Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by युयुत्सु on Tue, 09/20/2011 - 13:18
लेखनविषय (Tags)
नोकरी
जीवनमान
काही वर्षापूर्वीची गोष्ट... मी आयआयटीमध्ये माझ्या प्राध्यापकाना भेटण्यासाठी गेलो होतो. मला जेव्हा जेव्हा ऊर्जा कमी पडते तेव्हा तेव्हा मला आय आय टी परिसराची एक चक्कर पुरेशी असते. त्या खेपेला मी, मला दिलेला शब्द पाळणा-या आणि मी दूखावला गेलो तेव्हा माझी क्षमा मागण्याचा मोठे पणा दाखवणा-या प्रा. अरूणकुमारांना पण भेटलो. त्यांना लेक्चरला जायचे असल्याने आमच्यात संक्षिप्त अंवाद झाला. तो एखाद्या झेन गुरु शिष्यातील संवादासारखा होता. तो असा... "Rajeev, what are you doing these days? "- प्रा. अरूणकुमार "Sir, I am working in a private software company as Project Manager." -मी "What is the team size?" - प्रा. अरूणकुमार "8-10 developers"-मी "How long you have been with them?" - प्रा. अरूणकुमार "Now almost 3 years." -मी "Who is on your top?" - प्रा. अरूणकुमार "Vice President and CMD!" -मी "How many IITians are there in your organization?" - प्रा. अरूणकुमार "Only two, sir! Me and my boss. " -मी "Rajeev, you should seriously think of changing your job" - प्रा. अरूणकुमार मला झेन शिष्याप्रमाणे तत्काळ निर्वाण प्राप्त झाले!
  • Log in or register to post comments
  • 23605 views

प्रतिक्रिया

Submitted by आदिजोशी on Tue, 09/20/2011 - 13:42

Permalink

.

का बाउंसर टाकताय?
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 09/20/2011 - 13:46

Permalink

आयआयटियन आहात हे कळून अत्यंत

आयआयटियन आहात हे कळून अत्यंत आदर वाटला..
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on Tue, 09/20/2011 - 13:49

Permalink

पुढे काय झाले ?

जॉब बदलला का की स्वतःची कंपनी चालु केली ?
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Tue, 09/20/2011 - 13:50

Permalink

नामषेश होत जाणारी गुरु-शिष्य परंपरा

छान. असे तीन ते चार वाक्यात आपला मुद्दा समजावणारे गुरु आणि तो तसा समजणारे शिष्य आजकाल विरळाच.
  • Log in or register to post comments

Submitted by युयुत्सु on Tue, 09/20/2011 - 13:57

In reply to नामषेश होत जाणारी गुरु-शिष्य परंपरा by इंटरनेटस्नेही

Permalink

असे तीन ते चार वाक्यात आपला

असे तीन ते चार वाक्यात आपला मुद्दा समजावणारे गुरु आणि तो तसा समजणारे शिष्य आजकाल विरळाच.
:)
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Tue, 09/20/2011 - 14:09

Permalink

करेक्ट ...

प्रा. अरुणकुमार बरोबर बोलले असे वाटते. तुम्हाला निर्वाण प्राप्त झाल्यानंतर तुम्ही काय केले हे जाणण्यास उत्सुक. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by युयुत्सु on Tue, 09/20/2011 - 14:15

In reply to करेक्ट ... by छोटा डॉन

Permalink

तुम्हाला निर्वाण प्राप्त

तुम्हाला निर्वाण प्राप्त झाल्यानंतर तुम्ही काय केले हे जाणण्यास उत्सुक.
रसेल आणि अभय बंग यांच्या विचारानी निवृत्त व्हायला प्रवृत्त केले.
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Tue, 09/20/2011 - 14:39

In reply to तुम्हाला निर्वाण प्राप्त by युयुत्सु

Permalink

रसेल आणि अभय बंग यांच्या

रसेल आणि अभय बंग यांच्या विचारानी निवृत्त व्हायला प्रवृत्त केले.
मिपावरुनही लौकरच निवॄत्त व्हाल ही ई. प्रा......
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Tue, 09/20/2011 - 14:42

In reply to रसेल आणि अभय बंग यांच्या by वपाडाव

Permalink

का ?

>>मिपावरुनही लौकरच निवॄत्त व्हाल ही ई. प्रा...... ह्या इच्छे/सदिच्छे मागचे कारण कळु शकेल काय ? आपल्याला सदर प्रार्थना करण्यामागे कसली इश्वरी प्रेरणा मिळाली ह्याचा आपण इथे उहापोह केलात तर त्याचा उपयोग अनेक मिपाकरांना भविष्यात होऊ शकतो अशी शक्यता वाटते. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Tue, 09/20/2011 - 14:55

In reply to का ? by छोटा डॉन

Permalink

असंच मनाला वाटलं म्हणुन

असंच मनाला वाटलं म्हणुन व्यक्त केले विचार..... असे प्राध्यापक आम्हांस लाभले असता आम्हीही शतकी धागेकर्ते जाहलो असतो..... बाकी आमचं अन देवाचं लहानपणापासुन क्रॉसिंग कधी झालंच नाही.... जास्तीत जास्त त्याच्या चरणी प्रार्थना करु शकतो एवढेच.... माझी ही मनोकामना कधी पुर्ण होइल हे युयुत्सुंनाच विचारावे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Tue, 09/20/2011 - 18:59

In reply to का ? by छोटा डॉन

Permalink

का नको?

>>ह्या इच्छे/सदिच्छे मागचे कारण कळु शकेल काय ? सदिच्छेला कारण का असावे बुवा? या आर्डिनरी लोकांच्या लाईफमध्ये (संस्थळं वगैरे) प्रमोशन होऊन ध्यान वगैरे करत बसाल अशी सदिच्छा असेल तर त्याला आक्षेप का म्हणे? आम्ही तर "तुम्ही या मनुक्ष जन्मातुनच मुक्त व्हा" अशी सदिच्छा अनेकांना देऊ इच्छितो, पण डान्रावांच्या प्रतिसादांना घाबरून देत नाही. परवानगी द्या हो डान्राव!
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Wed, 09/21/2011 - 10:57

In reply to का नको? by Nile

Permalink

_/\_

आम्हांस पाठिंबा दिल्याबदाल हे स्वीकार करावे अशी विनंती मी नाइलला करत आहे.....
  • Log in or register to post comments

Submitted by युयुत्सु on Wed, 09/21/2011 - 13:49

In reply to रसेल आणि अभय बंग यांच्या by वपाडाव

Permalink

मिपावरुनही लौकरच निवॄत्त

मिपावरुनही लौकरच निवॄत्त व्हाल ही ई. प्रा.....
त्यासाठी प्रवृत्त करणारा रसेल इतका कुणितरी खंबीर हवा भेटायला :)
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Tue, 09/20/2011 - 14:13

Permalink

साहजिक आहे.

IIT मध्ये शिकून प्रोजेक्ट मॅनेजमेंट करायचं म्हणजे......
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Tue, 09/20/2011 - 14:18

Permalink

काहीच बोध झाला नाही, कोणी

काहीच बोध झाला नाही, कोणी समजावेल का ?
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Tue, 09/20/2011 - 14:41

In reply to काहीच बोध झाला नाही, कोणी by मराठी_माणूस

Permalink

आपण प्रा. अरुणकुमार यांच्याशी

आपण प्रा. अरुणकुमार यांच्याशी संपर्क साधावा अशी सुचना करतो.....
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Tue, 09/20/2011 - 15:00

Permalink

हुश्श...

बरं झालं जे ई ई ला बसलो नाही. बा द वे. अभियांत्रिकी ते ज्योतिषयांत्रिकी हा प्रवास कसा झाला तेही युयुत्सुंनी लिहावे.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंद on Tue, 09/20/2011 - 15:52

Permalink

धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य!

धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य! संत रांचो ची काही वचने आठवली. कंपनीत किती आयायटीयन्स आहेत ह्या पेक्षा नविन आणि क्रियेटीव काय केल आहेस अस विचारल असत गुरुंनी तर बर वाटल असत. ( तुमचे प्राध्यापकांच नाव विरु सहत्रबुद्धे असाव अस उगीचच वाटुन गेल.)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 09/20/2011 - 16:16

In reply to धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य! by आनंद

Permalink

( तुमचे प्राध्यापकांच नाव

( तुमचे प्राध्यापकांच नाव विरु सहत्रबुद्धे असाव अस उगीचच वाटुन गेल.) ख्या ख्या ख्या... खी खी खी ! ;) आनंदराव लयं बेक्कार हसायला लावलयतं तुम्ही मला. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Tue, 09/20/2011 - 15:56

Permalink

जसे एकाच जंगलात २ सिंह असू

जसे एकाच जंगलात २ सिंह असू शकत नाहीत, तसेच एकाच कम्पनीत २ आयाअयटीयन्स राहू शकत नाहीत, असे काहीसे असावे ते. :)
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Tue, 09/20/2011 - 16:40

In reply to जसे एकाच जंगलात २ सिंह असू by कवितानागेश

Permalink

साबण

साबण बनवणारर्‍या दोन मोठ्या कंपन्यांत अनेक आयआयटीयन्स शेकड्याने असायचे. गुरुला असे सांगायचे असावे की-तूझा जो बॉस आहे तो तुझ्याएढाच कष्टाळू ,शिस्तप्रिय आहे. तेव्हा त्यात तुझा फार काही फायदा होणार नाही. आपल्याहून अधिक बुद्धिमान हार्वर्ड,एम आय टी,CMU,बर्कली,स्टॅनफर्डचा आता बॉस बघ.त्यातच तुझा फायदा आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Tue, 09/20/2011 - 16:14

Permalink

अरारारा...

आयायटीयनवर लोकांना आवसं-पुनवंची भीती दाखवण्याची वेळ आली आहे. काय होणार या देशाचं.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Tue, 09/20/2011 - 16:33

Permalink

कॉटर

प्रिय धवा साहेब, चांगलेच धवुन टाकले की वो. असो. माझ्या मनातल्या प्रतिसादाबद्दल तुम्हाला एक कॉटर लागु. बोला अमुशेला बसुया का पोरणिमेला?
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Tue, 09/20/2011 - 17:09

In reply to कॉटर by विनायक प्रभू

Permalink

कधीही...

आम्हाला काही अजून गुरुपदेश झालेला नाही. ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on Tue, 09/20/2011 - 16:40

Permalink

तुमच्या बॉसला खूप खूप

तुमच्या बॉसला खूप खूप शुभेच्छा ... :p :p
  • Log in or register to post comments

Submitted by मी ऋचा on Tue, 09/20/2011 - 17:32

Permalink

हा लेख झेन गुरु वा

हा लेख झेन गुरु वा शिष्यांच्या वाचनात येउ नये यासाठी काय उपाय्योजना करता येतील?
  • Log in or register to post comments

Submitted by मी ऋचा on Tue, 09/20/2011 - 17:42

Permalink

दो आ प्र का टा आ

दो आ प्र का टा आ
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 09/20/2011 - 19:14

Permalink

ग्रेट

सामंत काकांच्या आठवणीने उर भरुन आले. अधिक प्रकाश भडकमकर मास्तर अथवा 'सां.प्र.मं.' चे कार्यकर्ते व सदस्य टाकतीलच.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 09/20/2011 - 19:17

Permalink

हे झेन शिष्य

हे झेन शिष्य काय प्रकरण असतं ब्वॉ ??Image removed. झेन तर झेनच झेन !! -एवढंच माहित असलेला, बाकी बाऊंसर.
  • Log in or register to post comments

Submitted by शाहरुख on Tue, 09/20/2011 - 21:20

Permalink

युयुत्सु सर, तुमच्या मास्तरला

युयुत्सु सर, तुमच्या मास्तरला बराच माज दिसतोय..अर्थात हे मत वरील संवादावरुन बनवले आहे..त्यांचे अजुन अनुभव सांगितल्यास मत बदलू शकते !
  • Log in or register to post comments

Submitted by युयुत्सु on Wed, 09/21/2011 - 13:45

In reply to युयुत्सु सर, तुमच्या मास्तरला by शाहरुख

Permalink

तुमच्या मास्तरला बराच माज

तुमच्या मास्तरला बराच माज दिसतोय.
अहो असणारच. त्यांनी बर्कले विद्यापीठातून पीएचडी केली आणि ती पण मोजून १८ महिन्यात...
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 09/21/2011 - 14:39

In reply to तुमच्या मास्तरला बराच माज by युयुत्सु

Permalink

??

अहो असणारच. त्यांनी बर्कले विद्यापीठातून पीएचडी केली आणि ती पण मोजून १८ महिन्यात...
बर्र मग ? अहो आमच्या ज्ञानेश्वरांनी १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीली.. रामदासांनी कोवळ्या वयात जगाची चिंता करायला सुरुवात केली.. छत्रपतींनी कुमार वयात स्वराज्याचे तोरण बांधले... विवेकानंदांनी... असो... ह्यांनी कधी माज केलेला ऐकीवात नै बॉ ! येवढेच कशाला, आधुनीक ज्ञानेश्वर म्हणून ख्याती पावलेल्या आमच्या विनयक पाचलगने अवघ्या १८ व्या वर्षी सिंदबादला कोल्हापूरात आणले, चेतन भगतला अनावृत्त पत्र लिहीले, संघाच्या गुण दोषांचा आढावा घेतला, तंत्रज्ञानामूळे जगात काय क्रांती झाली आहे हे जगापुढे आणले.. पण त्याने देखील कधी माज दाखवला नाही हो. च्यायला ! १०० वर्षे आयुष्य आहे हो ह्या आमच्या विनायकाला. हा प्रतिसाद लिहून सुपूर्त केला आणि त्याचा समस आला. विनायकाची यंगेस्ट गेस्ट रेडियो जॉकी म्हणून निवड झाली आहे बघा टॉमॅटो FM वरती. तो 'नया जमाना' नावाचा शो सादर करणार आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on गुरुवार, 09/22/2011 - 09:12

In reply to ?? by परिकथेतील राजकुमार

Permalink

तरीही...

येवढेच कशाला, आधुनीक ज्ञानेश्वर म्हणून ख्याती पावलेल्या आमच्या विनयक पाचलगने अवघ्या १८ व्या वर्षी सिंदबादला कोल्हापूरात आणले, चेतन भगतला अनावृत्त पत्र लिहीले, संघाच्या गुण दोषांचा आढावा घेतला, तंत्रज्ञानामूळे जगात काय क्रांती झाली आहे हे जगापुढे आणले.. पण त्याने देखील कधी माज दाखवला नाही हो. च्यायला ! १०० वर्षे आयुष्य आहे हो ह्या आमच्या विनायकाला. हा प्रतिसाद लिहून सुपूर्त केला आणि त्याचा समस आला. विनायकाची यंगेस्ट गेस्ट रेडियो जॉकी म्हणून निवड झाली आहे बघा टॉमॅटो FM वरती. तो 'नया जमाना' नावाचा शो सादर करणार आहे.
एव्हढं सारं असलं तरीही तुमच्या आधुनिक ज्ञानेश्वरांना आयायटीची जे ई ई क्रॅक करता आली नाही हे वास्तव आहे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on गुरुवार, 09/22/2011 - 10:12

In reply to तरीही... by धन्या

Permalink

पात्रता

>>तुमच्या आधुनिक ज्ञानेश्वरांना आयायटीची जे ई ई क्रॅक करता आली नाही हे वास्तव आहे हे अगदी वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे विधान आहे. ज्ञानेश्वरांनी तिथे शिकावं अशी आयायटीची पात्रता नसल्याने आयायटीने नम्रपणे ज्ञानेश्वरांना नकार दिला.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 09/23/2011 - 11:35

In reply to ?? by परिकथेतील राजकुमार

Permalink

>>>येवढेच कशाला, आधुनीक

>>>येवढेच कशाला, आधुनीक ज्ञानेश्वर म्हणून ख्याती पावलेल्या आमच्या विनयक पाचलगने अवघ्या १८ व्या वर्षी सिंदबादला कोल्हापूरात आणले, चेतन भगतला अनावृत्त पत्र लिहीले, संघाच्या गुण दोषांचा आढावा घेतला, तंत्रज्ञानामूळे जगात काय क्रांती झाली आहे हे जगापुढे आणले.. पण त्याने देखील कधी माज दाखवला नाही हो. प्रिय परा, वयाच्या १५ व्या वर्षी लोकसत्तामध्ये लेख छापून आलेल्या मा. ना. चेतन सुभाष गुगळे (आमच्यासाठी चेसुगु) यांचे नाव आपण घेतलेले नाही हे आपणास विनम्रपणे सुचवू इच्छितो आणि त्यांचे असे नाव न घेतल्याबद्दल आणि त्यांचे खरे मूल्य न जाणल्याबद्द्ल 'आणि हो' त्यांना आद्य प्रतिज्ञानेश्वर न म्हटल्याबद्दल आपला जाहिर णिषेढ....!!!
  • Log in or register to post comments

Submitted by बाळकराम on गुरुवार, 09/22/2011 - 03:20

In reply to तुमच्या मास्तरला बराच माज by युयुत्सु

Permalink

माज

युयुत्सु, इथे इंग्लंडमध्ये मी जेमतेम पदवी घेतलेले किंवा पदवी सुद्धा नसलेले काही लोक वयाच्या २९व्या वर्षी मोठया संस्थांचे सीईओ झालेले आहेत, आणि ते ही अजिबात माज नसलेले! च्यायला, हे आयआयटीयन्स नुसते अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले लोक दिसतात! आयआयटी तर सोडाच पण जगातल्या पहिल्या ५ विद्यापीठातून एमबीए/पीएचडी वगैरे केलेले अनेक हुशार लोकांचा मला सहवास मिळाला, पण असली माजोरडी भाषा कुणाच्याच तोंडी ऐकली नाही. मी स्वतः लंडनच्या एका नामवंत विद्यापीठातून एमबीए केल आहे, पण स्वानुभावाने आणि इतरांच्याही अनुभवाने एक सांगू शकतो की ही सगळी नामवंत विद्यापीठे-मग ती आयव्ही लीग असोत वा रसेल ग्रुप विद्यापीठे असोत- ती केवळ एक ब्रँड आहेत. शेवटी तुमची गुणवत्ताच कामी येते आणि ती केवळ या नामवंत विद्यापीठात शिकलेल्या लोकांचीच मक्तेदारी नाही. मला वाटतं-२००४/०५ मध्ये एक सर्वे झाला होता की फोर्ब्स ५०० मधल्या कंपन्यांचे किती सीईओ या नामवंत विद्यापीठात शिकलेले आहेत- तर फक्त ४% सीईओ तसे निघाले! ( आयआयटी/आयआयएम वगैरे तर लांबच राहिले) "बर्कली, स्टॅनफर्ड इ मधून २ वर्षात पीएचडी केली" वगैरेची क्रेझ टीनएजर असताना ठीक असते, आता एवढं आयुष्य बघितल्यावर जर कुणाला त्याचं फाजील कौतुक असेल तर मग कठीण आहे बुवा! इथे कुणालाही कमी लेखण्याचा उद्देश नाही, आणि अशा शैक्षणिक कर्तृत्त्वाचा अपमान करण्याची इच्छा नाही, पण म्हणून केवळ त्या आधारावर जर कुणी दुसर्‍याला कमी लेखत असेल तर त्याला जागा दाखवलीच पाहिजे, एवढं मात्र खरं!
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 09/22/2011 - 09:07

In reply to माज by बाळकराम

Permalink

आपले "आयडल्स"

"बर्कली, स्टॅनफर्ड इ मधून २ वर्षात पीएचडी केली" वगैरेची क्रेझ टीनएजर असताना ठीक असते, आता एवढं आयुष्य बघितल्यावर जर कुणाला त्याचं फाजील कौतुक असेल तर मग कठीण आहे बुवा!
बोर्डावर असलेली आपले "आयडल्स" ही चर्चा आठवली.
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on गुरुवार, 09/22/2011 - 10:31

In reply to माज by बाळकराम

Permalink

"बर्कली, स्टॅनफर्ड इ मधून २

"बर्कली, स्टॅनफर्ड इ मधून २ वर्षात पीएचडी केली" वगैरेची क्रेझ टीनएजर असताना ठीक असते
आवेगात थोडं जास्त बोलुन गेलात काय बा.रा. ??? टीनेजर मध्ये जर ह्या क्रेझेस यायला लागल्या तर मैथुनाचे कांड दुसरीपासुन करावेत काय पोरांनी..... ज्यांना आत्ता कुठे आपला पार्श्वभाग नीटपणे धुवायला जमतोय, अशी टीनेजर मंडळी जास्तीत जास्त ग्रॅज्युएशन बद्दल क्रेझी असतील..... हे काहीही, जरा वाढीव प्रकरण होतंय.....
  • Log in or register to post comments

Submitted by उदय on Fri, 09/23/2011 - 09:19

In reply to तुमच्या मास्तरला बराच माज by युयुत्सु

Permalink

बरं मग..

अहो असणारच. त्यांनी बर्कले विद्यापीठातून पीएचडी केली आणि ती पण मोजून १८ महिन्यात...
हे वाचून मला P.A.M. Dirac याची आठवण झाली ज्याने त्याचा Ph.D. thesis फक्त १७ पानांमध्ये लिहिला होता. याच P.A.M. Dirac ला १९३३ साली भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषक मिळाले. तुमच्या प्राध्यापकांना नोबेल किंवा तत्सम प्रसिध्द पुरस्कार मिळाले असतील किंवा प्राध्यापकांकडे काही patents असतील किंवा त्यांनी लिहिलेली काही पुस्तके अभ्यासक्रमात असतील तर ते जाणून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 09/21/2011 - 00:27

Permalink

हा तर चक्क गर्विष्ठपणा झाला!

तुमच्या मास्तरांना फक्त आयायटियनच खरे काम करु शकतात असे वाटते की काय? अहो असे असते तर जिथे जिथे आयायटियन आहेत तिथे तिथे फार वेगळे चित्र दिसले असते. आमच्या माहितीतले अनेक आयायटिअन हे कॉमनसेन्सला इतके कमी बघितले आहेत की आम्हाला शेवटी आयायटीचीच काळजी वाटायला लागली! ;) आयायटीच्या बर्‍याच लोकांना एक सुप्त माज असतो असं आमचं अनेक वर्षांचं निरीक्षण आहे. भले तो माज दाखवण्याची त्यांची पात्रता असो वा नसो पण तो असतो आणि तो वेळी अवेळी दाखवायचा असा उद्दामपणाही असतो. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी सर्वसामान्य कॉलेजातून पदवीधर झालेले कित्येक अभियंते हे उच्च दर्जाचे काम करताना मी बघत आलो आहे. त्यामुळे तुमची काम करण्याची क्षमता आणि आयायटी किंवा कोणतेही उच्च दर्जाचे कॉलेज यांचा अर्थाअर्थी काही संबंध असतोच असे नाही! -रंगा
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Wed, 09/21/2011 - 11:54

In reply to हा तर चक्क गर्विष्ठपणा झाला! by चतुरंग

Permalink

शक्य आहे ...

रंगाशेठ जे म्हणत आहेत ते शक्य आहे. तरीही आयआयटीयन्स किंवा तत्सम हायक्लास टेक. इन्स्टिट्युट आणि इतर कॉलेजेस इथले विद्यार्थी आणि आणि इतर बर्‍यापैकी सामान्य कॉलेजेसमधील विद्यार्थी ह्यांच्यात 'विचार करण्याच्या क्षमतेत' बराच फरक असतो असे वाटते. जनरली अशा उच्च कॉलेजेसचा सिलॅबस किंवा वर्षातले कार्यक्रम ठरवताना त्यात विद्यार्थ्याच्या विचारक्षमतेस चालना मिळेल व तो सदैव काही ना काही करण्यात बिझी राहिल ह्या हेतुने डिझाईन केलेला असतो. बाकी बर्‍याच कॉलेजात आजही शाळेप्रमाणे लेक्चर्स, पाठांतर, लेखन आदी बाबींवरच भर दिलेला असतो. आजही अनेक कॉलेजेस केवळ मार्क पाडुन घेणे व इंजिनियर्स बनवणे ह्याचे कारखाने झाले आहेत. मात्र आयआयटी किंवा इतर उच्च संस्थांमध्ये मार्क्स (किंवा ग्रेड) जरी महत्वाचे असले तरी विद्यार्थ्यांच्या इतर क्षमतांचा सुद्धा विकास होतो असे माझे स्पष्ट मत आहे. सामान्य कॉलेजातले अभियंते उच्च दर्जाचे काम करतात हे सत्य असले तरी उच्च शैक्षणिक संस्थांमधुन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची 'क्षमता' सरासरीत जास्तच असते असे मला वाटते. एकाच विद्यार्थ्याला उच्च संस्थेमधुन आणि इतर संस्थेमधुन असे शिक्षणाचे २ पर्याय ठेवले तर तो विद्यार्थी जेव्हा उच्च संस्थेमधुन शिक्षण घेऊन बाहेर पडेल तो पहिल्या केसपेक्षा नक्कीच जास्त कपॅबल असेल असे वाटते. आयआयटीचा बागुलबुवा उभा करायचा नाही पण आत्तापर्यंत जे काही तांत्रिक क्षेत्र आणि त्यात काम करणारे लोक पाहिले तर मी उच्च शैक्षणिक संस्थांमधुन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जरा जास्तच क्षमता असते हे मान्य करतो. असो. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Wed, 09/21/2011 - 13:15

In reply to शक्य आहे ... by छोटा डॉन

Permalink

आत्तापर्यंत जे काही तांत्रिक

आत्तापर्यंत जे काही तांत्रिक क्षेत्र आणि त्यात काम करणारे लोक पाहिले तर मी उच्च शैक्षणिक संस्थांमधुन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जरा जास्तच क्षमता असते हे मान्य करतो
असे सरसकट असेलच असे नाही पण बहुतेकवेळा हे खरे असते ते मान्य आहे. परंतु अशा उच्च तांत्रिक संस्थांमधून बाहेर पडून या जास्त क्षमता असलेल्या लोकांनी मूलभूत असे काही केलेले दिसत नाही. तंत्रविज्ञानात संशोधन वगैरे करणे, उत्पादनाच्या नव्या पद्धती विकसिक करणे किंवा गेलाबाजार पूर्णतः भारतीय बनावटीचे एखादे सॉफ्टवेअर प्रॉडक्ट तयार करणे या लोकांना जमलेले दिसत नाही. असे असताना ज्यात तांत्रिक शिक्षणाचा काहीही उपयोग नसतो अशा 'प्रकल्प व्यवस्थापनाचे' काम करणार्‍या आयआयटीयनने फुकाची टिमकी वाजवावी हे अत्यंत मनोरंजक आणि कूपमंडूक वृत्तीचे निदर्शक आहे हे सांगितलेच पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Wed, 09/21/2011 - 13:56

In reply to आत्तापर्यंत जे काही तांत्रिक by नगरीनिरंजन

Permalink

?

परंतु अशा उच्च तांत्रिक संस्थांमधून बाहेर पडून या जास्त क्षमता असलेल्या लोकांनी मूलभूत असे काही केलेले दिसत नाही. तंत्रविज्ञानात संशोधन वगैरे करणे, उत्पादनाच्या नव्या पद्धती विकसिक करणे किंवा गेलाबाजार पूर्णतः भारतीय बनावटीचे एखादे सॉफ्टवेअर प्रॉडक्ट तयार करणे या लोकांना जमलेले दिसत नाही.
? असा काही ठोस विदा आहे का ? उलट मी संशोधन विभागात भरमसाट उच्च संस्थामधले विद्यार्थी पाहतो. अजुन रोचक गोष्ट सांगायची म्हणजे कंपन्या आजकाल त्यांच्या कर्मचारी वर्गाला अशा उच्च संस्थांमधुन उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देत आहे, त्यासाठी स्पेशल कोलॅबोरेशन क्लासेस होत आहे, खास अभ्यासक्रम रचला जात आहे (ह्या सर्व बाबींचा माझ्याकडे व्यवस्थित विदा आहे).
असे असताना ज्यात तांत्रिक शिक्षणाचा काहीही उपयोग नसतो अशा 'प्रकल्प व्यवस्थापनाचे' काम करणार्‍या आयआयटीयनने फुकाची टिमकी वाजवावी हे अत्यंत मनोरंजक आणि कूपमंडूक वृत्तीचे निदर्शक आहे
तुम्ही म्हणता ते सत्य आहे, तरीही मला त्यात 'कूपमंडूक' वृत्ती दिसली नाही. लेखकाने इतरांना बाजुला सारुन त्यांना आयआयटीयन असल्यामुळेच प्रकल्प व्यवस्थापकाचे काम मिळाले असा दावा केल्याचे दिसले नाही. बाकी पुर्वार्धाशी सहमत आहे, आयआयटीयनने उच्च तांत्रिक शिक्षण घेऊन 'प्रकल्प व्यवस्थापका'चे काम करण्यात काय मजा नाही राव. :) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Wed, 09/21/2011 - 14:06

In reply to ? by छोटा डॉन

Permalink

असा काही ठोस विदा आहे का

असा काही ठोस विदा आहे का ?
एखादी गोष्ट नाही हे कसे सिद्ध करणार? अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट, सन, ओरॅकल वगैरे कंपन्यांमध्ये ढिगानी आयआयटीयन्स असतील पण तितक्याच ढिगानी बाकीचे ही पामर आहेत. तुमच्याकडचा विदा वापरून आयआयटीतल्या लोकांनी (भारतातल्या) इतर लोकांपेक्षा जास्त नवनिर्मिती केली आहे हे जरा समजावून सांगा. तसे सिद्ध करणे अवघड नसावे. त्यानंतर ते धागाकर्त्याला कितपत लागू आहे त्याचा उहापोह करता येईल. 'कूपमंडूक' हा शब्द स्वतःचे विशेष असे कर्तृत्व नसताना आपल्या शिक्षणसंस्थेच्या पुण्याईवर मिपाच्या विहीरीत डराव डराव करण्याच्या प्रवृत्तीसाठी वापरला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on गुरुवार, 09/22/2011 - 03:04

In reply to आत्तापर्यंत जे काही तांत्रिक by नगरीनिरंजन

Permalink

आयआयटी =! संशोधन.

>>परंतु अशा उच्च तांत्रिक संस्थांमधून बाहेर पडून या जास्त क्षमता असलेल्या लोकांनी मूलभूत असे काही केलेले दिसत नाही. तंत्रविज्ञानात संशोधन वगैरे करणे, उत्पादनाच्या नव्या पद्धती विकसिक करणे किंवा गेलाबाजार पूर्णतः भारतीय बनावटीचे एखादे सॉफ्टवेअर प्रॉडक्ट तयार करणे या लोकांना जमलेले दिसत नाही. आयआयटी मध्ये शिकणारी सरासरी "देशातील सरासरी अभियंत्यांपेक्षा" चांगली असतात या मताशी मी सहमत आहे. आयआयटीतील पुष्कळ मित्र वगैरे या अनुभवावरून. पण त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे, बॅचलर इन इंजिनीअरींग आणि संशोधनाचा संबंध थेट लावणं चुकिचं आहे. मुळात आयआयटींच्या स्थापनाचा उद्देश इंडंस्ट्रीअल विकासाचा होता. तेव्हाच्या प्रगत देशांकडून(जर्मनी, रशिया, अमेरीका इ.) असे तंत्रज्ञान घेऊन वेगवेगळ्या आयआयटी स्थापन केल्या गेल्या हे माहितच असेल. आयआयटीतून बी.टेक होऊन संशोधनात जाणारे अनेक माझ्या वैयक्तिक ओळखीचे आहेत. पण त्यांचे संशोधनाचे करीअर इतर संशोधनात नाव कमावलेल्या विद्यापिठांत झाले. भारतात, खुद्द आयआयटीमध्येच काय म्हणतात हे सांगितल्यावर अधिक स्पष्टीकरण देण्याची गरज पडू नये. "In IIT Bachelors is product, Masters is byproduct and PhD is waste."
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on गुरुवार, 09/22/2011 - 03:21

In reply to आयआयटी =! संशोधन. by Nile

Permalink

"In IIT Bachelors is product,

"In IIT Bachelors is product, Masters is byproduct and PhD is waste." हां, म्हंजी मग त्ये वर्ले प्रा. IIT ह्या कारखान्यामंदी लेथमशीनवर कामं कर्नारे कामगार व्हते तर! लईच हार्ड काम हाय ब्वॉ या कारखान्यात. पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(मेक्यॅनीक- ITI-डिझल इंजन)
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on गुरुवार, 09/22/2011 - 10:51

In reply to आयआयटी =! संशोधन. by Nile

Permalink

तुझं बरोबर आहे. IIT आणि

तुझं बरोबर आहे. IIT आणि संशोधनाचा संबंध लावणे चुकीचे आहे. पण मग जेव्हा आपण म्हणतो की
आयआयटी मध्ये शिकणारी सरासरी "देशातील सरासरी अभियंत्यांपेक्षा" चांगली असतात
त्याचे कारण ते IIT मध्ये शिकतात हे आहे की IIT ची प्रवेशपरीक्षा पास होण्याएवढी बुद्धीमत्ता आधीच त्यांच्याकडे असते हे आहे? अशा बुद्धीमत्तेचा माणूस कुठेही शिकला तरी तेवढाच चांगला होईल असे वाटते. यावर काय मत?
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on गुरुवार, 09/22/2011 - 11:09

In reply to तुझं बरोबर आहे. IIT आणि by नगरीनिरंजन

Permalink

ग्रे एरिया!

त्याचे कारण ते IIT मध्ये शिकतात हे आहे की IIT ची प्रवेशपरीक्षा पास होण्याएवढी बुद्धीमत्ता आधीच त्यांच्याकडे असते हे आहे? अशा बुद्धीमत्तेचा माणूस कुठेही शिकला तरी तेवढाच चांगला होईल असे वाटते. यावर काय मत?
मला हे असं ब्लॅक आणि व्हाईट वाटत नाही. काही लोक इतके चांगले असतात की ते दुय्यम दर्जाच्या ठिकाणी जाऊनही पुढे येतात हे खरे आहे. मात्र सरासरी विद्यार्थ्याला आयआयटी (बॅचलर हे गृहित) कल्चरमध्ये घातल्यास त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा जास्त चांगला प्रवास होऊ शकतो असे माझे मत आहे. थोडे स्पेसिफिक सांगायचे तर, मी जर आयआयटीतून बॅचलर्स केलं असतं तर फार चांगलं झालं असतं असं माझं मत आहे. (अर्थात मूळ आयआयटींबद्दलच मला विशेष प्रेम आहे) दुसरं म्हणजे, आयआयटीत प्रवेशासाठी खूप तयारी आणि बुद्धिमत्ता लागते हे खरे आहे. पण कोणत्याही विद्यापिठात एखादा एरवी सामान्य असणार अचानक प्रगती करतो तर एखादा मध्येच ढेपाळतो. त्यामुळे असे जनरलाईज्ड करणे फार अवघड आहे. म्हणून, इतर सगळे फॅक्टर्स सारखे समजले तर तीच व्यक्ती आयआयटी कल्चर मधून बॅचलर झाली तर तीच तिच्या इतर रेग्युलर इंजिनीअरींग कॉलेजमधून बॅचलर झालेल्यापेक्षा सरस असेल असे माझे मत आहे. अर्थात हे मत पुराव्यानिशी सिद्ध करता येणे अवघड आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 09/22/2011 - 11:34

In reply to ग्रे एरिया! by Nile

Permalink

अचूक आणि नेमके ...

इतर सगळे फॅक्टर्स सारखे समजले तर तीच व्यक्ती आयआयटी कल्चर मधून बॅचलर झाली तर तीच तिच्या इतर रेग्युलर इंजिनीअरींग कॉलेजमधून बॅचलर झालेल्यापेक्षा सरस असेल असे माझे मत आहे. अर्थात हे मत पुराव्यानिशी सिद्ध करता येणे अवघड आहे.
+१, अगदी हेच म्हणायचे आहे. नाईल्या महान आहे हे जाताजाता कबुल करतो. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on गुरुवार, 09/22/2011 - 12:02

In reply to ग्रे एरिया! by Nile

Permalink

माझ्या या उपप्रतिसादात

माझ्या या उपप्रतिसादात बहुतेकवेळा हे खरे असते हे मी आधीच मान्य केले आहे. पण मुद्दा तरीही असा उरतो की IITच्या निर्मितीची कारणे, त्याला दिले गेलेले महत्व, तिथल्या मूलभूत सुविधा आणि इतर कॉलेजेसच्या सुविधा यातही फरक असतोच, मग त्यामानाने मार्जिनली चांगले असणार्‍या या लोकांनी इतरांप्रती असा दृष्टीकोन ठेवणे हे त्यांच्या चांगले असण्याच्या फरकाच्या मानाने अवाजवी आहे की नाही? सुदैवाने मी ज्या ज्या कंपन्यांमध्ये काम केले तिथे असलेल्या आयआयटीयन्सकडे क्षमता किंवा वृथाभिमान या दोन्ही गोष्टी अतिरिक्त असल्याचे मला कधी जाणवले नाही.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com