म्हणायला कारण आता ते नाहीत.

जवाबदेही

लेखक रसिया बालम यांनी मंगळवार, 19/08/2014 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
शिवाशीव विस्मरणात गेली वस्ती आता एक झाली मनं तशीच राहीली जातीभेदांनी विटाळलेली उतरंड संपली, भिंती पडल्या अजुन करतो जातीचा उपहास हा 'भटक्‍या' तो 'मागास' उच्चत्वाचा मिथ्या आभास दोन अनोळखी भेटताना नवीन ओळख होताना आडनाव महत्वाचं वाटते कारण त्याची जात सांगते -- रसिया बालम

शेजारी

लेखक मनिमौ यांनी सोमवार, 18/08/2014 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
ंई आनी माझे शेजरी आमच चन्गल पतत . ़आल माझ्या मुलिच्चा वाध्दीवस होता आनि मी तील घेउन हौल् वर जतना शेजरच्या मुलिची आजी तिला ने म्हनत होति तर मी सान्गितली पाहुने आलेले आहेत तर तिला आता मी नेत नाही. झाले काल रत्री पासुन बोलने बन्द आनी पुर्न दुरलक्श्या आम्च्या आय करावे अशा लोकान्चेख्प्प्ळ खूप दीवसानी मरथी लिहिले आहे शू ले चूका आहेत तर माफी असावी

दोन अश्रू आणि एक सलाम..!

लेखक अजय जोशी यांनी शुक्रवार, 15/08/2014 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत ज्यांच्यावर भरभरून लिहिलं, त्यांना कधीच विसरलो आहोत... त्यांच्या नावानं जे पुढारले, त्यांच्यावरच विसंबलो आहोत... 15 ऑगस्ट, 26 जानेवारी... मिळणाऱ्या सुट्टीमुळे लक्षात असतील.. सुट्टी जर जोडून आली, तर फारच बहार आणतील... तीन-चार दिवस स्वातंत्र्याला, बघा कसं उधाण येईल.. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी जीव दिले, त्यांच्या प्रयत्नांचं चीज होईल... जुन्या लोकांच्या जुन्या गोष्टी, पुन्हा कशाला आठवायच्या..? असे जर म्हणत असाल, तर मग सुट्ट्या कशाला घ्यायच्या..? आपण करतो मौज-मजा, त्यांनी सांडलेल्या रक्तावर.. आपण उपभोगतो स्वातंत्र्य, त्यांनी भोगलेल्या शिक्षांवर... देशासाठी मेले ते...