पढत मुर्ख व मुर्खाची लक्षणे
एका पढत मूर्खाची एक गोष्ट आहे.
एक पढत मुर्ख एका गाढवावर बसला होता आणि गाढव पळत होता.
त्याच त्याचं रस्त्यावरून तो बराच वेळ गोल गोल फिरत राहिला.
तेव्हा कुणीतरी त्या सज्जन गृहस्थाला विचारले की,” मी बराच वेळ तुम्हाला इथेच फिरताना बघतो आहे. तुम्हाला नक्की कुठे जायचे आहे?
तर तो म्हणतो, “मला माहित नाही. गाढवाला विचारा.”
बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असेच होते. आपण समजून न घेताच काम करत रहातो, अनेक गोष्टी करत रहातो की याचा उद्देश काय आहे? असे करताना निसर्गाने जे उपलब्ध केले आहे त्याचा आनंदही उपभोगत नसतो.
मिसळपाव
तिची आणि माझी ओळख नाही आणि मी तिच्याशी बोलत नाही, त्यामुळे ती ओळख होतही नाही. स्वत:च्या कामात मग्न असणा-या त्या अनोळखी स्त्रीचा फोटो काढणं खरं तर योग्य नाही, ते एका अर्थी तिच्या खासगीपणावर आक्रमण आहे याची मला जाणीव आहे. पण तरीही मी हा फोटो काढते.