Skip to main content

धमालरावांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ...

लेखक छोटा डॉन यांनी बुधवार, 16/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी उठलो आणि पहिल्याछुट आपण "पुण्यात" नसल्याचे लै दु:ख झाले. मायला पुण्यात असतो तर काय दणका झाला असता की बोलायचे काम नाही. काय ते भल्लेभल्ले होर्डिंग्स, पोश्टर्स, पेप्रात जैराती, केबल टीव्हीवर शुभेच्छांच्या क्लिपिंग्स वगैरे वगैरेचा दणका उडवला असता. आज आमच्या मित्राचा वाढदिवस. नव्हे नव्हे, आमच्या परममित्राचा आणि आंतरजालावरचे एक लोकप्रिय व्यक्तीमत्व व 'कट्टा स्पेशालिस्ट' श्री. श्री. श्री. धमालराव डोणजे पाटलांचा वाढदिवस. त्यांना आमच्याकडुन वाढदिवसाच्या ह्या किंचित शुभेच्छा !!!
अवांतर : ही केवळ पोच समजावी, बाकी सविस्तर लेख कम "धमालरावांचे व्यक्तिचित्र" लवकरच येत आहे ;) आम्ही एकेकाळचे शिवसेनाप्रेमी असल्याने आजसुद्धा 'वाढदिवसाचा मुहुर्त' आम्ही शरसंधान करण्यासाठी वाया घालवत नाही :)

वाचने 23330
प्रतिक्रिया 54

प्रतिक्रिया

क्या बात है. धम्या, वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा रे. पार्टी कधी देतोयस बोल मित्रा. (भोचक) जाणे अज मी अजर

In reply to by भोचक

ही केवळ पोच समजावी, बाकी सविस्तर लेख कम "धमालरावांचे व्यक्तिचित्र" लवकरच येत आहे
वायदेआझम ह्यांनी लेखन पुर्ण केल्यावर विस्तृत प्रतिक्रीयेसाठी जागा राखुन ठेवत आहे. महत्वाचे :- धमालरावांना 'डॉनश्री' वरुन पुष्पगुच्छ आल्याचे कळले. बातमी कितपत खरी आहे ?? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>धमालरावांना 'डॉनश्री' वरुन पुष्पगुच्छ आल्याचे कळले. बातमी कितपत खरी आहे ?? छ्या, साफ खोटी आहे. त्या मिडियाने उगाच पिकवलेल्या कांड्या आहेत, आम्ही कुणाला पुष्पगुच्छ वगैरे देत नसतो. फार्फार तर आज आमच्या मुखपत्रातुन ( पक्षी : ब्लॉगवर ) एखादा अग्रलेख लिहुन धमालरावांना एखादी नवी 'पदवी' बहाल करु ;) ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by टारझन

कैवल्यमुर्ती धमाल महाराज देशमुख बारामतीकर ह्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!!! :P :P :P :P धमालपंताच्या वाढदिवसानिमित्त सदाबहार लावण्यांचा जंगी कार्य्क्रम सर्वांना आग्रहाचे निमंत्रण :P ______________________________ चालक अर्धा मालक घाश्या धम्या तमाशा केंद्र नारायणगाव

धमु, वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !! --टुकुल

In reply to by टुकुल

अनेक शुभेच्छा ! :-)

In reply to by मुक्तसुनीत

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!!

In reply to by घाटावरचे भट

आम्ही आमच्या राकोंशी बाडीस आहोत. आज पुण्यात नसल्याचे लै लै दु:ख झाले (ही फक्त म्हणण्याची पद्धत हो धमालराव; उगाच मनावर घेऊन घाबरून जाऊ नका.) बाकी ते वाढदिवसाबद्दल काँग्रेसलोशन हां ... आपलं शुभेच्छा! अदिती =================================== सध्या मुक्काम फ्रान्कफुर्ट येथे मिपाकर स्वाती दिनेश यांच्या घरी!

In reply to by घाटावरचे भट

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!! :) पार्टी टाइम! Innocent Smileys Confused Smileys

आ. धमालराव कॉफीउडवे पाटील यांना आमच्या ही शुभेच्छा :H ईथे एक भले मोठे होर्डींग समजावे (शुभेच्छुक) चेतन

अजुन ओळख नाही पण म्हणून काय झाले? हैपी हैपी बड्डे टू यु .... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

>>अजुन ओळख नाही पण म्हणून काय झाले? धमालशी बोलायला ओळख नाही लागत. बिनधास्त खर्डा >>हैपी हैपी बड्डे टू यु .... +१

शुभेच्छा मी पण शिवसेना प्रेमी आणि ते पण धमाल रावाना वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा !! विनायक पाचलग वाँट टु टॉक

मनापासून शुभेच्छा आणि सोबत खास अनुष्काचं हे भेटकार्ड..

मनःपुर्वक शुभेच्छा!!! पार्टी (दिलीच तर) हुकणार. असो. अवांतरः डान्राव, पेश्शल चार्टर्ड रिक्शा करून, हातात गुलाबाचं शेत घेऊन आले नाहीत वाट्टं भेटायला? ;) बिपिन कार्यकर्ते

धमाल रावाना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

रा रा बारामतीकर यांचे शेवेशी

In reply to by गणपा

आमाला का असे फोटो सापडत नाहीत राव ? बाकी काही शोधण्यात तसे आम्ही कमीच ! ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

घ्या आमच्याकडूनही एक भेट.. ह्याप्प्यी बड्डे ढॅमॅलपंत! ;)

श्री . धमाल नडगीफोडे-देशमुखांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! आंबोळी

वाढदिसुच्या लाक लाक शुभेच्चा! शुभेच्चुक आण्णा लावे समाधान देशी दारुचे दुकान साडे सतरा नळी हडपसर टिपः आज सैबांचा वाढदिस आस्ल्याने चकना (लोन्चे किंवा डाळ)पह्ल्या पैक बरुबर फुकट हाये. तरी गरजुंनी ह्याचा लाभ घ्यावा..

हार्दीक शुभेच्छा !!! अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. :) वाट बघतो आहे पार्टिची. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix

वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा! :) आता उरलेलं लेखन तेवढं पटपट पुर्ण करा.

In reply to by इनोबा म्हणे

>>आता उरलेलं लेखन तेवढं पटपट पुर्ण करा. :) इन्या, हे तु धमालरावांना म्हणाला आहेस असे परस्पर समजुन घेतो ;) ------ (सावध)छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

आमच्याकडूनही शुभेच्छा. नितिन थत्ते

धमुशेठ, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! :) राघव

.

श्री.धमालरावांना (धमुंना असे म्हटलेले आवडत नाही हे माहित असूनही म्हणतो...) वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! "पाटील" असल्यामुळे डब्बल.... कारण मलाही एका "पाटलाने" वाढविले असल्याने समस्त "पाटील" मंडळीविषयी मला भीतियुक्त आदर आहे. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

शुभेच्छा हो धमालराव... कुठं बसायचं ? --अवलिया

In reply to by अवलिया

अवलियासाहेब, येता का पुनमला ? धमालरावांच्या प्यार्टीच्या निमित्ताने तुम्हाला भेटण्याची इच्छाही पुर्ण होईल. ;) ------ ( स्पॉन्सर )छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by छोटा डॉन

छान ! तुम्ही स्पॉन्सर करताय? वा ! भरुन पावलो. (तो धम्या का चुप्प ? ) --अवलिया

In reply to by अवलिया

मग ? तुम्ही येताय खुद्द, स्पॉन्सर नको का करायला ? अहो आमचा सन्मान आहे तो. >>(तो धम्या का चुप्प ? ) इथे धम्याचा काय संबंध ? ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

अरे! आम्हाला हे आता समजते आहे? ठिक आहे अजूनही वेळ गेलेली नसल्याने, धमु रावांना वाढदिवसाच्या भरपुर शुभेच्छा! The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

:P धमाल जी मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ दी डे :) ...... :P सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

ध्.मु. यांना वाढदिवसाच्या त्यांच्या वजनाईतक्या शुभेच्छा. (अवांतर : आपल्या हि वाढदिवसाचा धागा यावा यासाठि काय करावे बरे) संजा

धम्या, हॅप्पीवाले बड्डेका शुभेच्छा रे!!!

gsgsfd *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

हैपी बड्डे टु यु धम्स!! "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

हॅप्पी बड्डे धमाल मुला! रेवती

धमाल मालकांना वाढदिवसांच्या हार्दीक शुभकामना. - नीलकांत

वाढदिवसाच्या शुभेच्छा! (खुद के साथ बातां : रंगा, वाढदिवस असं म्हणतात खरं पण हा धम्या काही कधी 'वजनात वाढलेला' दिसत नाही. :?) चतुरंग

अरे मस्त रे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अभिज्ञ.

धम्या लेका, कुठे आडवा झालायस रे?? वाढदिवसाच्या लय लय शुभेच्छा!! ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/

धन्यवाद दोस्ताहो आणि सुहृदहो.. तुमच्या सगळ्यांच्या एव्हढ्या शुभेच्छांनी माझा छोट्टासा जीव अगदी सुखानं गुदमरुन गेला बघा. :) अरे, ही अशी सगळी दोस्तदारमंडळी हीच तर माझी दौलत! आज जाणवलं मला..मी फार फार श्रीमंत आहे. :) कालचा दिवस कॉल,काम आणि खरडी (च्यायला! फारच केकता कपूरगिरी झाली काय? :D ) ह्यामध्ये पुरता अडकला होता, त्यामुळे तुमच्या प्रेमाची ही पोचपावती द्यायला अंमळ उशीरच घडतोय! बाकी, बर्‍याच दोस्तांचे फोनवर फोन, एसएमएस येऊन गेले त्यात सगळ्यांनाच उत्तर देणं त्याच त्या 'कॉल काम आणि खरडी'मध्ये शक्य होणं मुश्किल होतं! ज्यांनी एव्हढ्या प्रेमानं संपर्क केला त्यातील काहींना उत्तर देणंही नाही जमलं त्याबद्दल मनापासून माफी! @भोचकभाऊ: पार्टी कधी देतोयस बोल मित्रा. जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा! कुठे भेटुया? डेक्कनला की सराफ्यात? :D @परा: धमालरावांना 'डॉनश्री' वरुन पुष्पगुच्छ आल्याचे कळले. बातमी कितपत खरी आहे ?? आमचे मतभेद जरूर आहेत, पण आम्ही शत्रु बिलकुल नाही. ;) (दिला की नाही डॉनश्रीवरुन आलेल्या खुलाश्याच्या बरोब्बर उलटा खुलासा? ) @घाश्या कोतवालः घाश्या धम्या तमाशा केंद्र =)) अरे काय काळू-बाळू पार्ट-२ काढायचाय का? ;) @अदिती: आज पुण्यात नसल्याचे लै लै दु:ख झाले (ही फक्त म्हणण्याची पद्धत हो धमालराव; उगाच मनावर घेऊन घाबरून जाऊ नका.) हा हा हा....घाबरणारे ते वेगळेच हो! ह्यो देशमुखाचा पठ्ठ्या कशाला आणि कुणाला घाबरतो? तुम्ही या तर खरं, मस्त स्कॉचबिच पाजु..आख्खं अंतराळच खाली आणु तुमच्यासाठी! मग बसा तारे मोजत. :D @चेतनः आ. धमालराव कॉफीउडवे पाटील =)) =)) अरे काय नाव शोधुन काढलंयस! @वेताळ, शुचि: आता ते धमाल मुलगा तुन धमाल युवकात परावर्तित झाले असावेत अशी आशा करतो. आधी ते धमाल किशोर होणार :D अहो, चांगलं बाप्प्या झालो की वो! (स्वगतः च्यायला आता नाव बदलायलाच लागतंय बा!) @शिल्पा बः अजुन ओळख नाही पण म्हणून काय झाले? अहो ओळख अन फिळख लागतेच कशाला? सरळ गप्पांचा फड सुरु करायचा बघा. :) विकास म्हणतो तसं "धमालशी बोलायला ओळख नाही लागत. बिनधास्त खर्डा" :) @विनायक पाचलगः धमाल रावाना वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा !! ओहोहो! क्या बात है भावा! जिंकलंस...जिंकलंस रे! @दिपकः बिडीबंडलाबद्दल मंडळ आभारी आहे. ;) @तात्या: अग्गायायया....काय फोटु.. "क्या अदा क्या जलवे तेरे पारो.." असं झालं ना! ;) @बिपीनदा: पार्टी (दिलीच तर) हॅत्तिच्यायला!! ह्या देशमुखाच्या अवलादीला अजुन वळकलंच न्हाई? या वाड्यावर! खास तुमच्यासाठी आपुन चैत्रालीला नाचवू! ;) @गणपा: खल्लास! संपलो रे! :) @मेघवेडा: _/\_ धन्य आहात! नशीब सिगारसोबत कटर दिलंय, नायतर आमचा झाला असता ट्युको! (द बॅड.) @आंबोळी: श्री . धमाल नडगीफोडे-देशमुखांना =)) =)) लै लै दिवसांनी नडगीफोड वगैरे आठवलं रे! ;) @नावातकायाआहे: आभारी हाय आण्णा लावे. आमचा बारामतीचा दौरा आसलं तवा साडेसतरानळीला येऊच..मागच्या दारानं येऊ, वाईच पेश्शल येवस्ता करा बरं का. ;) @इंद्रा: समस्त "पाटील" मंडळीविषयी मला भीतियुक्त आदर आहे. :D छोड यार! कसली भिती आणि कसला आदर राव? @अवलिया: कुठं बसायचं ? हा काय प्रश्न झाला? आपला नेहमीचाच गुप्त अड्डा ;) @रंगाण्णा: हा धम्या काही कधी 'वजनात वाढलेला' दिसत नाही =)) बरंय की! हल्ली वाढत्या वजनाची भितीच असते. :) @आशिष सुर्वे: धम्या लेका, कुठे आडवा झालायस रे?? च्यायला, फणश्या..कुठं रे एव्हढं नशीब? हापिसात होतो. :( @डानरावः मी इतका श्रीमंत आहे ह्याची मला प्रचिती दिल्याबद्दल मंडळ आभारी आहे. :) _/\_ धन्यवाद दोस्ताहो..धनवाद! अशीच माया राहु द्या..अशीच कृपा ठेवा! :) आपला, (भारावलेला) ध.