पल पल दिल के पास.... एक स्वर्गीय अनुभव
पल पल दिल के पास! स्वर्गीय आनंद!!! इथे
सुरवातीचे गिटार व अकॉर्डीयनने गाण्याची एन्ट्री तर फारच रंगली आहे.
मोहक राखी अन् भावूक धर्मेंदर!
त्या सिनेमाचे एक आणखी वैशिष्ठ्य- त्यातील धर्मेदरचे विविध ड्रेसेस. त्यात तो फारच रुबाबदार वाटतो.
"हर रात यादों की बारात ले आए। " म्हणताना त्याच्या लांब कॉलरच्या रंगीत शर्टात....
मिसळपाव
अखेर आम्ही खरोखरच निघालो! अनेक बेत अनेकदा ठरतात आणि विरतात. तर आम्ही मोराच्या चिंचोलीला निघालो. नेहेमीप्रमाणे निघायला उशीर झालाच. त्यात भर म्हणजे खंडाळा घाटात ऐन बोगद्याच्या तोंडावर रेडीएटर मधुन भसाभस वाफ निघु लागली आणि आमची मिनीबस बघता बघता वाफेने भरली. तेवढाच फुकटात वाफेचे स्नान घेण्याचा विचार होता, पण पाणी भरेपर्यंत सर्वांनी खाली उतरायचे ठरले. पाणी आणायला तशी १०-१५ मिनिटे लागणारच होती. उतरून समोर पाहतो तर डोंगरमाथा धुक्यात शिरला होता.