भारत माझा देश आहे??? सारे भारतीय माझे,,,,,,,,,???

लेखनविषय:
आमचा पेर्णास्त्रोत आमच्या पेर्णास्त्रोतामधे बर्‍याचं गोष्टींचा उहापोह केलेला दिसतोयं आणि त्याच्यावर प्रतिक्रिया लिहिण्यापेक्षा हा आख्खा लेख पाडणं मला जास्तं सोईस्कर वाटलं. शाळेमधे प्रत्येक दिवशीची सुरुवात राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञेनी होते. रोजचा "प्रोटोकॉल" म्हणुन हा सोपस्कार उरकला जातो. किती जणं त्या राष्ट्रगीतामधल्या किंवा प्रतिज्ञेमधल्या गर्भितार्थ समजुन उमजुन त्याचा वापर रोजच्या जीवनात करतात?

आम्हाला फक्त विकास हवाय... !

लेखनविषय:
लेखनप्रकार
महाराष्ट्रामधे काही पत्रकारांचे लिखाण गंभीरपणे वाचले जाते. काही जणांच्या लिखाणात नवी माहिती मिळते तर काहींच्या लिखाणात नवा विचार मिळतो. अशाच एका जाणकार पत्रकाराचा एक लेख वाचनात आला. त्यातल्या दोन वाक्यांनी काळजाला हात घातला.

मुंबई ते काश्मीर सायकलनामा - भाग ३ ओरिजनल प्रेम पत्र ...

लेखनविषय:
लेखनप्रकार
भाग ३

अरूण वेढीकर सायकलवरून मजल दर मजल करत पंजाबातून जातात तेंव्हाच्या कथा भागातील मजेदार प्रसंग सादर... पठाणकोट डमताल ..

१८५००

ओरिजिनल प्रेम पत्र!

पान२२५ ...आता नुसतचं बसून काय करायचं म्हणून म्हटले झाडावर चढता येते का पाहू... प्रचंड'सालढोम' इतर वृक्षांच्या गर्दीत पांढराफटक वेगळा वाटत होता. सगळ्या अंगाला त्याच्या गुळगुळीत बुंध्याचा पांढरा भुस्सा लागू लागला. वर जायला ही फारसा आधार नव्हता. म्हणून नाद सोडला. तेवढ्यात बुंध्याच्या चुंबळीसारख्या खोलगट गाठीत हाताला एक खोचून ठेवलेला कागद लागला.

मुंबई ते काश्मीर सायकलनामा - भाग 2

लेखनविषय:
लेखनप्रकार

मुंबई ते काश्मीर सायकलनामा - भाग 2

भाग 2 इंदूर – देवास - सारंगपूर

अरूण वेढीकर सायकलवरून मजल दर मजल करत मध्य प्रदेशात येतात तेंव्हाच्या कथा भागातील मजा मजा सादर...

पान 60 इंदूर ... मध्य प्रदेशाची राजधानी होती. इंदूरवर अस्सल मराठी छाप दिसते. भाषेचा गोडवा कानात साठवावा असा. मराठीला उर्दू-हिन्दी शब्दांची खमंग फोडणी... ‘अरे यार माजरा काय आहे? खमखा चिल्लावून राहिलाय ? इतका शोर मचून का राहिलाय?... ... इंद्रेश्वर मंदिरामुळे याला इंद्रपूर म्हणत. पुढे इंदूर - इंदौर असा अपभ्रंश झाला...राजवाड्या पुढच्या गोयल मंदिरा शेवटी खास मिठाईची गल्ली आहे.

मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संगे..

लेखनविषय:
लेखनप्रकार

मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संगे...

1

मस्त कलंदर अरुण वेढीकरचा तरुणपणातील सायकलनामा.

“... प्रवास असे दुचाकीचा । रम्य तरीही धकाधकीचा। अशात बादशाही थाटाचा । बडेजाव कशाला? ।। या विचारानुसार निवडलेली आडवाटेवरची देवळं, छोटे खानी हॉटेलं, डेरेदार वृक्ष, शेतातील माच, भटक्या जमातींचे तंबू हीच माझी विश्रांती अन् निवाऱ्याची ठिकाणं होती. अकस्मात घडणाऱ्या घटनांचा सूक्ष्म थरार होता. साहसाची अशी ही एक भावना होती की जिला उघड्यावरच्या रात्रींची ओढ होती.

‘अनासक्त’... मुक्त भावयात्रा - २

‘अनासक्त’... मुक्त भावयात्रा -१ मुकुंदराज कुलकर्णी यांच्या प्रत्येक कवितेतून एका एका प्रसंगामागच्या, स्थळामागच्या, व्यक्तीमागच्या हळुवार भावना अलगद प्रकटतात. शब्दांच्या रचनेतून ती ती भावना एखाद्या आरसपानी वास्तूसारखी सर्व कंगोरे लेऊन मनाच्या प्रतलावर रेखाटली जाते. मूर्त रुपात साकारते. कवितेतील शब्दही फारसे अलंकारिक नाहीत. साधेच शब्द, रोजच्या बोलण्यात नेहमी भेटणारे. पण त्यातूनही काव्यात्मकता अचूक प्रकट झाली आहे. अगदी तुमच्या आमच्याही दैनंदिन जीवनात घडणाऱ्या साध्या साध्या घटनांमध्ये लपलेले ‘काव्य’ नेमकेपणे शोधून या कविता आपल्यासमोर मांडतात.

‘अनासक्त’... मुक्त भावयात्रा -१

a (पुस्तक-परिचय ) शाळेत असताना, कविता नावाच्या रम्य प्रकाराचे, त्यातल्या यमक, वृत्त, छंद, अलंकार नावाच्या हत्यारांनी ‘रसग्रहण’ नावाचे नीरस पोस्टमॉर्टेम करावे लागे. ते इतके डोक्यात गेले होते , की पुढे पुढे काव्य या प्रकारापासून किमान एक हजार किलोमीटर दूर राहण्याची मी दक्षता घेत असे. हा आकस निवळायला बरीच वर्षे लागली. हल्ली हल्लीच एखादी गेय आशयघन कविता पुन्हा मनावर जादू करू लागली आहे.

वेदाध्ययनातील- संथा देणे... अर्थात वेदाभ्यास शिक्षण/पाठांतर पद्धती

लेखनप्रकार
....................................................................................................................................... खुलासा:- वेदपाठशाळांमधे प्राचीन काळापासून अध्ययन/अध्यापनाची एकच एक अशी, परंपरागत पद्धती रहात आलेली आहे. ही पद्धती फक्त पाठ करून ठेवण्याच्या विषयाकरिताच निर्माण झालेली आहे. हिला सामन्यतः मौखिकी अध्यापन पद्धती असे म्हटले जाते. ह्या पद्धती विषयी खूप जणांच्या मनात कुतुहल,आस्था,चिकित्साभाव इत्यादी असते. आंम्हा पुरोहित मंडळीना काम करत असताना,पाठांतर पाहुन ह्या अनुषंगानी काहि प्रश्नंही विचारले जात असतात.

व्हा पुढं … २०१५ साठी

लेखनविषय:
लेखनप्रकार
२०१४ च्या उत्तरार्धात एक महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे कुठल्याही फालतू चारोळी कवितेला वारेमाप प्रसिध्दी मिळवून द्यायची असेल असेल तर त्या कवितेच्या/ चारोळीच्या खाली फक्त लिहायचे कवी: " तुम्हाला माहीतच आहे ", " सांगायला हवे का? " , "आपले नेहमीचेच" इ. इ. बस ! ती कविता/ चारोळी अशी प्रसिध्द पावते की विचारायची सोय नाही कुणी तरी म्हणले आहे ना , नावात काय आहे ? (हे कोण म्हणले , आठवले का…. ? असे कृपया विचारू नये ) तर असो मला काय म्हणायचे आहे की ….
Subscribe to मांडणी