Skip to main content

मौजमजा

मद्य काव्य... मदिरेचे हाणतो पेले, धुंद तळीराम

लेखक तळीराम यांनी गुरुवार, 10/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मदिरेचे हाणतो पेले, धुंद तळीराम बेवड्या या भक्तासाठी, रोज असे शाम* (संध्याकाळ) एक एक प्याला हाती, भक्त जाई पीत एक एक पेगा जोडी, अखेरीस चीत रोजचेच काम दास `रम'नामी रंगे, मुखा येई वास एक एक धाबा धुंडे, होऊनिया लास हाती ना छदाम पिऊन रिक्त झाला पेला, सरे सर्व `जाम' ठायि ठायि वाटेवरती, ट्रॅफीक ही जाम जागीच आराम हळु हळु उघडी डोळे, पाहि दिवा-खांब नाकावरी नाही चष्मा, जोडे तिथे लांब खांबातळी राम! *(संध्याकाळ)

लोणचं..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 07/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नाही हो... मी कोणत्याही लोणच्याची रेसिपी इथे देणार नाहिये. तेव्हा लोणचं प्रेमींनी इतके आनंदी होण्याचं काहिही कारण नाही. खरंतर, लोणचं हा विषयच असा आंबट, तिखट आणि चमचमीत आहे ना की नुसतं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. लोणच्याबद्दल काही लिहिण्यासारखं असं विशेष नाही. पण तरीही लोणचं मला नेहमीच लोणच्यात म्हणजे कोड्यात टाकत आलं आहे. कारण,जर किती प्रकारची लोणची असतात असं विचारलं.. तर आंब्याचं, लिंबाचं, मिरचीचं, मिक्स भाज्यांचं.... अशा अनेक प्रकारची लोणची असतात. पण लोणच्याचे प्रकार किती असं विचारलं तर... ते ही अनेक आहेत. म्हणजे, महाराष्ट्रीयन, कर्नाटकी, पंजाबी, राजस्थानी, काश्मिरी.. आंध्राकडचे..

हरवले ते गवसले...

लेखक प्रगती यांनी शनिवार, 05/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मि.पा. वरिल सगळ्या मंडळींना प्रगती व कल्पनाचा नमस्कार. मिसळ्पाव हे संकेतस्थळ सूरू केल्याबद्द्ल धन्यवाद. आणी हे संकेतस्थळ आम्हाला दा़खवल्या बद्द्ल मदनबाण यांचे आभार! मि.पा वरिल सगळे सदस्य अपतिम ले़ख, विडंबन ,कथा विनोद लिहितात त्यांचे शतश अभिनंदन. सगळयाच्या प्रतिक्रिया अगदि झकास असतात अगदी ह. ह. पु. वा. आपल्या मि.पा.मुळे आमच्या सारख्या बाहेरुन शिक्षण घेतलेल्यांना कालेज कट्टा काय असतो, तिथे काय गमती जमती असतात याचा अनुभव आला. ताण तणाव घालवन्यासाठी तसंच फक्त मराठीतुन बोलण्यासाठी (इंग्रजीची सरमिसळ न करता) आंम्हाला मि.पा.

योगायोग

लेखक सृष्टीलावण्या यांनी शुक्रवार, 04/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याकडे एक सुंदर मराठी शुभेच्छापत्र आहे. काय आश्चर्य, त्यातल्या ओळी ह्या चित्राला बिनचूक बसतात. अगदी एका ओळंब्यात. ह्या योगायोगाची गंमत वाटली कारण दोन कुठल्या वेवेगळ्या जगातल्या गोष्टी. एक नेटवरची तर एक छापील कागदावरची. म्हणून हे चित्र आणि त्या ओळी इथे देत आहे. weekend आम्ही दूध पितो. मांजरही दूध पिते. पण मांजराच्या ते अंगी लागते.

कोल्हापुरी मिसळ......(फसलेला अनुभव)

लेखक गमत्या यांनी गुरुवार, 03/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
कोल्हापुरी मिसळ......(फसलेला अनुभव) लेखाच्या नावावरुन अपणास असे वाटले असेल की मी कोल्हापुरी मिसळ बनवण्याचा प्रयत्न केला आणि तो फसला की काय ! पण असे झाले असते तरी मी आनंद मानला असता. पण....... माझा हा अनुभव म्हणजे कुर्‍हाडीवर पाय मारल्यासारखा आहे. आता जास्त न ताणता सरळ मुद्याचे बोलतो नाही तर पहिल्या लेखात तुम्हा सर्वांना पकवल्याचे पातक डोक्यावर यायचे. तर झाले असे कि मागच्या रविवारी कोल्हापुरला जाण्याचा योग आला.

मोहरवणी..!

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 02/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, अहो आम्ही हलकट कोकणी माणसं! स्वत:च्या वाडीतला आंबा मुंबईला किंवा अमेरीकेत पाठवायचा आणि शेजारच्या वाडीतल्या कैर्‍या चोरून त्याची मोहरवणी करायची आणि त्याच्यासोबत गरमागरम भात जेवायचा, याचंच तिच्यायला आम्हाला कवतिक! मोहरवणी हा खास कोकणातला पदार्थ. आज मी तुम्हाला मोहरवणीची पाकृ शिकवणार आहे. सध्या कैर्‍याआंब्यांचे दिवस आहेत, तेव्हा कैर्‍यांची मस्तपैकी मोहरवणी करून पाहा आणि तिच्यासोबत गरमागरम भात जेऊन झोपा दोन तास निवांत! म्हणजे मग पुन्हा संध्याकाळी देवगडात हलकटपणे गजाली करत हिंडायला मोकळे!

दिल्ले दान... घेतले दान...

लेखक आजानुकर्ण यांनी बुधवार, 02/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा लाडका वगैरे सुपरष्टार शेतकरी असल्याचे जाहीर झाले आणि 'सत्यमेव जयते' नुसार अखेर सत्याचा विजय झाला. (कोण रे तो भिखू म्हात्रेचा सत्या म्हणतोय? सुपरष्टारच्या कलागुणांची कदर नाही त्याला! ठेचा साल्याला!) डोक्याला मुंडासे बांधून सुपरष्टार बैल हाकणार.