Skip to main content

भटकंती गाणी -३

लेखक सृष्टीलावण्या यांनी गुरुवार, 03/04/2008 07:51 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ धागा गाऽऽऽऽऽऽऽऽर, गार डोंगराची हवा न् बाईला सोसंना गारवा... गाऽऽऽऽऽऽऽऽर अहा गाऽऽऽऽऽऽऽऽर ओहो गाऽऽऽऽऽऽऽऽर डोंगराची हवा न् बाईला सोसंना गारवा ।।धृ।। लिंबूनारळ घेऊन हाती, काळूबाईला इनवूं किती.. या काळूच्या ह्या बाळूच्या मळवट भरियला न् बाईला सोसंना गारवा ।।१।। साडी चोळी घेऊन हाती, काळूबाईला इनवूं किती.. या काळूच्या ह्या बाळूच्या मळवट भरियला न् बाईला सोसंना गारवा ।।२।। हळदकुंकू घेऊन हाती, काळूबाईला इनवूं किती.. या काळूच्या ह्या बाळूच्या मळवट भरियला न् बाईला सोसंना गारवा ।।३।।
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3156
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया