बोट - शिक्षण
'अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला।' वगैरे बालगीतात ठीक आहे. पण ‘अशा बंगल्यात रहाणार्यांना चॉकलेटच्या वासानी मळमळायला लागेल का?’ असे रसभंग करणारे प्रश्न विचारायची जरूरच नाही कारण असा बंगला असणंच शक्य नाही.
तसंच एक एक मार्कासाठी डोचकं पिकवलेल्या एखाद्या विद्यार्थ्याला जर सांगितलं की अकरावी एस् एस् सी नंतर असा एक चार वर्षांचा कोर्स आहे ज्याला फी नाही, ज्यात प्रवेशासाठी मार्कांची अट नाही, पुस्तकं बेताचीच आणि समजायला बर्यापैकी सोपी, चार वर्षांच्या संपूर्ण कोर्सभर एकही परीक्षा नाही, कारण शिक्षकच नाहीत! वर दर महिन्याला ऐंशी रुपये पॉकेट मनी मिळेल - तर तो लक्षच देणार नाही. देऊन तरी काय उपयोग?
मिसळपाव