आवडत्या प्राणी/पक्ष्यावरचा निबंध हा नावडत्या प्राणी/पक्ष्यावर अन्याय आहे आसे मनेका गांधी ला वाटते.
मला सगळेच प्राणी आवडतात. प्राणी खुप चविष्ट लागतात.
कोंबडी विशेषतः अधिक चविष्ट असल्याने माझ आवडता पक्षी आहे.
कोंबडीपासुन वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. मला बनवता येत नाहीत पण खाता येतात.
कोंबडी शाकाहारी असते. त्यामुळे मला तिचा आदर वाटतो. गांधीजी सुध्धा शाकाहारी होते म्हणुन मला त्यांचा सुध्धा आदर वाटतो.
कोंबडीला ताप येतो. ताप आल्यावर माणसे पाणी उकळवून पितात. पण ताप आलेली कोंबडी चांगली उकळवून न घेता खाल्ली तर तो ताप माणसाला होऊन त्याच्यामुळे होणारा ताप कायमचा जाऊ शकतो.