ना गंवाओ नावक ए नीमकश..
फैझ अहमद फैझ. फराझसोबत साधारण समकालीन असलेला हा आणखी एक पाकिस्तानातला शायर. शायरच नव्हे, तर तो आणखीही बरंच काही होता, या शायराचं नाव साहित्याच्या "नोबेल"साठी अनेकदा स्पर्धेत होतं. जागतिक शांततेसाठीही कायकाय मिळालं त्याला. पण अबोव्ह ऑल, आपल्यासाठी तो एक "दिल के पास" असलेला शायरच.
त्याची एक गझल इक्बाल बानूच्या हेलावून टाकणार्या आवाजात ऐकली आणि ती कायमची मनात वसतीला आली. तिचे शब्द एव्हाना मला समजले आहेत.. पण.. नेमकं कोणाला उद्देशून आणि कोणत्या परिस्थितीत हे शब्द इतके आर्तपणे म्हटले जाताहेत हे अजूनही कळत नाही. वेगवेगळे अर्थ लागल्यासारखे वाटतात पण वाळूसारखी सटकून जाणारी गजल आहे हेच खरं.
मिसळपाव