बर्फशिल्प
'मिपा' चं कलादालन खर तर फारच समृद्ध आहे. तरीही मला हे जे पाहायला मिळालं त्याची भर या कलादालनात घालावीशी वाटली ... बघा आवडतंय का !
================================================================================
आज सकाळी ठरल्या वेळी ठरल्या ठिकाणी जायला निघाले खरी घरातून, पण कालपासून मनात चालू असलेल्या विचाराने पुन्हा एकदा उचल खाल्ली आणि पावलं (आणि गाडीची चाकं) त्या वेगळ्या दिशेला घेवून गेलीच :) गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात Plymouth Ice Spectacular हा बर्फशिल्पांचा (Ice Sculptures) मेळा बघण्याची संधी मिळाली होती आणि हा जानेवारी उजाडल्या पासूनच या वर्षीचा हा मेळा कधी आहे याच्या तारखांवर लक्ष ठेवून होते. २२-२३-२४ अशा तीन दिवस हा मेळा Kellogg Park, Downtown Plymouth, MI येथे चालू आहे. वेबसाईट आहे http://www.plymouthicefestival.org/
आम्ही म्हणजे फारतर बर्फाचा snowman बनवणार पण इथे सदर होतात त्या खऱ्या बर्फातून निर्माण केलेल्या कलाकृती. अगदी १० बाय १० फुटी सागरकन्या (Little Mermaid) असो की कुणीतरी टाकून दिलेल्या-आजारी आणि कुणा चांगल्या माणसाने औषधपाणी करून पुन्हा 'माणसात' आणलेल्या कुत्र्याचा पुतळा असो ... लहान मुलांचे आवडते cartoon characters, स्थानिक व्यवसायांचे logo, प्राणी, पक्षी ... बर्फाच्या तुकड्यातून साकारलेलं असं बरंच काही बघायला मिळतं इथे. तुम्हाला स्वतः यायला जमणार नसेल तर फोटो हाजीर है !
बर्फातली कारीगरी ...
गोठलेले क्षण
मिकी माउस
बिग बर्ड आणि सिसमी स्ट्रीट मधील मंडळी
खारुताई
हाच तो सुदैवी कुत्रा ...
नाच रे मोरा ...
आणखी काही कलाकृती ...
बर्फाचं सूर्यफुल
विचारवंत (The Thinker Statue by Auguste Rodin)
सागरकन्या
( यापैकी काही बर्फ शिल्प २००९ जानेवारीतील आहेत तर काही आजच सकाळी टिपलेली )
लेखनविषय:
वाचन
4086
प्रतिक्रिया
0