Skip to main content

मुक्तक

कुणाची गं तू?

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 13/10/2008 या दिवशी प्रकाशित केले.
अंगावर फाटक्‍या तुटक्‍या कपड्यांनिशी मुंबई स्वर्गाच्या दारात उभी होती. एस. एम. जोशी, आचार्य अत्रे, वसंत बापट प्रभृतींची भेट तिला घ्यायची होती. चित्रगुप्तानं बऱ्याच रखडंपट्टीनंतर मुंबईला आत प्रवेश दिला. एसेम, अत्रे, बापटांसह संयुक्त महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांसमोर मुंबई जाऊन उभी ठाकली. सगळ्या नेत्यांना थोडंसं आश्‍चर्य वाटलं, पण त्यांना हे फार अनपेक्षित नव्हतं. कधी ना कधी मुंबई आपल्याकडेच गाऱ्हाणं घेऊन येणार, याची त्यांना खात्री होती. मुंबईच्या या अनपेक्षित आगमनानं सगळे नेते किंचित चिंतेत पडले. "गेल्या दहा हजार वर्षांत कधी झाली नाही, एवढी दुरवस्था मुंबईची झाली आहे.

(कोलाज)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 13/10/2008 या दिवशी प्रकाशित केले.
वेदाताईंचं 'कोलाज' वाचून आणखी एक कोलाज मनात उभं न रहातं तरच नवल! B) एकेक शब्द एकेक ओळ एकेक कडवं जोडतेय... अनंतकाळ... कविता नाही निदान मुक्तक तरी....? *** थोडा बेभान विचार थोडा उधाण आचार थोडा रिमझिम सदाचार थोडी काजळकाळी टीका थोडे श्रावण सुखद प्रतिसाद आणि थोडेसे शब्द... बदललेले... विडंबन पूर्ण...! चतुरंग
Taxonomy upgrade extras

कृतार्थ जोडी

लेखक स्वाती फडणीस यांनी शुक्रवार, 10/10/2008 या दिवशी प्रकाशित केले.
कृतार्थ जोडी ==================== त्या तिकडच्या ग्रहमालेत एक सूर्य विझायला आलाय जळून जळून फुललेला निखारा अंमळ जरा पसरलाय. आतापर्यंत जळतच राहिलो आतापर्यंत जाळतच राहिलो मनातल्या मनात उजळणी करतोय गरगर फिरणारी पृथ्वी कौतुकाने पहातोय. त्याच्याच वयाची म्हातारी ती चाल तिची ही मंदावलीये खूप फिरले म्हणत तीही जरा टेकलीये तुझ्या भोवती फिरणारी मी ही भिंगरीच होते एक फेरा घेता घेता शेकडो वेळा गरगरले म्हणत कबुली देतीये. पिल्ल पाखरं उडून गेली त्यांनी त्यांची दिशा धरली कृतार्थ जोडी बोलतीये उरले सुरेल क्षण संगतीने जगतीये त्या तिकडच्या सूर्यमालेतली रात्र केव्हाच मागे पडलीये. ===================== स्वाती फड

महामानव!

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 09/10/2008 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.bollywood.ac/wp-content/uploads/2007/10/43200651335pmhimesh… अवघी सृष्टी निर्माण करणाऱ्या परमेश्‍वराचाही त्या दिवशी गोंधळ उडाला होता. कधी नव्हे एवढ्या पेचात तो सापडला होता. आपल्या हातून हा काय चमत्कार घडला, याचं त्याला राहून राहून आश्‍चर्य वाटत होतं. आतापर्यंत अष्टपैलू, अद्वितीय बुद्धिमत्तेचे, आरस्पानी सौंदर्याचे अनेक पुतळे त्यानं घडवून त्यांत प्राण फुंकले होते; पण हा नमुना काही अजबच होता.

(जाणिव)

लेखक राघव यांनी मंगळवार, 07/10/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या जाणिवेचा प्रेरणास्त्रोत - जाणिव
कुठेतरी पोट माझं कण्हत राहतं थंड सुस्कारांना वाट देत राहतं जेवण ओरपलेलं चवीनं ''जाणीवे''च्या टोकांनी बोचत राहतं नेहमीच आधी केला विचार अधिकाचा समोर नसलेलं सारं जणु माझंच होतं प्रत्येक घासासवे उदराचा घेर वाढलेला आणि सफाईसाठी नको तिथे बोळं अडलेलं असतं नजरांचे ते असंख्य वार अन मुठीतल्या नाकांचे वेडगळ दृष्य सहन करून, अवघडलेलं पोट गुरगुरत राहतं आता कसली तक्रार आणि चिंता कशाची? "ईनो" घेतल्यानंतर जे व्हायचं ते होऊनच जातं "यातनां"नी मात दिली माझ्या "

स्मरण!

लेखक पिवळा डांबिस यांनी शनिवार, 04/10/2008 या दिवशी प्रकाशित केले.
फुलवा यांच्या "बाकी खरंच काही नाही" या कवितेवरून सुचलेलं हे मुक्तक.... हे विडंबन नाही, स्वतंत्र कविता आहे.... तुझी आठवण मला आता, सारखी काही येत नाही डोळे भरणं दूर राहो, श्वासही अडकत नाही... पावसात भिजतो, ताप येतो, मुकाट गोळ्या खातो मी, तुझ्या गरम लापशीचं स्वप्नसुद्धा पडत नाही.... शाल पांघरून देखील तुझी माया काही मिळत नाही, वीस वर्षे झाली आता काळरात्र आठवत नाही... संसार आहे माझा आता, बाबा नि भावंडं ही पण आई, तुझ्या नसण्यानं, पोरकेपण जात नाही.... एकटं एकटं वाटतं पण ,तू नेहमीच आठवत नाहीस विसरलो नाही तुला पण बाकी खरंच काही नाही....... बाकी खरंऽऽच काही नाही गं......
Taxonomy upgrade extras

बाकडं...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 04/10/2008 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसभेत `नोट फॊर व्होट' प्रकरण झालं, तेव्हापासून `बाकडं' माझं डोकं पोखरतंय... म्हणजे, प्रत्येक माणसाचा एकएक स्वभाव असतो. पण, तो त्याचा मूळचा स्वभाव नसतो. तो कुठे बसतो, त्यावर त्याचा स्वभाव अवलंबून असतो, असं त्या दिवशीपासून माझं ठाम मत झालंय. कारण, त्या प्रकरणानंतरचा लालकृष्ण अडवाणींचा चेहेरा मला आजही जसाच्या तसा आठवतोय. बाकड्याचा परिणाम.

पितृ पंधरवडा!

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 03/10/2008 या दिवशी प्रकाशित केले.
"दहा जनपथ'च्या बाहेर पितृपक्ष बराच वेळ खेपा मारत होता. त्याला आत प्रवेश मिळत नव्हता. "भल्याची दुनिया राहिली नाही,' असंच त्याला वाटत होतं. पक्षनेतृत्वाविरुद्ध बंड करणाऱ्यांना इथे झटपट आणि बराच वेळ भेट मिळते आणि दस्तुरखुद्द राज्याच्या कारभाऱ्यांना भेटीसाठी दोन-तीन दिवस ताटकळावं लागतं, हे त्यानं ऐकलं होतं. मात्र, हल्ली ते दिवसही सरल्याचंही कुठूनतरी कानावर आलं होतं. त्यामुळं मोठ्या आशेनं तो मॅडमच्या भेटीसाठी आला होता. वर्षानुवर्षं नाहक बदनामी झाल्यानं बिचारा आधीच जाम वैतागला होता. एकतर त्याच्या कारकिर्दीत काही शुभ घडत नसे आणि आणि यदाकदाचित काही अशुभ झालं, की त्याच्याच डोक्‍यावर खापर फुटत होतं.

अरे `देवा'!

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 02/10/2008 या दिवशी प्रकाशित केले.
वाढदिवस म्हणजे बुद्धीत वाढ आणि आयुष्यातील कालावधीत घट होण्याचा दिवस, असं म्हणतात. काही जण मात्र त्याला अपवाद असतात. ते स्वतःला चिरतरुण म्हणवून घेतात आणि म्हातारपणी पोरकटपणा करायला मोकळे होतात. त्यामुळं त्यांचे वाढदिवस जवळ आले, की छातीत धस्स होतं. अंगाला दरदरून घाम फुटतो आणि घशाला कोरड पडते. पुन्हा कुठला तरी नवा संकल्प जाहीर करून आपल्या माथी मारणार की काय, असा झोप उडवणारा प्रश्‍न सतावू लागतो. यंदाही असंच झालं...एव्हरग्रीन, चिरतरुण, चॉकलेट हीरो म्हणवणाऱ्या आणि अवघे 85 वयोमान असलेल्या एकेकाळच्या समस्त चित्रपटरसिकहृदयसम्राटाचा वाढदिवस होता.

सार्थक्..(एक मुक्त प्रवाह)

लेखक प्राजु यांनी बुधवार, 01/10/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी अलवार जाग आली.. उठून बाहेर आले. सहज पॅटीओचं दार उघडलं..समोर पसरलेली हिरवळ डोळ्यात साठवत तशीच बसून राहिले त्या खुर्चीवर.. ४ दिवसापूर्वीच तो येऊन गवत छाटून गेला होता आणि आज परत.. एकेक पातं जणू तलवार.. !!!!:) पहाटेनं जाताना बहाणा केला धुक्याचा आणि दवाचं वाण देऊन ती परत निघाली होती..प्रत्येक पातं चांदीच्या कोंदणामध्ये मोती ल्यायला होतं..आणि एकमेकाला विचारत होतं "कोण जास्ती सुंदर आहे रे??" अचानक एखादी वार्‍याची कोवळी झुळूक हळूच येऊन एका गवताच्या टोकदार पात्याच्या कानात फुंकर घालून गेली.. ते पातं आळस देत उठलं आणि तो चांदी मोत्याचा साज उतरवत...