Skip to main content

मौजमजा

ए टेल ऑफ टू सिस्टर्स

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 16/08/2011 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
द ग्रज पाहिल्यानंतर जापनीज आणि कोरिअन हॉरर चित्रपटांविषयी कायमच उत्सुकता वाटू लागली होती. भयपट बघायचे तर जापनीज किंवा कोरिअनच असे जणू ठरवून टाकले आहे. ह्याच चित्रपटांच्या रांगेत परवा अचानक 'ए टेल ऑफ टू सिस्टर्स' हा कोरिअन चित्रपट हाताला लागला आणि कधी एकदा पाहून संपवतो असे झाले.

तळतेस भजी तू जेव्हां -

लेखक विदेश यांनी गुरुवार, 11/08/2011 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल: नसतेस घरी तू जेव्हां -) तळतेस भजी तू जेव्हां - जीव 'सुटका सुटका' म्हणतो.. मिरच्यांचे वरती तुकडे तोंडात घास का फिरतो ? बघ फेटून पीठ- कसाही का गोळा कच्चा जळतो ! ही जिव्हा रुचीहीन होते - अन्

साडू म्हणे कामच तोडू...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी गुरुवार, 11/08/2011 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
साडू म्हणे कामच तोडू... पूर्वाश्रमीचे घनिष्ठ मित्र असलेले व आता एकमेकांचे साडू बनलेले दोघेजण नेमक्या फ्रेंडशिप डे च्या दिवशी एकत्र येतात. त्यांच्यात पुढीलप्रमाणे संवाद घडतो... “काय साडू, लग्नाचे लाडू फुटल्यापासून तू चांगलाच सुटलाय की रे.” “आणि हे माझ्या प्रिय साडू तुझंही पोट फारच वाढू लागलंय त्याचं काय?” “अरे आज फ्रेंडशिप डे. विसरलास की काय?” “छे छे कसा विसरेन?” “मग बँड नाही आणलास? मागच्यावर्षी तर चांगले कोपरापर्यंत बँड बांधून फिरत होतास ना?” “अरे साडू, मागच्या आठवणी नकोस काढू..

निरोधला विरोध!!!

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी बुधवार, 10/08/2011 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
निरोधला विरोध! पुरुष उवाच या तरुणाईच्या डोक्याला खुराक देणाऱ्या २००९च्या दिवाळी अंकात ‘निरोधला विरोध’ कोठे कोठे अन् कसा कसा होतो याचे मोठे अभ्यासपूर्ण रेखाटन केलेले होते. एका नामांकित लेखकाने एड्सग्रस्तांसाठी सामाजिक कार्य करतांना अनावधानानेच या विषयाला तोंड फोडले आहे. निरोधच्या वापराला विरोध जसा सुशिक्षितांकडून होतो त्याच प्रमाणात अशिक्षितांकडूनही होत असतो. यामागील कारणमिमांसा शोधण्याचा लेखकाने प्रयत्न केला व त्याचे निरीक्षण किंवा परीक्षण म्हणजे हा लेख होय. प्रथम त्याने ग्रामीण भागातील लोकांची मते जाणून घेतली. तेव्हा असे निष्कर्ष समोर आले की गावातील प्रत्येकाला प्रत्येकजण नावानिशी ओळखत असतो.

महावीर बंडू -

लेखक विदेश यांनी बुधवार, 10/08/2011 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
हाती फिरवत गदेस गरगर बंडू फिरतो भरभर घरभर , येणा-जाणाऱ्यास तडाखे बाल महावीराचे शंभर ! सोफ्यावरून खुर्चीवरती - खुर्चीवरून फरशीवरती , उड्डाणातुनी जखमी होतो पराक्रमी तो बंडू असतो ! ढगांची गडगड कानीं येता

चित्रचक्कर क्रमांक १ ते २३

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी बुधवार, 10/08/2011 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रचक्कर क्रमांक १: ओळखा पाहू - एक अतिशय गाजलेला हिन्दी चित्रपट - यात बाप स्वत: परधर्माच्या स्त्रीबरोबर विवाह करतो परंतू कालांतराने जेव्हा त्याचा पुत्र स्वधर्माच्याच स्त्रीवर प्रेम करतो, तेव्हा ती केवळ खालच्या सामाजिक स्तरातील आहे म्हणून या प्रेमाला बाप विरोध करतो. हा प्रेमपट कोणता? चित्रचक्कर क्रमांक २: ओळखा पाहू - एक अतिशय गाजलेला हिन्दी चित्रपट - यात लता मंगेशकरांनी एक गाणे मध्यंतरापुर्वी गायले आहे. तेच गाणे (म्हणजे धृवपद तेच आहे पण कडवी वेगवेगळी आहेत) चित्रपटाच्या शेवटच्या रिळात किशोरकुमारने गायले आहे. किशोरकुमारने गायलेले गाणे सोलो आहे.

कानसेन कोण? २०११ - २

लेखक प्रभो यांनी सोमवार, 08/08/2011 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, काल-परवा बहुगुणी काकांनी म्हटल्याप्रमाणे एक-दोन आठवड्यांपासून कानसेन परत सूरू करावं असं मनात होतं.. दोन चार मित्रगण आणी बहुगुणी काकांशी व्यनिमनीच्या गोष्टी केल्यावर सर्वांनी होकार भरला. त्याचा पहिला भाग गणपाशेठ नी टाकला आहेच. गणपा ऑफिसातून घरी निघाल्याने तो काही १-२ तास आता धागा पाहू शकणार नाही. तर आपण पुढचा भाग चालू करूयात. मुळ गाण्याचे केवळ दुवे द्या. डिस्क्लेमर १. मेघवेडा, मस्त कलंदर, गणपा, बहुगुणी, रेवती,चतुरंग (शेवटचे तीन जसा वेळ मिळेल तसं) ही मालिका चालू ठेवण्यात भाग घेतील, पण आम्ही एकमेकांची गाणी सिलेक्ट केली नाहियेत.

आटपाट नगरात नवीन घर आणि ऑफिस...!!!

लेखक प्यारे१ यांनी शुक्रवार, 05/08/2011 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणे कन्फ्युजन. काय करावं बरं असा प्रश्न घेऊन मी तुमच्यासमोर आलोय. नक्की काय झालंय हे नमनाला घडाभर तेल न घालता सांगतो. आटपाट नगर होतं. गावामध्ये बारा बलुतेदार, अठरा पगड जातीजमातींचे, विविध व्यवसाय असलेले, विविध कौशल्ये असलेले लोक एकत्र येत जात होते.... तुम्ही म्हणाल 'राहत होते' असे हवे ना? नाही येत जात होते असेच बरोबर आहे. त्या गावाचं वैशिष्ट्यच असं होतं की नगरामध्ये लोक राहत नव्हते. तरी प्रत्येकाचं एकेक घर, एकेक निवारा या नगरामध्ये होता. थोडं सेकंड होम्स टाऊन शिप सारखं म्हणा ना! बर्‍याच्शा लोकांची स्वतःची वेगळी घरं त्यांच्या त्यांच्या गावी होती. या सेकंड होम टाऊनशिप मध्ये..