कोल्हापुरी मिसळ......(फसलेला अनुभव)
लेखाच्या नावावरुन अपणास असे वाटले असेल की मी कोल्हापुरी मिसळ बनवण्याचा प्रयत्न केला आणि तो फसला की काय !
पण असे झाले असते तरी मी आनंद मानला असता. पण....... माझा हा अनुभव म्हणजे कुर्हाडीवर पाय मारल्यासारखा आहे.
आता जास्त न ताणता सरळ मुद्याचे बोलतो नाही तर पहिल्या लेखात तुम्हा सर्वांना पकवल्याचे पातक डोक्यावर यायचे.
तर झाले असे कि मागच्या रविवारी कोल्हापुरला जाण्याचा योग आला. मग अंबाबाई चे दर्शन झाल्यावर विचार केला की येथील सुप्रसीद्ध मिसळीवर ताव मारावा म्हणुन कोल्हापुरस्तिथ एका स्नेह्याला दुरध्वनी करुन चांगल्या मिसळीचा ठाव ठिकाणा विचारला आणि पोहचलो प्रसीद्ध फडतरे यांच्या उपहारग्रुहात (हे उपहारग्रुहा हुतात्मा पार्क च्या मागे उद्यमनगर भागात) आहे. कोल्हापुर च्या रस्त्यांची जास्त माहिती नसल्याने जाताना एका ठिकाणी एका रिक्शावाल्याला मार्ग विचाराला तर त्याने समर्पक वाक्यात उत्तर दिले फडतरे मिसळ म्हणजे "नाव मोठे आणि लक्शन खोटे" पण तरी आता आलेच आहात तर बघा तुम्हाला आवडते का.
आता एवढा मोठा टोला त्याने लावला होता तरी विचार केला की आपण पुण्याहुन येथे आलो आहे तर बघुयात कशी आहे फडतरेंची मिसळ. फडतरेंच्या येथे पोहचलो आणि बघतो तर काय ही गर्दि. काही व्यक्ति तर डबे घेऊन दिसत होत्या मिसळ घरी बांधुन न्यायसाठी बहुतेक.
बर्याच कालावधी नंतर आमचा नंबर लागला. तसे एखाद्या उपहारग्रुहात नंबर लावुन खायचे आता मि पुण्यात आल्यापासुन चांगले शिकलो आहे. असो.. उपहारग्रुहात अजु बाजुला बघीतल्यावर आम्हाला फडतरे काकांच्या मिसळ बद्द्ल व्रुत्तपत्रात आलेल्या स्तुतिंचे फलक आढळले आता मात्र आम्हाला विश्वास आला कि आम्हि योग्य ठिकाणी आलो आहोत. पण हा आमचा विश्वास आलेली मिसळ खाल्यावर एकदमच फोल ठरला आणि मग आम्हाला परत त्या रिक्शावाल्या काकांचे शब्द आठवले फडतरे मिसळ म्हणजे "नाव मोठे आणि लक्शन खोटे".
लगेच तिथुन काढता पाय घेतला आणि त्याच रिक्शावाल्या काकांना परत चांगल्या कोल्हापुरी मिसळीचा पत्ता विचारुन रमापुरी गल्ली नं. ६ भागातील विजय मिसळ येथे झक्कास अश्या कोल्हापुरी मिसळीचा अस्वाद घेतला.
वाचने
11003
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझाही असाच अनुभव आहे.
खरयं.....
हाहाहा ...
In reply to खरयं..... by ब्रिटिश टिंग्या
बेडेकर मिसळ...
सहमत आहे..
In reply to बेडेकर मिसळ... by प्रभाकर पेठकर
रामनाथची मिसळ आहेच भारी.
In reply to सहमत आहे.. by विसोबा खेचर
सहमत
In reply to बेडेकर मिसळ... by प्रभाकर पेठकर
चला
कोल्हापुरी मिसळ......(फसलेला अनुभव)
का?
In reply to कोल्हापुरी मिसळ......(फसलेला अनुभव) by शैलेश दामले
हा हा हा...
In reply to का? by मनस्वी
तुमच लक्श सगल खलीच का?
In reply to का? by मनस्वी
सर्वांचे आभार....
पुण्यात
In reply to सर्वांचे आभार.... by गमत्या
मनस्वी
अहो दामले काका
फडतरे
काटा
लोकमान्य
विनोद..
In reply to लोकमान्य by भोचक
पत्याची दुरुस्ती
कोल्हापुरीच्या नावावर
सपक, गोड इ. मिसळ.
+१
In reply to सपक, गोड इ. मिसळ. by आनंदी गोपाळ
ओ हे रमापुरी नक्की कुठंय