Skip to main content

<घागरा>

लेखक अवलिया
Published on सोमवार, 02/08/2010
प्रेरणा... मोगरा... आणि आमचे परममित्र .. होय तोच तो ... निवासी लांडगा ;) आज भल्या दुपारी , कुठुन हा घागरा कडमडला. कॅफेमध्येच डोळ्यासमोर , तुझा मुखडा सुर्यासारखा अवतरला. मग त्या सोनेरी किरणात , मी सर्वांगी न्हाऊन निघालो. तुझ्या मदहोश हसण्यामध्ये , नकळत स्वत:ला हरवुन गेलो. जेंव्हा पुर्ण जाग आली , माझ्या गालावर खुलली होती लाली. खरं सांग बये , ही करामत आपोआप झाली , की दुपादुपारी तुझ्या हातांनी , बिन तोड गोलंदाजी केली .
काव्यरस
लेखनविषय:

याद्या 2226
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

अवलिया शेठ, परा च्यान बघतुया नव टारगट सॉरी टारगेट धरलया. .. बाकी चालू दे.. (वाचक)केशवसुमार

मस्त कविता ... तसेही तुमची प्रेरणा असलेले मित्र लाल झालेले गाल आणि निळे-काळे पडलेले डोळे ह्या अवतारात अज्जिबात चांगले दिसत नाहीत. ;)

ओह्ह्ह्ह!!! आत्ता कळले, परवा आमचा एक मित्र डेंटिस्टकडे गेलो होतो म्हणून गाल सुजलाय असं का सांगत होता ते... खुद के साथ बातां: या नानाला च्यायला सगळ्या आतल्या बातम्या बरोब्बर ठाऊक असतात.

म्हणून ती प्रतिक्रिया आली होती होय 'निवासी लांडगा' म्हणून? ;) (खुद के साथ बातां : रंगा, बिकानं परस्पर तुझा 'खुद के साथ बातां' ट्रेडमार्क वापरायला सुरुवात केलेई दिसते! :?) (अनिवासी)चतुरंग

म्हणून ती प्रतिक्रिया आली होती होय 'निवासी लांडगा' म्हणून?
=)) =)) च्यायला =)) =)) पार ठरवुन बाजार उठवतात !!

अच्छा.... हा घागरा होय?? मला वाटले अंदाज अपना अपना मध्ये आमिर खान म्हणतो तो, "गोगोजी, आपका घागरा!!!" चालू द्या... (निवासी)

"कॅफेमध्येच डोळ्यासमोर , तुझा मुखडा सुर्यासारखा अवतरला" यातला 'कॅफे', 'कॉफी'वाला की 'इंटरनेट' वाला हे कळलं तर जास्त मजा येईल! -असुर

आज मला सुजाता मस्तानीच्या एरियात सारखं दोस्त दोस्त ना रहा... ऐकू येत होतं. कारण आत्ता कळालं.