Skip to main content

<एक पाहुणी पोरगी>

लेखक अवलिया
Published on शनीवार, 31/07/2010
एक पाहुणी पोरगी फॉर्म भरायला येते आणि भलत्या अपेक्षेने स्टुल कापसाचं होते कसे न्याहाळती डोळे कसे चिकटती हात जणू अंधार राहतो सौंदर्याच्या फुफाट्यात ब्राउझरची खिडकी उगा राईट क्लिकते आणि पाहुण्या पोरीच्या हाती स्पेलिंग चुकते ..सारा दिस कॅफेवर तरी भरे ना फारम एक पाहुणी पोरगी गेली विसरून घर..
काव्यरस
लेखनविषय:

याद्या 3362
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

अवलियाशेठ, एकदम मस्त विडंबन..हा हा हा.. (वाचक)केशवसुमार आम्हाला हरिकथेतील कीर्तनकुमारांचे किस्से कॅफेतले हे प्रवचन आठवले (स्मरणशील)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

आम्हालाही कॅफेकुमारांचे किस्सेच आठवले. नाना,विडंबन झकास! स्वाती

पोरीकथेतील किस्सकुमारचे किस्से कॅफेतले आठवले! ;)

एक पाहुणी पोरगी गेली विसरून घर.. या ओळींनी मात्र घर करून गेलेल्या मैत्रींणींची नावं आठवली.

काय खरं नाय आता! नाना चांगलेच फॉर्म घेऊन मागे लागलेत तुमच्या! नाना, लै भारी विडंबन! "सारा दिस कॅफेवर" ही ओळ तर भारीच भारी!

अरे व्वा अवलिया, छान कवीता केलीस. अशाच कवीता करीत जा. प्रेषक राजाभाऊ

कॅफेकथेतील फॉर्मकुमारांची व फॉर्म भरायला आलेल्या कुमारीकेची कहाणी लै आवडली