Skip to main content

मौजमजा

छोटे छोटे प्रश्न...!

लेखक श्रीराजे यांनी शुक्रवार, 23/07/2010 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
एका वृत्तपत्रातले कात्रण ई-मेल मधुन आले. त्यातील प्रश्न मलापण नेहमी पडतात. उत्तरे मात्र मिळत नाहीत.... खालील काही मजेशीर प्रश्न तुमच्यासाठी: १) मराठी पेपरच्या रद्दीचा भाव इंग्रजी पेपरपेक्षा कमी का? - (माझ्या पाहण्यात काही ठीकाणी सारखाच भाव आहे.) २) उडप्याच्या हॉटेलात कांदाभजी का मिळत नाहित? ३) लहान बाळाशी बोलताना मोठी माणसं बोबडं का बोलतात? ४) 'मीचं म्हणून तुमच्याशी संसार केला' असं प्रत्येक बाई आपल्या नवर्‍याला का म्हणते? :?

टाईम पास

लेखक सुनील यांनी शुक्रवार, 23/07/2010 02:39 या दिवशी प्रकाशित केले.
जॅमर (पूर्वीचा सदैव भरवाडगे (पूर्वीचा जर्क)) चित्र जालावरून साभार

कोकणवाटांचा पाऊस-थरार

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 22/07/2010 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
"ए भाऊ, अरे किती गुटखा खाशील! चांगला नाही बरं तब्येतीला. तू ऐक माझं.. सोडून दे असली वाईट सवय! अरे, तरुण वय आहे तुमचं, ह्या वयात कशी रे अशी व्यसनं करता पोरं तुम्ही! ते काही नाही, तू आजपासून गुटखा कमी करायचास.... " आमच्या अंदाजे वय वर्षे पासष्टच्या प्राध्यापिकाबाई आमच्या कोकणप्रवासासाठी भाड्याने घेतलेल्या ट्रॅक्सच्या चालकाला खडसावत होत्या. त्यांचेही बरोबर होते म्हणा! जेमतेम तेवीस-चोवीस वय असेल त्याचं... आणि दर अर्ध्या तासाला एक गुटख्याची पुडी त्याच्या तोंडात रिकामी होत होती. पुढे प्रवासात त्याची इतर माहितीही समजली. बालाजी त्याचं नाव. शिक्षण दहावीपर्यंत असावं.

<अवलियाचे रूप>

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 21/07/2010 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा क्रान्तितैची सुरेख रचना 'अरूपाचे रूप' "अवलिया" रूप। अवांतर खूप पाहताही पाध्ये। धाव घेई जंताचीयासाठी। या हाटेलाकाठी उभा अवलिया। टणत्कारी अवांत्राचा कैवारी। पर्‍याही फरारी संकटात टाकी। केसु-रंगा बाण तेथे देव। नांदतो सदैव कैवल्याची ठेव। मार्ल्बोरोत मायबाप, भ्राता। तूच सखा, त्राता अनुष्काच्या कांता। दे दर्शन
काव्यरस

उपास

लेखक अवलिया यांनी बुधवार, 21/07/2010 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
आज आषाढी एकादशी.. !! विठठल विठठल जै हरी विठ्ठल... मी फक्त साबुदाणा खिचडी, वेफर्स, केळी खाल्ली... थोडं दुध पिलो/प्यालो तुम्ही उपासाचे काय काय पदार्थ खाल्ले ? किंवा खाणार ? * आम्ही कालिदास असलो तरी धोरणात बसत नसल्यास धागा उडवला तरी चालेल पण जो संपादक उडवेल त्याला विठ्ठल शिक्षा करेल, धन्यवाद.

याची कानी ... याची डोळा ...

लेखक सावळागोंधळ यांनी बुधवार, 21/07/2010 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी मिसळपाव वरचा हा माझा पहिलाच लेख... एका मित्राच्या आग्रहावरून हा जुना लेख टाकत आहे. लवकरच नवीन लेखनास लवकरच सुरूवात करेन. आपल्या आजुबाजूला किती गमतीदार घटना घडत असतात ... जरा कान आणि डोळे उघडे ठेउन आजुबाजूला वावरलो तरी ब-याच गोष्टी करमणूक करून जातात .. त्या क्षणांना टिपण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे हा लेख .... याची कानी ... याची डोळा ... प्रसंग एका क्ष-किरण तपासणीगृहातला ...

एक ट्रेक असा ही.... (फोटोसहीत)

लेखक हर्षद आनंदी यांनी सोमवार, 19/07/2010 05:28 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक ११ जुलै २०१०, रविवार.. किती छान सकाळ! आज किती तरी दिवसानी लवकर ऊठुन गच्चीत आलो होतो. पुर्वेला रंगांची उधळण चालली आहे. लाल-पिवळ्या रंगाच्या अनेक छटा डोळे सुखाऊन टाकत आहेत. काळपट पांढर्‍या तुरळक ढगांना आलेली सोनेरी किनार, किती मनमोहक. गेले दोन वर्षे नचुकता सुर्योदय पहाण्याचे भाग्य मला लाभले होते. बंडगार्डन मधील विशाल वृक्षांवर वस्ती केलेल्या अनेक पक्षांचा किलबिलाट कानभरुन ऐकला आहे. होळकर ब्रीजच्या समोरील टेकडीवरील शंभुमहादेवाला नमस्कार करुनच माझा दिवस सुरु होत असे. संपले सारे, आता तांबड फुटत असताना घरी यायचे आणि सुर्य पार डोक्यावर आला की ऊठायचे.

एक फार्सी गज़ल.....मिर्झा महम्मद हसन ( कातिल )

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 14/07/2010 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, आज एका फ़ार्सी भाषेतली गज़लेचा आनंद लुटूया. मी खाली अर्थ दिलेला आहेच आणि सैगल साहेबांचे गाणे पण दिले आहे. वाचून झाल्यावर ही गज़ल पुढे ठेवून ते गाणे जरूर ऐका आणि त्याचा आनंद घ्या. सध्याच्या वादग्रस्त वातावरणात तेवढीच जरा करमणूक !