Skip to main content

शब्दक्रीडा

तीन चारोळ्या

लेखक दत्ता काळे यांनी शनिवार, 14/03/2009 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
१. पाण्यात पाय टाकून हसली तू लोभसवाणे कातळवेडे पक्षी दिसतात किती जीवघेणे . . २. डोळ्यात तुझ्या आभाळ किती रंगबावरे झाले जल भरुन संध्याकाळी पापण्यात थेंबही आले . . ३. पाण्यात लव्हाळे न्हाती थरथरते काया ओली हातात हात घालून हळूवार फुलेही भिजली . .

आनंदाची बातमी..! :)

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 01/03/2009 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
एक निवेदन... कळवण्यास अत्यंत आनंद होतो आहे की मिपावर शुद्धलेखन विषयक लेखांवरील, चर्चांवरील बंदी आता उठवण्यात आली असून मिपावर एक शुद्धीचिकित्सक विभाग सुरू करण्यात आला आहे.. :) माननीय मिपाकर सतिशराव हे या विभागाचे प्रमूख असतील व तात्या त्यांच्या हाताखाली त्या विभागातील एक दुय्यम क्लार्क म्हणून काम पाहील! :) सतिशरावांनी प्राणिपात कोटि कोट आणि मोकलाया दाहि दिश्या या दोन कविता मिपावर लिहून तात्याच्या कानफटात मारली आहे आणि शुद्धलेखन विषयक झणझणीत अंजन समस्त मिपाकरांच्या डोळ्यात घातले आहे.

काही ग्राफिटीज् - 'पण अंतिम नाही.'

लेखक राज-निती यांनी गुरुवार, 26/02/2009 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
सरकार गरीबांना डोक्यावर 'छप्पर' देणार, जर मतदारांनी 'कौल' दिला तर. 'चोर-पोलिस' हा आता खेळ राहिला नाही , ही एक 'वास्तवता' आहे.

काही ग्राफिटीज्

लेखक राज-निती यांनी सोमवार, 23/02/2009 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
ससा 'भित्रा' पण शर्यतीत आरंभ 'शूर'. कधी कधी संशयाची पाल चुकचुकत नाही, तेव्हां जास्तच संशय येतो. 'चिरतारूण्याचे' रहस्य 'म्हातारपणात' असतं.

काही ग्राफिटी'ज

लेखक राज-निती यांनी रविवार, 22/02/2009 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी पुण्याच्या सकाळ पेपरमधल्या "ग्राफिटी " हा प्रकार तुम्हाला परिचित असेलच. मी काही ग्राफिटी तयार केल्या आहेत, त्या अशा : १. कुठल्याही अवघड गोष्टीच 'बाळंतपण' हे 'जीव' काढणारं असतं २. टोपी घालायला 'डोकं' लागतं. ३. जागतिक मंदीची लाट सध्या ' तेजीत ' आहे.

तु राजा की राजदुलारी मै....

लेखक दशानन यांनी शनिवार, 07/02/2009 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
तु राजा की राजदुलारी मै.. सिर्फ लंगोटे आला सुं ! भांग रगड के पिया करु....मै.. मुंडी सोटि याआला सुं ! तु राजा की छोरी से... मेरे एक भी दासी दास नही ! साधुसा आले ओढण आली म्हारा कंबल तक पास नही ! नवीन चित्रपट ओय लकी लकी ओये मधील हे एक गाणं ! हरयाणवी लोक संगितावर आधारलेले हे एके नितांत सुंदर गाणे आहे... ! हरयाणवी शब्दांमुळे ह्या गाण्याची गोडी एकदम अप्रतिम वाढते... ! एकदा प्ले करा.... तुम्हाला देखील आवडेल नक्कीच !!

कोल्हे-कुई

लेखक पुष्कर यांनी बुधवार, 04/02/2009 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
(पंतांच्या पगडीच्या प्रवासातल्या, पुष्करच्या प्रेमप्रकरणातल्या प-पच्या पोपटपंचीला पुष्कळ प्रसिद्धी पावल्यानंतर पुष्करने पूर्व-प्रसिद्ध कोल्हापूरच्या काका-काकूंची कथा किंचित कष्ट करून कंप्लीट केलीये.) केशवाचे कपट, काकांची कमाल पुनःसंपादन आणि विस्तारास्तव तूर्तास कथा काढून टाकत आहे. क्षमस्व.

मास्तरांची "एक प्रश्नपत्रिका"

लेखक भडकमकर मास्तर यांनी रविवार, 14/09/2008 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरची रहदारी जोरात आहे सध्या, भरपूर नवीन सदस्य येत आहेत... तर नवनवीन सदस्यांना असलेली माहिती तपासून पाहण्यासाठी आणि आपल्याला काय माहिती असलं पाहिजे हे समजण्यासाठी ही एक प्रश्नपत्रिका. ( अर्थात अभ्यासक्रम व्यापक आहे, आणि प्रश्नपत्रिका अतिशय छोटी आहे..ती सर्वसमावेशक आहे असा अजिबात दावा नाही... खूप महत्त्वाचे उल्लेख राहिले असणार... आपण आपापले प्रश्न प्रतिसादात लिहू शकता..) संदर्भासहित स्पष्टीकरण करा. १. झेपेल तितका वेळ चालवेन नाहीतर बंद करून टाकेन. २.शुभे़च्छा आहेतच पण लोकशाही आली तर बरं होईल. ३.मी आंतरजालीय शरद पवार आहे.

पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन- पार्ट २

लेखक पुष्कर यांनी रविवार, 13/07/2008 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
(पंतांच्या पगडीच्या प्रवासवर्णनावरील पावमिसळकरी प्रतिभावंतांच्या प्रतिसादांनी प्रेरणा पावून पुढचा पार्ट प्रसवला.) पार्ट २ - पंकजचं प्रेम-प्रकरण (पूर्वसूचना- पार्श्वभूमीकरिता पहा: पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन) पंकजला पकडण्यासाठी पंतांसोबत पुण्यात पोहोचलेली पंतांची पोरगी प्राची पंकजला पहिल्यांदा पाहताच पंकजच्या प्रेमात पडली. प्राचीने पंकज, पोलिसांची पकडा पकडी पाहिली. पंकजचा पदपथावरून पोबाराही पाहिला.