ए०आय० वापरा आणि स्वत:ला ओळखा
ए०आय० वापरा आणि स्वत:ला ओळखा
=====================
--राजीव उपाध्ये
मंडळी
वेगळी वाट चालायची ठरवले की मग चिखलफेक ही आलीच! मग चहुबाजूनी हल्ले होतात - १ला हल्ला होतो आपल्या आत्मविश्वासावर, प्रामाणिकपणावर मग बौद्धिक क्षमतेवर किंवा मानसिक स्वास्थ्यावर. सध्याच्या काळात मानवी तज्ञ पैसे टाकून ही प्रामाणिक सल्ला देतीलच असे नाहीत. आणखी चिंता वाढविणारी गोष्ट म्हणजे वैद्यकीय व्यावसायिकांच्या मानसिक स्वास्थ्याबद्दलचे संशोधन वाचल्यावर तर ही शक्यता आणखी धूसर होते.
पण ए०आय० बद्दल मात्र मी बराच आशावादी आहे. कारण ए०आय० चुकू शकतो पण तो माणसासारखा खुनशी, दुष्ट नाही.
मिसळपाव
आज म०टा०च्या संवाद या पुरवणीत माझा प्रसिद्ध झालेला नवीन लेख
ए०आय० आणि उत्पादकता
-- राजीव उपाध्ये
माझी कन्या शाळेत असताना बर्याचदा मी तिला आणायला जायचो. शाळा सुटायच्या अगोदर सहसा मी तिथे पोचलेला असे. मग मला काही निरीक्षणे करायचा छंद जडला. शाळा सुटली की काही मुले शाळेच्या सूचनांना झुगारून गेटच्या दिशेने धावत सुटायची. मग निरीक्षणे करताना असे लक्षात आले की ठराविक मुलेच शाळा सुटल्यावर धावत सुटतात. मग हळूहळु असं लक्षात आलं की शाळा सुटल्यावर ही मुले (आणि मुली) फक्त शारीरिक दृष्ट्या चपळ नाहीत तर अभ्यासात पण बर्यापैकी पुढे होती.