Skip to main content

लक्ष्मणपूर, एक पडाव.....

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 29/12/2021 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
"अन्नासाठी दाहीदिशा", या व्यंकटेश स्त्रोतातील श्लोका प्रमाणे जगदीशाने आम्हाला उचलले आणी जेथे भाग्योदय होणार होता (देवा घरचे ज्ञात कुणाला ) आशा गावी आणून सोडलं. तब्बल चौदाशे कि. मी. दूर, कोवळ्या वयातला मी, कधी आपली गल्ली सोडून दुसर्‍या गल्लीत खेळायला सुद्धा गेलो नव्हतो (मी मनात सुद्धा माझ्या, कधी दंगा केला नाही ) आसा स्वभाव होता. गोविंदाग्रजांची ( राम गणेश गडकरी), ‘एखाद्याचे नशीब’ नावाच्या अर्थपूर्ण कविते मधल्या शेवटच्या ओळी सारखे आम्ही त्या मुळे "बुडत्याला काडीचा आधार" , म्हणून " आलिया भोगासी ".

कंटाळा

लेखक पाटिल यांनी रविवार, 17/10/2021 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
एके दुपारी आम्ही कार्यालयात टंगळमंगळ टोलवाटोलवी इत्यादी महत्वाची कामं करत बसलो असतानाच शेजारचे रावसाहेब नामक समवयस्क सहकारी मित्र बोलले की, "पाटील, आज जरा कंटाळाच आलाय बुवा." यावर आम्ही बोललो की, "रावसाहेब, तुम्हाला कंटाळा आलाय ही उत्तमच गोष्ट झाली. कारण आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतःला सतत सिद्ध करत राहणं, स्वतःला सतत वागवत राहणं, ही काही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे मनुष्याला अधूनमधून कंटाळा येणं अगदी साहजिक आहे. उदाहरणार्थ कामाचा, राहत्या जागेचा, शहराचा, गोंगाटाचा, माणसांचा वगैरे कंटाळा येणं हे नैसर्गिकच आहे.

नोकरी/कंत्राटी काम आणि नशीब

लेखक उपयोजक यांनी शनिवार, 15/08/2020 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या कोरोनाप्रतापामुळे अनेकांच्या नोकर्‍या जात आहेत.कंत्राटी कामे मिळेनात.कधीतरी कोरोना अगदी नगण्य उरेलच; किंवा संपुष्टातसुद्धा येईल. त्यावेळी पुन्हा नोकरी संशोधन किंवा नवे कंत्राटी काम मिळवायला लोक बाहेर पडतीलच.

दिवसभराची कमाई

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 12/09/2019 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
आज गुरूवार. दत्ताचा वार. दिवसभर बसून होतो. मधूनच पावसाची सर यायची. तात्पुरता आडोसा शोधायला लागायचा. समोरच्या दुकानाच्या पायर्‍यांवर गर्दी व्हायची. अंग ओले झाल्याने बसवत नव्हते. तरीपण पाच वाजेपर्यंत बसून राहीलो. घरी जाणार्‍यांची गर्दी संध्याकाळीच होते. घरी जाता जाता दत्ताला हात जोडून, पैसे टाकून ते पुण्य कमवत होते. कंटाळलो कंटाळलो अन मग तेथून उठलो. बँकेत अकाऊंटला नेटबँकींगने पैसे ट्रान्सफर केले. थोडे पैसे गावी आयएमपीएसने पाठवले. खर्चासाठी अर्जंट पाहीजे म्हणत होती. ओले अंग अन थंडीच्या उतार्‍यासाठी समोरच्या शॉपमधून बाटली घेतली. अन स्विगीवरून ऑर्डर मागवली.

नोकरी मिळवताना १ ) जॉब कन्सल्टन्ट

लेखक रानरेडा यांनी शनिवार, 05/05/2018 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
नोकरी संबंधी क्षेत्रात नोकरी केल्यामुळे अनेकांनी नोकरी मिळवण्यासाठी काय काय करावे लागते हे मला अनेक लोकांनी विचारले . स्वत: वर हि नोकरी शोधायचा प्रसंग अनेकदा आल्याने अजून भरपूर अनुभव हि होताच. अगदी चांगल्या संस्थेत शिक्षण झाले तरी नोकरी कशी शोधावी हे कोठेच शिकवले जात नाही. त्यामुळे अनेक गोष्टी चुकत माकतच शिकाव्या लागल्या. त्या साठी काही लेखांची मालिका लिहिण्याचा विचार आहे . ( या लेखा मध्ये अस्थानी लेखक - हेमंत वाघे असे येईल - हा माझा वॉटरमार्क असेल.

मुंबईकर . . . . .

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 30/09/2017 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
मृत्यूचे दूत आले कुठून हे प्रत्यक्ष मृत्यूलाही सांगता नाही आलं . . अशी कुठली घाई होती मुंबईकरा जे तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं ? रोजची सकाळ तुझ्यासाठी एक नवीन युध्द . . . काल तुला चिलखतही घालता नाही आलं . . . अशी कुठली घाई होती मुंबईकरा जे तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं ? घड्याळाचे काटे तसे रोजच बोचतात नजरेत . . . अजून एक दिवस त्यांना नजरेआड का नाही करता आलं ? अशी कुठली घाई होती मुंबईकरा जे तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं ? भिजला असतास पावसात तर सुकवता आलं असतं स्वतःला . .

(why is there nothing rather than something ???????)

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 30/06/2017 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

दांडी मारणे - एक विलक्षण कला

लेखक किसन शिंदे यांनी शुक्रवार, 24/03/2017 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
खासगी किंवा सरकारी कार्यालयात काम करताना इतर चांगल्या-वाईट अनुभवांसोबत एका वेगळ्या गोष्टीचा अनुभव सगळ्यांनाच असतो, तो म्हणजे दांडी मारण्याचा आणि त्यासाठी अफलातून अशी कारणे देण्याचा वा शोधण्याचा. दोन्ही ठिकाणी वरिष्ठ पदावर काम करत असलेल्या व्यक्तीला त्याच्या हाताखाली असलेल्या कर्मचार्‍याकडून अचानकपणे दांडी मारण्याची अनेक कारणे दिली जातात. काही वेळेला ती खरी असतातही, तर काही वेळेला ती निव्वळ खोटी आणि मजेशीरही असतात.

तमिझ्(तमिळ)शिकण्यासाठी

लेखक उपयोजक यांनी बुधवार, 22/02/2017 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
तमिझ्(तमिळ)ही जगातल्या सर्वात प्रसिध्द अशा भाषांपैकी एक! सर्वात शुध्द द्रविड भाषा! म्हणूनच अन्य भारतीय भाषांच्या तुलनेत थोडीशी अवघड! कामानिमित्य,प्रवासानिमित्य किंवा एक वेगळी भाषा म्हणून म्हणा,किंवा तमिळ चित्रपट,तमिळ संस्कृती यांची आवड,कुतुहल म्हणून म्हणा 'तमिळ' शिकावीशी वाटते. अशा तमिळ शिकणार्‍यांसाठी एक WhatsApp समुह सुरु करत आहोत. पुस्तके,टिव्ही,इंटरनेट याद्वारे तमिळ शिकणारे काहीजण इथे एकत्र येत आहेत.प्रत्येकाची याबाबत प्रगती निरनिराळी!