मौजमजा
असे असायला हवे होते/बहुधा असेच असावे! :)
राम राम मंडळी,
चि वि जोशी हे मराठीतले एक नावाजलेले लेखक. चि वि जोश्यांचे एक पुस्तक आहे. (त्याचं नांव मला आत्ता आठवत नाही, पण आठवून नक्की सांगेन.) त्या पुस्तकात त्यांनी काही धमाल लेख लिहिले आहेत. त्यांचं (म्हणजे चि विं चं) म्हणणं असं की आपल्या संस्कृतीने 'याचक' हाच नेहमी मोठा ठरवलेला आहे. आणि याचकाला दान दिल्यावर किंवा याचकाने दात्याकडून दान घेतल्यावर जणू काही याचकच दात्यावर फार मोठ्ठे उपकार करतो आहे असं चित्र गेली वर्षानुवर्ष आपल्या संस्कृतीत रंगवलं गेलं आहे.
संपादकीय अग्रलेखः मिसळ की भेसळ
सर्व पात्रे काल्पनिक. (असे आपले म्हणायचे.)
संपादकत्व स्वीकारुन आम्हाला बरेच (म्हणजे २) दिवस झाले आहेत. पण एकही लेख आमच्या अनुमतीची वाट पाहत शेपूट हलवत बसलेला नाही हे ध्यानात आल्यावर आम्ही ताडकन भानावर आलो. आणि ह्या पदात वाटते तितकी मजा नाही हे जाणून घेऊन संकेतस्थळाचे सदस्य लोकशाही मार्गाने आमच्या पृष्ठभागावर लत्ताप्रहार करण्यापूर्वी आम्हाला संपादकपद मिळाल्याची निळसर सुगंधी आठवण लिहून ठेवायचे ठरवले.
या आठवणीचे ब्याकग्राऊंड तुम्हाला माहीतच असेल. किंवा नसले तर हा परिच्छेद वाचल्यावर माहीत होईल. मराठी संकेतस्थळांवरील आमच्या वावराला बरेच दिवस होऊन गेले होते.
मराठी अंताक्षरी
चला मराठी अंताक्षरी खेळूया!
आजी सोनियाचा दिनु.. वर्षे अमृताचा घनु
हरी पाहिला रे हरी पाहिला रे
र.
मिसळपाव
